- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर व मॉडल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 96 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा, येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. आनंद निकेतन महाविद्यालयचे प्राचार्य मृणाल काळे हे उदघाटक म्हणून तर औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भालचंद्र रासेकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार/स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा तसेच उद्योजकांनी रोजगार उपलब्ध करून दयावा, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास…
29 फेब्रुवारीपर्यंत ईच्छुक खरेदीधारकांकडून दरपत्रक आमंत्रित पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर,दि.26 : उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील रुग्णालयीन निर्लेखीत उपकरणे व जडसंग्रह साहित्याचे स्थानिक स्तरावर दरपत्रके मागवून जाहीर लिलाव करण्यात येत आहे. सदर निर्लेखनपात्र जडसंग्रह साहित्याची किंमत 37 हजार 553 तर निर्लेखनपात्र उपकरणांची किंमत 61 हजार 844 ठरविण्यात आली आहे. खरेदीधारकांनी आपले दरपत्रक ठरविलेल्या किंमतीपेक्षा ज्या खरेदीधारकांचे दर जास्त असेल त्याच खरेदीधारकास सदर साहित्य व उपकरणे देण्यात येतील. ईच्छुक खरेदीधारकांनी आपले दरपत्रक बंद लिफाफ्यासह दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील कार्यालयात सादर करावेत. असे वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी कळविले आहे.
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर व तालुका विधी सेवा समिती, गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता दलित मित्र वि.तु.नागापुरे डी.एड कॉलेज, गोंडपिपरी येथे विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी सल्ला व सहाय्य दिल्या जाणार असून सर्व शासकीय आणि निमशासकीय योजनांचे लाभ व त्यांची…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित पोलीस एक्स्पो कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, शिक्षणाधिकारी(माध्य.) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते समाजामध्ये पोलीस आदर्श नागरिक असून समाजाचे रक्षण…
पो.डा. वार्ताहर , मुंबई :- भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देतानाच भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपुल व रेल्वे अंडरपासच्या भूमीपूजन व लोकार्पण, उद्घाटन कार्यक्रम झाला. यावेळी रेल्वेमंत्री…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : देशातील विविध आरोग्य सेवा, पायाभुत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा औषधी भांडारच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक संचालक (आरोग्यसेवा) डॉ. आनंद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सावलीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य पुष्पा पोडे उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, चंद्रपूर येथे नवीन औषध भांडाराचे तसेच तडाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी – कर्मचारी यांच्या…
पो.डा. वार्ताहर, नागपूर : महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशी नेतृत्व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विखारी वक्तव्य करून मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी त्यांची जात दाखवली, अशी टिका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आणि परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राचे राजकारण दूषित करणारे हे वक्तव्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेल्या समृद्ध, शालीन परंपरेला कलुषित करण्याचे काम मनोज जरांगे यांनी केले आहे, असा घणाघात देखील ऍड. मेश्राम यांनी केला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, सक्षमीकरणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य एकदा जरांगे पाटलांनी अभ्यासण्याची गरज आहे.…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित पोलीस एक्स्पो कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, शिक्षणाधिकारी(माध्य.) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते समाजामध्ये पोलीस आदर्श नागरिक असून समाजाचे…
पो.डा. वार्ताहर , परभणी : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करावी, असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वीप ( Systematic Voters Education and Electoral Participation ) समितीच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) गणेश शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, जिल्हा माहिती व विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर, महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जगताप, नायब तहसीलदार सतिश रेड्डी, जलतरण पटु डॉ. राजकुमार कालानी, राष्ट्रीय धावपटू कु. ज्योती गवते उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी…
प्रभूरामाच्या चरणी सेवा अर्पण करून आयुष्य सार्थकी : ना. सुधीर मुनगंटीवार ३३ हजार २५८ पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ कडून प्रमाणपत्र प्रदान ‘सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषाने दुमदुमली चंद्रपूर नगरी पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर – मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरी. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर. ३३ हजार २५८ पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. याची दखल घेत आज (रविवार) गिनेस बुक…