Author: Police Diary

विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांचा दौरा पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा, : विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. वडेट्टीवार यांचे सोमवार, दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. त्यानंतर मंगळवार, दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अकोला शहर व अकोला ग्रामीण, बुलडाणा आणि वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या एकत्रित बैठकीस उपस्थित राहतील. सायंकाळी पाच वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहातून अमरावतीकडे प्रयाण करतील.

Loading

Read More

नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा,  : जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम, तसेच अतिदुर्गम भागातील प्रतिभावंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रियेची माहिती पोहाचविण्यासाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. मागील वर्षी 12 हजार 379 विद्यार्थ्यांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली होती. यात यावर्षी किमान 10 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत नवोदय विद्यालय समितीतर्फे संपूर्ण देशभरात शैक्षणिक सत्र 2024-25 करीता इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी जवाहर नवोदय…

Loading

Read More

आरसेटीमध्ये सोराबजी पोचखानवाला जयंती साजरी पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा, : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संस्थापक सर सोराबजी पोचखानवाला यांची १४३वी जयंती सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत साजरी करण्यात आली. संचालक संदीप पोटे यांनी बँकेच्या स्थापनेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. स्वदेशी चळवळ आणि राष्ट्र उभारणीसाठी बँकेची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर सोराबजींनी महिला शाखा, गृह बचत खाते, क्रेडिट कार्ड आदी सेवा सुरू केल्या असल्याचे सांगितले. यावेळी सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Loading

Read More

नागरिकांना तिरंगा उपलब्ध करून देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश पोलीस डायरी प्रतिनिधी, चंद्रपूर, : ‘चलेजाव’ आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे 16 ऑगस्ट 1942 रोजी सर्वात प्रथम भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. देशात सर्वांत पहिले स्वातंत्र्य अनुभवण्याचे भाग्य आपल्या जिल्ह्यातील चिमूरला लाभले. ही शहिदांची आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या जाज्ज्वल्य आठवणींना उजाळा देऊन शहिदांचे स्मरण झालेच पाहिजे. त्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियान हा केवळ एक उपक्रम न समजता राष्ट्रभक्तीचे प्रतिक समजून काम करा. हे अभियान यशस्वी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरेल, यादृष्टीने जनजागृती करा, अशी सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली. नियोजन भवन…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, नागपूर :  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १६ (ड) तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बुधवारी २४ जुलै रोजी माजी महापौर श्री संदीपजी जोशी यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मी नगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष अतिथी म्हणून सराफ कोचिंग क्लासेसच्या सौ. सुषमा सराफ, पाटील कोचिंग क्लासेसचे श्री अनिकेत पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाग क्रमांक १६ चे संयोजक श्री मनोजजी देशपांडे, प्रभाग क्रमांक १६ (ड)चे अध्यक्ष श्री गजानन निशितकर, श्री अजय डागा, श्री विनोद शिंदे, श्री. जयंत आदमने, श्री नीरज दोंतुलवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १६…

Loading

Read More

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. अश्यात चंद्रपूर येथील चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरल्याचे कळताच पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील नागरिकांनी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून यासंदर्भात पहाटे ६.३० वाजता माहिती दिली. तातडीने मदतकार्य मिळणे अपेक्षित असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात आले. ना. श्री.…

Loading

Read More

अक्कलपाडा प्रकल्प शंभर टक्के पूर्ण झाला असला तरी पाणीसाठा फक्त 60 टक्के होतो. 100 टक्के भरण्यासाठी 198 हेक्टर अतिरिक्त भूसंपादन आवश्यक आहे, त्यासाठी निधीची तरतूद करावी म्हणून आज सभागृहात शासनाचे लक्ष वेधले…….

Loading

Read More

वाढलेल्या टोमॅटोच्या दराने मला तर आनंद झाला. कारण प्रत्येक वेळी पेशंटला बहुतेक सर्व आजारांत टोमॅटो खाऊ नका असा सांगण्याचा त्रास वाचला. कोणत्या अजारांत टोमॅटो खाऊ नये ? * सर्दी खोकला * सांधेदुखी * सूज * डोकेदुखी * अम्लपित्त (acidity ) * वाढलेलं uric acid * वाढलेलं creatinine * मूत्रपिंडाचे आजार ( kidney stones , CKD etc) * Allergies * त्वचाविकार मग खायचाच कशाला रोज रोज टोमॅटो ? बिया काढून नको , साॕस नको , टाॕपिंग नको टोमॅटोला पर्याय आहे ? आहेच की. १५ – २० वर्षांपूर्वी टोमॅटोचा इतका वापर नव्हता. पंजाबी पदार्थांमुळे टोमॅटोची ग्रेव्ही हा प्रकार आला.नाहीतर कोकम, चिंच ,…

Loading

Read More

अंभोरे यांनी पक्ष मजबुतीसाठी काम करावे – आ. सुभाष धोटे हर्षल चिपळूणकर , पोलीस डायरी न्यूज : लोकसभेतील अभुतपुर्व यशानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने विधानसभेच्या निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न कले जाणार आहे. काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्ष प्रवेश होत असून आज दि. 08 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र प्रदेश च्या टिळक भवन येथील कार्यालयात सेवा निवृत्त पोलिस अधिकारी श्री. सुधाकर अंभोरे व व्यावसायिक श्री. राहुल तायडे यांचा पक्ष प्रवेश संपन्न झाला. लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्ष प्रवेश होत असून आज दि. 08 जुलै रोजी दादर स्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी कार्यालयात…

Loading

Read More

राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळाले रुजु आदेश. हर्षल चिपळूणकर , पोलीस डायरी न्यूज : चंद्रपूर जिल्हîातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी काही कर्मचाऱ्यांना सहाय्यक शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या चुकीच्या मुल्यांकनामुळे कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची भीती निर्माण झाली होती. यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी झाल्यानंतर मा. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी भेट घेऊन सदर विषयासंदर्भात चर्चा केली. मा. मंत्री महोदयांनी सर्व कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत रुजु करुन घेण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी योग्य मुल्यांकनाच्या आधारे पुर्नरुजू…

Loading

Read More