Author: Police Diary

35 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पो.डा. वार्ताहर , वाशिम :  सुरक्षितता हा जीवनाचा एक मार्ग आहे.रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी,या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. रस्ता सुरक्षा अभियान एक महिन्याकरीता मर्यादित न ठेवता वर्षभर प्रत्येक कार्यालयाकडून, प्रत्येक नागरिकांकडून व वाहन चालकांकडून राबवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.हरीष बाहेती यांनी केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम यांच्यावतीने 35 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश जयस्वाल,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती समरिन सय्यद,मोटार वाहन निरीक्षक दिनेश सुरडकर व सुजय पगार यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा…

Loading

Read More

जाणता राजाच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद पो.डा. वार्ताहर , नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व तेजस्वी व्यक्तीमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘जाणता राजा’ महानाट्याला नागपूर जिल्ह्याच्या विविध भागातील जनतेने उदंड प्रतिसाद दिला.या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहचल्याचे समाधान प्रशासनाने अनुभवले.गेल्या तीन दिवसांपासून यशवंत स्टेडियम येथे सुरु असलेल्या महानाट्याचा समारोप सोमवार दि.१५ जानेवारीला झाला.शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद दिला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य राज्यात आयोजित करण्यात येत आहे. शनिवार दि.१३ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘जाणता राजा’ महानाट्याचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. जिल्हा…

Loading

Read More

अत्याधुनिक यंत्रसामग्री व सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी ५ कोटी ५७ खर्चातून आकार घेत आहे विशेष नवजात शिशु काळजी कक्ष पो.डा. वार्ताहर , जळगाव – जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामग्री व इतर सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे रूप पालटून गेले आहे. या सोयी – सुविधांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन जिल्हा रूग्णालयात सर्वसामान्यांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच आग्रही असतात. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ५ कोटी ५७ लाख‌‌ खर्चातून सामान्य रूग्णालयातील…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे, जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापने विषयक बाबी आणि विहित अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी, ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज, दोन प्रतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात सादर करावेत. जेणेकरुन, जिल्हास्तरीय…

Loading

Read More

चंद्रपूरमध्ये महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर – महायुतीच्या संमेलनात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय हे चारही पक्ष एकत्र आले आहेत. आपण सारे केवळ भाषण देण्यासाठी नव्हे तर महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या एकजुटीचा आदर्श महाराष्ट्रात निर्माण करण्याचा निर्धार करण्यासाठी एकत्र आलोय. आमदार, खासदार, मंत्री कुणीही झाले तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टीने पुढे गेला पाहिजे, हा उद्देश ठेवून पुढे मार्गक्रमण करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवार) येथे केले. चंद्रपूर जिल्ह्यातील महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी आयोजित करण्यात…

Loading

Read More

१० कोटी ५० लाख ६६ हजार रुपयांच्या जिल्ह्यातील ३ कामांचा समावेश पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी :  प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजुरी दिलेल्या कामांवरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरसकट उठविण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव संतोष रोकडे यांनी याबाबत आज शासन परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील मौजे निरुळ येथील परिसर विकसित करणे रु. ४ कोटी ६९ हजार, मौजे नाखरे (पावस) येथील परिसर विकसित करणे, रु. १ कोटी ४९ लाख ९७ हजार तसेच संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे जमीन विकत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व संग्रहालय विकसित करणे रु. ५ कोटी अशा एकूण १० कोटी ५०…

Loading

Read More

वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : आदिवासी उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने शबरी आवास घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ केवळ ग्रामीण भागातील आदिवासींना मिळत असल्याने शहरी भागातील आदिवासी घरकुलापासून वंचित होते. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी शहरी भागातील आदिवासींनाही हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून आता शहरी भागात वास्तव्यास असलेल्या राज्यभरातील आदिवासी कुटुंबानाही या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची…

Loading

Read More

वन अकादमी येथे ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमाचा आढावा ईश्वरीय काम होत असल्याचा आनंद – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्यातील 75 नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला. याअंतर्गत त्यांनी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबवून गावागावात नद्यांचे संरक्षण, संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे याबाबत श्री. मुनगंटीवार यांनी आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर केवळ 20 दिवसात जलसाक्षरता अभियान राबविले व नद्यांच्या संवर्धनासाठी चार महिन्यात चार शासन निर्णय काढून या कामाला गती दिली, असे गौरवोद्गार प्रसिध्द जलतज्ज्ञ तथा रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या रु. 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे. केंद्र शासन पुरस्कृत 2.0 अभियानाची शासन निर्णयान्वये सन 2021-22 पासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत पाणीपुरवठा सरोवरांचे पुनर्जीवन व हरित क्षेत्र विकास आदी पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. आणि यापूर्वीच्या अमृत अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील 44 शहरांमध्ये मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार…

Loading

Read More

18 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले पो.डा. वार्ताहर , वाशिम – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. राज्यातील विविध संस्कृतीचे आदान-प्रदान,स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ,लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 27 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम,शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील विविध प्रकार पोवाडा, भारुड,गोंधळ गीते,विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचे कार्यक्रम,राज्यातील विविध महोत्सव, कविता कार्यक्रम/व्याख्याने,देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आणि…

Loading

Read More