Author: Police Diary

पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या विसापूर येथील सैनिक स्कूल व बॉटनिकल गार्डनला सिंगापूरचे कौन्सल जनरल विंग फूंग चाँग आणि हाय वे वून यांनी भेट दिली व संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सैनिक स्कूल परिसरातील विविध खेळांचे स्टेडीयम, स्थलसेना, नौसेना, वायुसेनेचे लष्करी म्युझियम, 16 डिसेंबर 1971 रोजीचा बांगलादेश मुक्ती कराराबाबतचा देखावा, उरी सेक्टर सर्जिकल स्ट्राईक देखावा, विविध विमानांचे मॉडेल, वेगवेगळ्या युध्दांची माहिती असलेले फलक, कारगील युध्दाचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार असलेला देखावा, दिल्ली – लाहोर बस यात्रेचा देखावा आणि सोबतच भारतीय लष्कराने केलेल्या…

Loading

Read More

सुतक काय असते? सुतक किती‌ दिवस आणि कसे पाळायचे असते? धार्मिक आणि वैज्ञानिक माहिती पोलीस डायरी, नाशिक  प्रतिनिधी, सुतक ही हिंदु धर्मातील एक प्रक्रिया आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होतं. सुतकाचे काही नियम असतात जे त्या घरात पाळले जातात. नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते. नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात. ही सर्व माहिती पंचांगात असते. बाहेरगावच्या माणसांसाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते. सुतक म्हणजेच मृत व्यक्तीबद्दल धरावयाचा विटाळ. सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर 1 ते 13 दिवस अशौच पाळण्याची पद्धत आहे. सुतक पाळायचे नियम सुतकामध्ये घरातील देवपूजा…

Loading

Read More

१०८ सेवा अधिक जलद व तत्पर करावी, मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना पोलीस डायरी प्रतिनिधी, जळगाव – रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५१ हजार ५०३ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले असून १ हजार १९८ बाळांचा जन्म रूग्णवाहिकेत झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘१०८’ या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत…

Loading

Read More

*‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान संपन्न पो. डा. वार्ताहर , बुलडाणा : राज्य शासनाने सकारात्मक विचाराने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. संपूर्ण देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने दिव्यांग मंत्रालय सुरू केले आहे. दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे. यामध्यमातून दिव्यांगांना सशक्त करण्यात येईल, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले. दिव्यांग कल्याण विभागातर्फे आयोजित ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान आज, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, समाज कल्याण प्रादेशिक…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील मुलुंड, ठाणे येथील गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी टोल वाढ आणि टोल नाक्यांवरील गर्दी, सोयी सुविधा याबाबत मुख्यमंत्र्यांकडे समस्या मांडल्या. पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर मार्गावरील पुलांचे, उड्डाणपुलांचे, भुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. कराराप्रमाणे टोल नाक्यांवर कंत्राटदाराने आवश्यक त्या सुविधा…

Loading

Read More

वैद्यकीय उप अधीक्षकपदी डॉ. किशोर सुरवसे यांची नियुक्ती पोलीस डायरी प्रतिनिधी, परभणी,: जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा अस्थिव्यंग रुग्णालयातील अपघात कक्ष, औषधी भांडार, सुरक्षा व्यवस्था, शस्त्रक्रियागृह, बाह्यरुग्ण विभाग, विविध आंतररुग्ण विभाग व इतर विभाग सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोनातून व योग्य समन्वय साधण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांची वैद्यकीय उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी प्रसद्धिीपत्रकाद्वारे कळविले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, परभणी या संस्थेच्या अधिनस्त जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा अस्थिव्यंग रुग्णालय येथे पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली असून, आहे. डॉ. किशोर सुरवसे यांनी…

Loading

Read More

पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर : राज्याचे मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपूरात आयोजित श्री माता महकाली महोत्सवाच्या पहिल्या टिझरची लाँचींग करण्यात आली आहे. काल मुबंई येथे मुख्यमंत्री यांनी सदर डिझरची लाँचींग केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरु आहे. 19 ऑक्टोबर पासून महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी विविध नामांकित कलाकार चंद्रपूरात येणार असून या दरम्यान सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कायक्रमांचे आयोजन नियोजित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी पार पडलेल्या श्री महाकाली महोत्सवला नागरिकांचा मिळालेला सहभाग लक्षात घेता यंदाचेही महोत्सव भव्य होणार असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Loading

Read More

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पोलीस डायरी वार्ताहर,जळगाव – तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४३७ प्रकरणात २ लाख ८२ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तंबाखू मुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे . जिल्हा तंबाखू नियंत्रण व मौखिक आरोग्य समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी…

Loading

Read More

जि.प.च्या रिक्तपदासाठी 15 व 17 ऑक्टोबर रोजी परीक्षा पोलीस डायरी प्रतिनिधी, वाशिम: जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त झाले आहे. ही परीक्षा डिजीटल परीक्षा परिसर,गुलाटी टॉवर, शासकीय तंत्रनिकेतन समोर, लाखाळा,रिसोड रोड,वाशिम या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सकाळी 10.30 वाजता दरम्यान कनिष्ठ लेखा अधिकारी या पदासाठी पहिले सत्रात, सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजता दरम्यान कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदासाठी दुसरे सत्रात तर दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजता…

Loading

Read More

जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस डायरी प्रतिनिधी, जळगाव – जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी एचआयव्ही बाबत जाणीव-जागृतीची मोहीम राबविण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची मासिक आढावा सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, डॉ. आकाश चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भोयेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय गायकवाड, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, गिरीश गडे, माहिती अधिकारी सुरेश पाटील, पोलीस…

Loading

Read More