- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
- नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही
- बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु
- वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन : 31 मार्चपर्यंत मुदत
- माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना
- सुपर स्पेशालीटीतील शिबिरात 55 जणांचे रक्तदान
- भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार ऍक्शन मोड वर
Author: Police Diary
पो.डा. वार्ताहर , नागपूर : नागपूर. श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या विविध सेवाभावी उपक्रमाच्या शृंखलेतील गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचा शुक्रवार 1 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीराम नगर, पावनभूमी, वर्धा रोड, सोमलवाडा येथे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे मा. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे व परिसरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असलेल्या भूमिपूजन समारंभासाठी नागरिकांच्या दुचाकी आणि चार चाकी (टू व्हिलर आणि फोर व्हिलर) वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन जवळील एअरपोर्टच्या जागेवर करण्यात आलेली आहे.…
राजुर येथे बंजारा समाज बांधवांच्या वतीने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न *बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर शश्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून बुलढाणा शहरातील मलकापूर रोड येथे संत श्री सेवालाल महाराज यांचे स्मारक तसेच मंदिरासाठी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले….! आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी बंजारा समाज बांधवांच्या वतीने रामेश्वर महादेव संस्थान राजूर येथे आयोजित केला होता, या मेळाव्यामध्ये धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांचा सर्व बंजारा समाज बांधवांचे वतीने यावेळी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला…! यावेळी त्या ठिकाणी बंजारा समाजातील मान्यवर तसेच शिवसेना,युवासेनेचे सर्व पदाधिकारी तसेच समस्त बंजारा समाज बांधव…
पोलिस डायरी, विशेष प्रतिनिधी, माधव मुसळे, नाशिक : सिडकोतील सावता नगरात शुक्रवारी पहाटे फिरण्यासाठी निघालेल्या रहिवाशांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. वन विभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आल्यावर त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सावता नगरात तसेच शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालय परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सावतानगरातील विठ्ठल मंदिर, जीएसटी कार्यालय, मिलिटरी हेडक्वार्टर, जलकुंभ, अभ्यासिका परिसरात बिबट्याचा संचार आढळला आहे. एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश, दुसऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पो. डा. वार्ताहर, नाशिक : ही नियमावली फक्त दिवाळीतच लागू केली जाते, इतर धर्माच्या सणाना मात्र असा निर्णय घेतला जात नाही, त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचा धर्मनिहाय होणारा भेदभावामुळे नागरिकांमध्ये राग आणि असंतोष उफळतो आहे. गोदावरीच्या पात्रातील आणि भोवतालच्या परिसरातील अस्वछता, मानवी आणि जनावरांची विष्ठा पर्यावरणास घातक नसून पूरक असल्यासारखं भासवून प्रशासनाने पाहिले गोदावरीचे होणारे जल प्रदूषण रोखण्यासाठी कार्यवाही करून,यशस्वी होऊन मग धर्माच्या सणांमध्ये ढवळा ढवळ करण्याचे आदेश काढण्याचे धाडस करायचे.
पो. डा. वार्ताहर , वाशिम : – ” माझी माती माझा देश ” अभियानातंर्गत आज १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,नगर पालिका प्रशासन व जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते टेम्पल गार्डन दरम्यान अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, नितीन चव्हाण,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक मोरे,रिसोडचे मुख्याधिकारी सतीश शेवदा,मालेगावचे मुख्याधिकारी पंकज सोनवणे, सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश वजीरे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी या मातीला नमन करून देशासाठी लढणाऱ्या…
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पहाटे घटनास्थळाची पाहणी पो. डा. वार्ताहर , रत्नागिरी :- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. पूल कोसळणं ही दुर्देवी घटना आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, हे फार महत्वाचं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या श्री. गुप्ता, श्री. सिन्हा व श्री. मिश्रा या तिघाजणांच्या तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे काल कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम…
जिल्हा अंमलबजावणी समिती सभा पो. डा. वार्ताहर , वाशिम – हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर व हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना आधार देऊन या बलुतेदारांची कौशल्ये पी.एम.विश्वकर्मा योजनेतून विकसित करण्यात यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह नुकताच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सम्मान योजनेचा आढावा जिल्हा अंमलबजावणी समितीच्या सभेत घेताना श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या.सभेला परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, एमएसएमईचे सहाय्यक संचालक श्री.डोईफोडे,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विनोद मोहपात्रा, सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र पडघान,जिल्हा उद्योग केंद्राचे पर्यवेक्षक डी.के.लोखंडे व कौशल्य विकास…
Ø धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन Ø 17 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायं 7 या वेळेत नागरिकांसाठी खुले Ø केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत अत्यंत उत्कृष्ठ असे मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन असून नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन महामानवाचा जीवन प्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी केले. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांच्या सहयोगाने चंद्रपूर येथील दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे तीन…
23 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : आदिवासी उमेदवारांसाठी वर्ग-3 व 4 पदाकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेण्याकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दि. 1 डिसेंबर ते 15 मार्च 2024 पर्यंत साडेतीन महिने कालावधीचे सत्र दि. 1 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 1000/- इतके विद्यावेतन देय राहील. या प्रशिक्षण कालावधीत अटीची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा,…
महिला व बालविकास विभागासह चाईल्ड हेल्पलाईनची महत्वाची भुमिका पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे पोलिस दलास बल्लारपूर येथे दि. 8 ऑक्टोबर रोजी केरळमधील हरविलेला बालक मिळाला. रेल्वे पोलिस दलाने चाईल्ड हेल्पलाईनला सदर बालकाची माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईन टिमने रेल्वे स्टेशन स्टेशन, बल्लारपूर येथे भेट देत बालकांची संपूर्ण माहिती जाणून घेतली व बालकाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बालकल्याण समितीला दिली. तसेच समितीच्या आदेशान्वये, सदर बालकास शासकीय बालगृह येथे ठेवण्यात आले. बालकल्याण समितीने बालकाच्या पालकांशी संपर्क साधला. चंद्रपूर येथे बालक असल्याचे सांगून पालकांना बोलावून घेतले व या केसबाबत बालकल्याण समितीशी चर्चा केली. दि. 10 ऑक्टोबर रोजी बालकाच्या पालकांना…