Author: Police Diary

पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी संकल्प जगविख्यात तज्ञांसह घेतलेल्या आढावा बैठकीत  वन अधिकाऱ्यांना दिल्या सूचना पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : विदर्भ ही वाघांची भूमी आहे; जैवविविधतेने संपन्न असलेल्या या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात; याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाची व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत देखील घेता येईल; यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास निश्चित मदत होईल यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे अश्या सूचना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. नागपूर येथे…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , जळगाव – चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेची भावना रूजावी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती बांधिलकी निर्माण व्हावी. यासाठी स्वच्छता प्रीमीअर लीग २०२३-२४ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३-२४, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा – २०२३, नमो ११ कलमी कार्यक्रम अंतर्गत शहर स्वच्छता अभियानातील या प्रीमीअर लीगला नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता प्रीमिअर लीग २०२३-२४ चे ९ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य शहरात स्वच्छता अभियान देखील राबविले जात आहे. यात नागरिकांच्या विविध प्रतिक्रीया, समस्या समजून घेत नगरपरिषदेकडून विविध…

Loading

Read More

आशिया स्तरावरील पहिल्या रेंजर्स फोरममध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गुवाहाटीत प्रतिपादन पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वनक्षेत्रपालांमुळे जैवविविधता सुरक्षित असून धनापेक्षा जीवन सुरक्षित करणारे वन श्रेष्ठ आहे हे पटवून सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे यासाठी झटणारे फॉरेस्ट रेंजर्स हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. गुवाहाटी येथे आयोजित पहिल्या आशियाई रेंजर्स फोरमच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. आशिया खंडातील विविध देशांसह, भारताच्या विविध राज्यातील रेंजर्स या तीन दिवसीय फोरमसाठी उपस्थित झाले होते. यावेळी मंचावर आसामचे वने व पर्यावरण मंत्री चंद्रमोहन…

Loading

Read More

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे समृद्धी महामार्गाबाबत आढावा बैठक पो.डा. वार्ताहर , वाशिम – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची वेगमर्यादा निश्चित केली आहे.संबंधित वाहनांसाठी त्यांचे लेन देखील निश्चित केले आहे. त्यामुळे वाहनांनी वेगमर्यादा पाळून आणि दिलेल्या लेनवरून मार्गक्रमण करताना चुकीने दुसऱ्या लेनवरून वाहन धावत असेल तर ही बाब संबंधित वाहन चालकांच्या निदर्शनास त्वरित आणून द्यावी.त्यामुळे समृद्धी महामार्गावर होणारे वाहनांचे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. आज 6 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील वारंगी टोल प्लाजा येथील सभागृहात समृद्धी महामार्ग…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , नागपूर – नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. कायद्यात बसेल व टिकेल आणि ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही, असे मराठा आरक्षण देण्याचा या शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. नागपूर येथे उद्या, दि. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास सुरूवात होत आहे. यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री महोदयांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेस मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , परभणी : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्यामार्फत (दि. 09 डिसेंबर) रोजी जिल्ह्यातील संबंधित न्यायालय परिसरामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी दिली आहे. या वेळी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील सर्व प्रकारची तडजोडपत्र, फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881 चेक बॉउन्स, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, विज (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे आणि दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे तसेच बँकेची वसुली वादपुर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात येणार असुन तडजोडीअंती जास्तीत-जास्त प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मा. न्यायाधीश व…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , वाशिम : सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे हे ६ डिसेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शासकीय वाहनाने मालेगांव(जि.नाशिक) येथून चाळीसगांव-कन्नड मार्गे समृध्दी महामार्ग वेरुळ इंटरचेंज (छत्रपती संभाजीनगर) कडे प्रयाण.सकाळी १०.३० वाजता समृध्दी महामार्ग वेरुळ इंटरचेंज येथे आगमन व समृध्दी महामार्गाची पाहणी करत शासकीय वाहनाने मालेगांव इंटरचेंज (जि. वाशिम) कडे प्रयाण.दुपारी १२.३० वाजता समृध्दी महामार्ग इंटरचेंज (जि. वाशिम) येथे आगमन व समृध्दी महामार्गाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी २ वाजता शासकीय वाहनाने समृध्दी महामार्ग मालेगांव इंटरचेंज (जि. वाशिम) येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

Loading

Read More

• पालकमंत्री दिलीप वळसे पाटील शेतक-यांच्या थेट बांधावर • कृषि विभागाकडून घेतला आढावा • आसोला जहांगीर येथे छत उडालेल्या नागरिकांना सानुग्रह राशीचे वाटप • नुकसानग्रस्त भागाचे ता़त्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश • आधार प्रमाणीकरण पुन्हा सुरु होणार • पिक विम्याचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासन नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील सावरगाव माळ, गोळेगाव, गिरोली, आसोला जहाँगीर आणि…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : राज्यात विमा योजना अंतर्गत 2023-24मध्ये संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी आणि कोकणातील आंबा आणि काजू फळपिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कृषि विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता यावे, यासाठी कोकणातील आंबा, राज्यातील काजू, व संत्रा आणि रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने 05 डिसेंबर2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे. आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी फळ पिकांसाठी 05 डिसेंबर 2023 पर्यंत विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. याचा राज्यातील आंबा, काजू, संत्रा व ज्वारी उत्पादक…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेतून 75 टक्के अनुदानावर 5अश्वशक्ती विद्युत मोटरपंप संच, पॉवर स्प्रेअर्स, मानवचलीत टोकनयंत्र तसेच रोटाव्हेटर, बीबीएफ प्लाटर, बियाणे खते पेरणी यंत्र आदी (40,000 रुपयांच्या मर्यादेत) साहित्य पुरविणे प्रस्तावित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज बोलावण्यात येत आहेत. तरी इच्छुक शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमधील कृषि विभागात कृषि अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी यांनी…

Loading

Read More