Author: Police Diary

आजकालच्या तरुणांमध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही. कारण जरा काही दुखायला लागलं की ही मंडळी लगेच पेनकिलरला पसंती देतात. त्यांना डॉक्‍टरांकडे जायचाही कंटाळा येतो. दुखण्यावर कुठलंही मलम लावण्यापेक्षा ते पेनकिलरलाच अधिक पसंती देतात. या पेनकिलरमुळे आपल्याला तत्काळ बरं वाटतं; यामुळेच या गोळ्यांची सवय होते. सवय याचा अर्थ असा की या गोळ्या आपण वारंवार घेतो. अशा रीतीने या पेनकिलरची हळूहळू सवय होते आणि आपण प्रत्येक वेळी या गोळ्या घेतो. मात्र, या गोळ्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. केवळ हृदयाचं आरोग्यच नव्हे तर ब्रेन स्ट्रोकचादेखील धोका यामुळे संभवतो. कारण या गोळ्यांमध्ये आयब्रूफेन आणि डाइक्‍लोफेनैकसारखी केमिकल्स असतात. ही केमिकल्स हृदयाची गती अनियमित करतात. यामुळे ऑट्रियल…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , नागपूर  : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे आज भेट घेतली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या ( मेडिकल ) अमृत महोत्सवी सोहळ्यावरून परत आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राजभवनात पोहचल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री नागपूर येथे आल्यानंतर विमानतळावरून थेट राजभावनात पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आमदार अॅड. आशिष जायस्वाल उपस्थित होते.

Loading

Read More

चंद्रपूर जिल्ह्यातील कुटुंबियांसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश पो.डा. वार्ताहर  , चंद्रपूर : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या एक रक्कमी अर्थसाहाय्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याला एक कोटी 19 लक्ष 80 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करून या गरीब व गरजू कुटुंबांसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या संदर्भात शासनादेश नुकताच निर्गमित झाला आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नोंद असलेला कर्ता पुरुष किंवा स्त्री मरण पावल्यास कुटुंबीयांना एक रकमी…

Loading

Read More

– जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन – वाहतूक कोंडी कमी करण्याची मागणी मागणी पूर्ण न झाल्यास 15 जानेवारी 2024 रोजी करणार उपोषण पो.डा. वार्ताहर  , चंद्रपूर (प्रतिनिधी) चंद्रपूर हे एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार होती. हा प्रश्न निकाली काढण्यात यावा. या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांच्या नेतृत्वाखाली 1 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , चंद्रपूर : श्री महर्षी सुदर्शन महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त सुदर्शन समाजातर्फे चंद्रपूरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेतर्फे स्थानिक कस्तुरबा चौकात भव्य स्वागत करण्यात आले. श्री महर्षी सुदर्शन महाराज यांचा जयजयकार करणा-या घोषणांनी यावेळी परिसर निनादुन गेला होता. चंद्रपूर भाजप महानगर ब्रिजभूषण पाझारे,राहुल घोटेकर प्रमोद क्षिरसागर,सुर्या खजांची, रेणुका घोडेस्वार, शिला चव्हाण,  सचिन कोतपल्लीवार, मनिषा महातव, चॉंद सय्यद,अमोल मत्ते, बळीराम महतव, विक्रम महातव, भारत बिरीया, दिलीप हजारे, आतिश असरेट, शैलेश महातव, अनिल खोटे, त्रिलोक बिरिया, सुनील राठोड, विश्वनाथ महातव, वीरेंद्र राठोड, राज खोडे, राम सावरकर, आतिश हटवाल, रितेश खोटे, युवराज बिरिया,आदी भाजपा पदाधिका-यांसह मोठया संख्येने भाजपा…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , बुलडाणा : दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून, त्यानुसार जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही मतदार नोंदणीमध्ये मदत घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले. श्रीमती डॉ. पांण्डेय या मतदार यादी निरीक्षक म्हणून त्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे समन्वय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन, प्रबोधिनी,चंद्रपूर येथे दि.29 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड राज्यातील नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी 18 महिने प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रशिक्षणामध्ये छत्तीसगड राज्यातील एकूण 40 वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये 27 पुरुष आणि 13 महिला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थ्याचा समावेश आहे. यावेळी, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटन सोहळयास उपस्थित राहून नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींना संबोधित करतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, मौल्यवान नैसर्गिक वारसाचे रक्षण व जतन करण्याची जबाबदारी वनांचे रक्षक म्हणून आपणावर आहे, असे सांगितले. शेतकरी, वने व मत्स्यव्यवसाय आणि…

Loading

Read More

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : खरेदी केंद्रांची मोजकी संख्या, इंटरनेट नेटवर्कची समस्या, अवकाळी पावसाचे वातावरण यामुळे धान नोंदणीची मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी आहेत. आधारभूत योजनेअंतर्गत ते नेमण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून धानविक्री करतात. या जिल्ह्यांमध्ये केंद्रांची संख्या मोजकी आहे. अनेक दुर्गम गावांमध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आहे. अवकाळी पाऊस…

Loading

Read More

यात्रा समन्वय समितीची पूर्वतयारी आढावा बैठक • यंत्रणेमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना • मुबलक पाणी, अखंड वीजपुरवठा करण्याचे दिले निर्देश पो.डा. वार्ताहर  , बुलडाणा : पिंपळगाव सराई परिसरात 15 मार्च 2024 पासून सैलानी बाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित जिल्हा यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून, त्याचे सूक्ष्म नियोजन करावे आणि नियोजनानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृह येथे आयोजित यात्रेच्या पूर्वतयारीचा समन्वय समितीतील सदस्यांचा त्यांनी आज आढावा घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपळगाव सराई येथे सैलानी बाबा दर्गा परिसरात यात्रा महोत्सव राहणार असून,…

Loading

Read More

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूरच्या वैभवात पडणार भर इमारत बांधकामासाठी ६० कोटी ७६ लक्ष रुपये मंजूर विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण पो.डा. वार्ताहर,चंद्रपूर : एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आणि यंदा विधी क्षेत्रच त्याचे साक्षीदार ठरले आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत सात मजली इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी राज्य शासनाने ६० कोटी ७६ लक्ष रुपये मंजूर केले आहेत. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री…

Loading

Read More