- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
- नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही
- बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु
- वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन : 31 मार्चपर्यंत मुदत
- माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना
- सुपर स्पेशालीटीतील शिबिरात 55 जणांचे रक्तदान
- भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार ऍक्शन मोड वर
Author: Police Diary
पो.डा. वार्ताहर , वाशिम : जिल्हयातील 2 लक्ष 21 हजार 917 गाय/म्हैसवर्गीय जनावरे व 1 लक्ष 36 हजार 871 शेळया/मेंढया आहे. गाय/म्हैसवर्गीय जनावरांसाठी लाळ खुरकत लसीकरणसाठी 1 लक्ष 88 हजार 600 लसमात्रा आणि शेळया/ मेंढयांसाठी 1 लक्ष 36 हजार 900 लसमात्रा प्राप्त झाल्या आहे. जिल्हयातील एकुण 62 पशुवैद्यकीय संस्थांना या लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात जनावरांची लसीकरण मोहीम सुरु आहे. लसीकरणापासुन एकही पशुधन वंचित राहणार नाही याबाबत सर्व संस्थाप्रमुखांना दक्षता घ्यावी व जनावरांचे लसीकरण करावे.असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. लसीकरण हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे.पशुधनातील लाळ खुरकत हा रोग विषाणुजन्य आहे. या आजारात पशुधनास 105 ते 106 डिग्री…
पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : कलापथकांद्वारे शासकीय योजनांची प्रसिध्दीसाठी जिल्हयातील नोंदणीकृत पथनाट्ये/ कलापथक संस्थांनी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव दरपत्रकासह 15 जानेवारीपर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे. कार्यालयाला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कलापथकांद्वारे शासकीय योजनांची प्रसिध्दी करणे या बाबीसाठी निधी मंजूर आहे. जिल्ह्यामध्ये कलापथक सादर करण्यासाठी कार्यालयाकडून पथनाट्ये /कलापथक संस्थांची निवड करण्यात येत आहे. निवड झालेल्या कलापथक/पथनाट्ये संस्थांना कार्यक्रम सादर करण्याची सर्वांना एकसमान या तत्वाने संधी देण्यात येणार असून त्यासाठी योग्य ते मानधन देण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील कलापथक/पथनाट्ये संस्थांनी कार्यालयाकडे पुढील कागदपत्रे 15 जानेवारी पर्यंत व्यक्तीश: सादर करावीत. संस्था नोंदणीकृत असल्यास त्याची कागदपत्रे , संस्था किती…
पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोकण कृषी विद्यपीठ आणि कृषी विभागाने केरळच्या धर्तीवर फूड सिक्युरिटी आर्मी तयार करण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यास सुरु करावे, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री तथा सिंधुरत्न कार्यकारी समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुरत्न समृध्द योजना आढावा बैठक काल घेतली. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, संचालक विस्तार शिक्षण प्रमोद सावंत, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते. सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पर्यटन उपसंचालक हणमंत हेडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : सन 2023-24 या आर्थिक वर्षात शासनाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी 260 कोटींचा नियतव्यय मंजूर केला असतांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 380 कोटी रुपये मंजूर करून आणण्यात यश आले. त्याप्रमाणे आगामी सन 2024-25 या आर्थिक वर्षासुध्दा हा आकडा 500 कोटींच्या वर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नियोजन सभागृह येथे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.,…
पो.डा. वार्ताहर : साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या माध्यमातून रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव ही संस्था अभिवाचनाचे महत्व समाजात रुजवत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना संस्कार भारती सारखी कलेला समर्पित संस्था यथोचित साथ देत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. महाराष्ट्रात या स्पर्धेचा विशेष लौकिक आहे . हा लौकिक असाच वृद्धिंगत व्हावा असे प्रतिपादन नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी अनिल उपाख्य बापू चनाखेकर यांनी केले. संस्कार भारती चंद्रपूर तर्फे लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर येथे पूज्य पुरूषोत्तम दारव्हेकर स्मृती साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन केले होते. रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांचा मूळ उपक्रम असलेल्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी चंद्रपूर केंद्रावर संस्कार भारती तर्फे करण्यात आले. या…
पो. डा. वार्ताहर : देशात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, विद्युत आणि अग्निशमन यंत्रणांचे ऑडिट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् आदी यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश देतानाच नागरिकांनी घाबरून न जाता #कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे. ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री…
नागपूरकरांनी परिवारासह भेट देण्याचे आवाहन दोन दिवसात 16 लाख 500 हजारांची उलाढाल 24 डिसेंबरपर्यंत महोत्सव नागपूर,दि. 21 : जिल्हा कृषी महोत्सवात उद्या 22 डिसेंबरला 11 वाजता होणाऱ्या *” रेशीम उद्योग” विषयावरील कार्यशाळेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सौम्या शर्मा यांनी केले आहे. तसेच नागपूरकरांनी या 24 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),कृषी विभाग नागपूरद्वारा आयोजित जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत धान्य कृषी महोत्सवास कृषी महाविद्यालय वस्तीगृह परिसर क्रीम्स हॉस्पिटल समोर नागपूर येथे सुरवात झालेली असून आज महोत्सवाचे तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी…
नासुप्र, नामप्रविप्रा, मनपा व जिल्हा प्रशासनाच्या प्रलंबित योजनांचा आढावा नागपूर, दि. १८ : नागपूर महानगर व जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारितील विविध प्रलंबित विषयांना कालमर्यादा निश्चित करून निकाली काढण्यात यावेत. सर्व प्रकल्प वेळेत पुर्णत्वास जावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. विधानसभेतील उपमुख्यमंत्र्यांच्या कक्षामध्ये यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावणकुळे, कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, सागर मेघे, विकास कुंभारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, प्रधान सचिव डॅा. के.एच.गोविंद राज, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, महानगर पालिका आयुक्त डॅा. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर,…
नागपुरातील 792 कोटींच्या 5 उड्डाणपुलांचे भूमीपूजन राज्यातील 629 कोटींच्या 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण पो.डा. वार्ताहर, नागपूर : नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची पाच हजार कोटींची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पूर्व नागपुरात होत असलेल्या आजच्या भूमिपूजनातील उड्डाणपूल कालबद्ध मर्यादेत पूर्ण होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम) यांनी के.डी.के. कॅालेज जवळ, व्यंकटेश नगर, गोरा कुंभार चौक नंदनवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणाच्या लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमाला या ठिकाणी लाईव्ह…
पो.डा. वार्ताहर, नागपूर : नागपूर जवळच्या बाजार गाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या ठिकाणी आज झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपस्थित कुटुंबीयांशी बोलताना या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कंपनीकडून सुद्धा 20 लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे,जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी…