Author: Police Diary

31 ऑक्टोबर ऑनलाईन अर्जाची मुदत पो. डा. वार्ताहर , वाशिम : केन्द्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, दिल्लीच्या वतीने घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी सन 2024 – 25 चे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सुरुवात झाली आहे. जे विद्यार्थी जिल्हयातील रहिवासी आहेत आणि मान्यता प्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता 8 वी व इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या प्रवेश परिक्षेकरीता अर्ज करु शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2009 ते 31 जुलै 2011 दरम्यान झाला असावा. ते विद्यार्थी इयत्ता 9 वीच्या परीक्षेकरीता अर्ज करण्यास…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर , नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतमध्ये पाच नोव्हेंबरला ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. तर बारा ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील अधिकृत घोषणा केली असून राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ ते २० ऑक्टोबर, उमेदवारी अर्जाची छाननी २३ ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २५ ऑक्टोबर दुपारी तीन पर्यंत आहे. २५ ऑक्टोबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल मतदान ५नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होईल. तर सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर , जालना :- जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप येथील अश्विनी दशरथ सौदागर वय 16 वर्षे असलेली मुलगी हरवली आहे. मुलीची उंची अंदाजे 5 फुट असून रंग सावळा, चेहरा उभा तसेच केस काळे, पोशाख पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व लाल रंगाची ओढणी, पायात प्लास्टीकचा बुट, शिक्षण दहावी असून तिला भाषा मराठी येते. या वर्णनाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन घेवून गेल्याची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तरी या वर्णनाची मुलगी कोणास आढळून आल्यास पोलीस ठाणे भोकरदन येथे पोलिस उप निरीक्षक विजय आहेर (मो.8087507511) आणि पोलिस ठाणे भोकरदन दुरध्वनी क्र. 02458-244210 (मो. 8459610489)…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर , पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया सेवेअंतर्गत गेल्या २ महिन्यात ८ पेक्षा अधिक बेरिएट्रिक शस्त्रक्रिया (लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया) यशस्वी केल्या असून याअतंर्गत एका ३३ वर्षीय तरुणाची बॅरिएट्रिक सर्जरी आज ससून रुग्णालयात करण्यात आली. ससून रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले १० महिने मोफत शस्त्रक्रिया रुग्णसेवेत आणली आहे. हर्निया, पित्ताशय, अपेंडिक्स, मुळव्याधी, बेरिएट्रिक सर्जरी अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया ससूनमध्ये मोफत केल्या जातात. स्थूलत्व जनजागृती अभियानांतर्गत बॅरिएट्रिक सर्जरी करण्यात आल्या आहेत. सोलापूर येथील ३३ वर्षीय तरुण रुग्ण गेले अनेक वर्ष लठ्ठपणामुळे त्रासलेला होता. वाढत्या वजनामुळे थकवा, काम करण्यास आळस या सोबतच रुग्णाला रक्तदाब, मधुमेह,…

Loading

Read More

वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरले जातील – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पो. डा. वार्ताहर, नांदेड :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गंभीर आजारी असलेली बालके दगावल्याची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याची तात्काळ गंभीर दखल घेऊन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर आजारी रुग्णांची पाहणी करून त्यांनी वस्तुस्थिती समजून घेतली. याचबरोबर वरिष्ठ पातळीवर आढावा बैठक घेऊन निर्देश दिले. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीत…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर , वाशिम : जिल्हा परिषद,वाशिमच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त झाले आहे. ही परीक्षा डिजीटल परीक्षा परिसर, गुलाटी टॉवर, शासकीय तंत्रनिकेतन समोर, लाखाळा, रिसोड रोड, वाशिम या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजता दरम्यान रिंगमन (दोरखंडवाला) या पदासाठी दुसरे सत्रात तर दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान वरिष्ठ सहायक (लेखा) पदासाठी तिसरे सत्रात. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान विस्तार अधिकारी…

Loading

Read More

11 ऑक्टोबरला जनसुनावणी पो. डा. वार्ताहर, वाशिम : राज्य महिला आयोग मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिकस्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता ” महिला आयोग आपल्या दारी ” या उपक्रमाच्या माध्यमातून 11 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे जनसुनावणी होणार आहे. या जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थीत राहणार आहे. जिल्ह्यातील तक्रारदार पिडीत महिलांना थेट जनसूनावणीस उपस्थित राहुन आपली समस्या व तक्रारी आयोगापुढे मांडता येणार आहे. तरी या जनसूनावणीस जिल्ह्यातील जास्तीत जास्त तक्रारदार पिडीत महिलांनी उपस्थित राहून आपल्या समस्या व तक्रारी मांडाव्यात. असे आवाहन जिल्हा महिला…

Loading

Read More

लंडनच्या अव्हॉस्टिक  चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास केले अभिवादन लालबहादूर शास्त्रींचेही केले स्मरण भारताचे सरन्यायधीश श्री धनंजय चंद्रचूड यांचीही उपस्थिती पो. डा. वार्ताहर : महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र जगाने आज स्वीकारला आहे, असे उदगार संस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज लंडन येथे काढले. आज गांधी जयंतीनिमित्त लंडन येथील अव्हॉस्टिक  चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाच्या भूमीत जन्मलेल्या आणि जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेने जगात सर्वत्र साजरी केली जाते; आपण सर्वच महात्मा गांधी यांच्या भूमीतून आलो आहोत,…

Loading

Read More

ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पो. डा. वार्ताहर  :  नागपूर शहरातील मौजा वाठोडा व मौजा भांडेवाडी ह्या भागातील प्पुरग्रस्त नागरिकांच्या सर्वेक्षणामध्ये असलेला गोंधळ तातडीने दूर करून बाधितांना सानुग्रह मदत द्या, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. पुरग्रस्त नागरिकांच्या सर्वेक्षणात येत असलेल्या अडचणींच्या संदर्भात ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवारी (ता.३) उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देखील निवेदनाची प्रत पाठविलेली आहे. ॲड. मेश्राम यांनी निवेदनात नमूद केले की, प्रभाग क्र. २६ येथील मौजा वाठोडा मधील संघर्ष नगर झोपडपट्टी,…

Loading

Read More

पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला स्वागत आणि अभिनंदन सोहळा ! लंडन, दि. ४: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक करोड कोहिनूर ओवाळून टाकावे असा राजा होय. जेव्हा गोठ्यातली गाय आणि घरातली माय धोक्यात येते,  क्रुरता आपली सिमा ओलांडते तेव्हा एक तर देव अवतार घेतो किंवा शिवबा अवतार घेतात; छत्रपती  शिवाजी महाराज आमच्यासाठी देव जरी नसतील तरीही देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत, या महानायकाचा  अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमित  उभारण्यासाठी मी आणि महाराष्ट्र सरकार  पूर्ण सहकार्य करेल, तुम्ही पुढाकार घ्या मी पुतळा देईन अशी ग्वाही राज्याचे वने,  सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.…

Loading

Read More