Author: Police Diary

जिल्हा परिषद बुलडाणा सेसफंड योजना सन 2023-24 पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेतून 75 टक्के अनुदानावर 5अश्वशक्ती विद्युत मोटरपंप संच, पॉवर स्प्रेअर्स, मानवचलीत टोकनयंत्र तसेच रोटाव्हेटर, बीबीएफ प्लाटर, बियाणे खते पेरणी यंत्र आदी (40,000 रुपयांच्या मर्यादेत) साहित्य पुरविणे प्रस्तावित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज बोलावण्यात येत आहेत. तरी इच्छुक शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमधील कृषि विभागात कृषि अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : चंद्रपूरातील पवित्र दीक्षाभूमीचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यात त्यांना यश येत असून दीक्षाभूमीच्या विकासासाठी उच्च अधिकार समितीच्या वतीने 56 कोटी 90 लक्ष रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला असुन आता सदर कामाचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी जगात नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौद्ध धम्माची दिक्षा दिली. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झालेला आहे. मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी अविकसित राहिली आहे. येथे देशभरातुन येणाऱ्या अनुयायांसाठी कसल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. परिणामी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत आहे. त्या अनुषंगाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार प्रयत्नशील आहे. आमदार…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , छत्रपती संभाजीनगर :- घरपोच गॅस सिलिंडर देतांना गॅस वितरकांनी सिलिंडर वजन करुन द्यावे व त्यासाठी घरपोच वाहनांमध्ये वजन काटा ठेवावा, ग्राहकांनी मागणी केल्यास वजन करुन त्यांचे शंका निरसन करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी आज जिल्ह्यातील घरगुती गॅस वितरक, एजन्सीधारक यांना दिले. जिल्ह्यातील गॅस वितरक, एजन्सीधारक, डिलर्स यांची बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, गॅस कंपनीचे विक्री अधिकारी प्रगती लाड, निलेश लठ्ठे, गोविंद पटेल तसेच सर्व गॅस वितरक आदी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी लोखंडे म्हणाले की, ग्राहकांना गॅस सिलिंडर देतांना ग्राहकाने…

Loading

Read More

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी तसेच महसूल विभागाच्या वाहनांचा लोकार्पण सोहळा चंद्रपूर, दि. 2 : आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण तसेच वनांचे महत्व समजण्यासाठी ताडोबा पर्यटन ही महत्वाची बाब झाली असून हे एक चालते – बोलते विद्यापीठच आहे, असे विचार राज्याचे वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारीकरीता पर्यटन वाहनांचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ताडोबा अंधारी प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी,…

Loading

Read More

संपूर्ण जिल्ह्यात उपक्रम राबविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : नागरीकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे व त्यांना वेगवेगळ्या कार्यालयांच्या सातत्याने फेऱ्या मारण्याचे काम पडू नये यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेले ‘महाजनसंपर्क’ चंद्रपूरकरांसाठी मोलाचा ठरला. चंद्रपूर येथील नियोजन भवनात शुक्रवारी, 1 डिसेंबर रोजी ना. श्री. मुनगंटीवार यांनी नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी नागरीक वेगवेगळ्या सरकारी विभागातील कार्यालयांच्या फेऱ्या मारत असतात. परंतु अनेकदा त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता ना. श्री. मुनगंटीवार यांनी स्वत: पुढाकार घेत…

Loading

Read More

सात महिन्यात ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महसूल यंत्रणेचे जलद व पारदर्शक कामकाज पो.डा. वार्ताहर , जळगाव – उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांतधिकारी) यांच्या स्वाक्षरीने देण्यात येणारे जात प्रमाणपत्र (caste certificate) वाटपात जळगाव जिल्ह्यात मागील सात महिन्यात सूपरफास्ट कामकाज झाले आहे. मागील सात महिन्यात एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातील ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी तरूणांना, घरकुल व महाडीबीटी शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत जात प्रमाणपत्र मिळाल्याने फायदा झाला आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महसूल यंत्रणेचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभिनंदन केले आहे. जिल्ह्यात १५ तालुक्यांतील नागरिकांसाठी ७ उपविभागीय…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , बुलडाणा : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांचा समावेश असून, रब्बी हंगाम सन २०२३ स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत शेतकरी बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये प्रयोगशील शेतकरी विविध प्रयोग करून उत्पादकता वाढवत आहेत. अशा शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण…

Loading

Read More

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात नव्या शैक्षणिक धोरणाने देश वैश्विक ज्ञानशक्ती म्हणून स्थापित होईल तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरावर नैतिक शिक्षणाचा मार्ग उपकारक मुलींच्या शिक्षणातील गुंतवणूक देशाच्या विकासासाठी मोलाची पो.डा. वार्ताहर , नागपूर : भारतीय मुल्यांना अनुसरून सर्वांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश आहे. यामुळे देश एक वैश्विक ज्ञानशक्ती (ग्लोबल नॉलेज पॉवर) म्हणून स्थापित होईल,असा विश्वास देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केला. औपचारिक पदवी हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट नसून वेगाने बदल घडणाऱ्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , वाशिम : पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/ओटीएसपी) सन २०२२-२३ माहे ३१ मार्च अखेर खर्चास मंजूरी प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/ अनुसूचित जाती उपयोजना/ओटीएसपी), सन २०२३-२४ या वर्षातील कामांना मंजूरी. सन २०२३-२४ चे पुनर्विनियोजन,तिर्थक्षेत्रांना क-वर्ग दर्जा प्रदान करणे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ व सन २०२३-२४ तिर्थक्षेत्र/जनसुविधा अंतर्गत कामांना मंजूरी. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४-२५ च्या प्रारुप आराखडयास मंजूरी व जिल्हा विकास आराखडा…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर  , नागपूर : माफक दरातील सुलभ वैद्यकीय उपचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असून कोविडसारख्या महामारीने मजबुत आरोग्य यंत्रणेची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी बनविण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करुन जागतिक स्तरावर नाविन्यपूर्णतेचे केंद्र म्हणून देशाची ओळख प्रस्थापित करावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यावेळी उपस्थित होते. नव्या…

Loading

Read More