- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
नागपूर दि. १७ : भारत निवडणूक आयोगांकडून आज निवडणुकीच्या सुधारणांसंदर्भात जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ घोषित करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘मिशन युवा ‘ अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात घेऊन 75 हजार युवा मतदाराची नोंदणी करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आले होते. यात जानेवारी २०२४ अखेर १७ ते १९ वयोगटातील ८८६०९ नव युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली असून अद्याप ही मतदार नोंदणी सुरू आहे. या अभियानाची नोंद…
पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : शासनाने जिल्ह्यातील 14 धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी सर्व शेतकरी बंधुनी त्वरित धानासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन खरेदी केंद्रावर नोंदणी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे. शासकिय आधारभूत धान्य खरेदी योजना हंगाम-२०२३.२४ मध्ये रत्नागिरी जिल्हयांत शासनाचे वतीने “मुख्य अभिकर्ता” म्हणून दि. महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ मुंबई”“जिल्हा पणन कार्यालय रत्नागिरी” यांच्या वतीने जिल्हयात 14 धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी करण्यात येते. शासनाने धान खरेदी साठी 31 जानेवारी अखेर नाव नोंदणी करता मुदत वाढवून दिली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी धान पीकाची हंगाम-२०२३-२४ ची…
जनजागृती आणि शास्त्रशुध्द नियोजन करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : जीवन अतिशय अमूल्य आहे. जीवापेक्षा कोणतीच संपत्ती मोठी नाही. सृष्टीच्या नियमानुसार नैसर्गिक मृत्यु सर्वांनाच आहे. मात्र अनमोल जीव निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात गमावू नका. प्रत्येक जण रस्ता सुरक्षा समितीचा सदस्य आहेत. त्यामुळे आपल्या हातून कोणतीही चूक किंवा अपघात होणार नाही, असा संकल्प करून चंद्रपूर जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सकारात्मक जनजागृती आणि शास्त्रशुद्ध नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलिस विभागामार्फत जिल्ह्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता…
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत दिवंगत खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी 1952 मध्ये कुस्ती क्रीडा प्रकारात पहिले कांस्यपदक पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याचा बहुमान व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. चंद्रपूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कुस्ती, आष्टे डु आखाडा, व्हॉलीबॉल, रस्साखेच, मैदानी, लंगडी, लगोरी, सिलंबम, मॅरेथॉन क्रीडा स्पर्धा, चित्रकला व निबंध स्पर्धा आदी उपक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर व तालुका क्रीडा संकुल,…
पो.डा. वार्ताहर , नागपूर : जिल्हा माहिती कार्यालयाच्या महानाट्य व महासंस्कृती महोत्सवासाठीच्या चित्ररथाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून महानाट्य व महासंस्कृती महोत्सवाची प्रसिद्धी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून 9 जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या या चित्ररथाला अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक स्पर्धांचे आयोजन पो.डा. वार्ताहर , नागपूर : शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात कालिदासाच्या भूमीतून रामटेक येथून 19 जानेवारीला होणार आहे. 23 जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक प्रकारच्या स्पर्धा या कालावधीत होणार आहेत. सायंकाळी मुख्य कार्यक्रम 7 वाजता सुरु होईल. तर दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कवि कालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महा खिचडीचे प्रात्यक्षिक,लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा ,फोटोग्राफी व पेंटिंग स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा , एयरोमॉडलिंग शो, फुड फेस्टिवल आणि दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अशी खास पर्वणी नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान,…
हजारो पणत्यांची आरास करुन रामभक्त बनविणार एक भव्य विक्रमी वाक्य ! अभिनेता पुनित इस्सर यांचे रामायण महानाट्य तर महिला तबला वादक अनुराधा पाल यांचा लाइव्ह इन कन्सर्ट ! पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जय्यत तयारी सुरू पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : श्रीरामजन्मभूमी स्थळी उभारलेल्या भव्य दिव्य मंदिरात श्री रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पवित्र अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण विश्व या ऐतिहासिक क्षणाची वाट बघत असताना चंद्रपूर शहर आणि जिल्हादेखील तयारीला लागला असून 20 ते 22 जानेवारी 2024 या तीन दिवसांत भरगच्च आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे चंद्रपूरकर रामभक्त नागरिक प्रभू श्रीरामाची आराधना करणार आहेत; विशेष म्हणजे यानिमित्त 20 जानेवारी रोजी…
पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : गेले तीन दिवस येथे चाललेल्या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप आज झाला. विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात सर्वसाधारण आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या विजेतेपदाचा मानकरी यजमान पद असलेला रत्नागिरी जिल्हा ठरला तर, उपविजेते पद मुंबई उपनगर जिल्ह्याला मिळाले. पारितोषिक वितरण समारंभ प्रंसगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ.कल्याणकर म्हणाले, स्पर्धा सकारत्मकतेने घेतली पाहीजे. रत्नागिरीने 368 गुण मिळवत विजेतेपद मिळविले. हा एकोपा असाच टिकवून ठेवा. प्रशासकीयदृष्टया देखील कोकण विभाग पुढे आहे. महसूल विभागात अनेक चांगले…
पो.डा. वार्ताहर : मुलुंड (पूर्व) येथे कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे आज मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल त्याशिवाय शामराव पेजे महामंडळाला अधिकचा निधी आणि परळ येथील वास्तूलाही आवश्यक निधी दिला जाईल. याबरोबरच तालुका स्तरावरील कुणबी भवनसाठी सर्वतोपरी मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, खासदार मनोज कोटक आदी उपस्थित होते.
जागतिक ख्यातीच्या कलाकारांसोबत स्थानिक कलांचेही सादरीकरण पो.डा. वार्ताहर , नागपूर : राज्य शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात कालिदासाच्या भूमीतून रामटेक येथून 19 ते 23 जानेवारीला होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज या संदर्भातील आढावा घेतला. रामटेकचे नेहरू मैदान या आयोजनासाठी सज्ज होत असून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज आयोजनाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा, सांस्कृतिक व पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील…