- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
औद्योगिक शांतता ठेवण्यासाठी कामगारांचे प्रश्न प्राथमिकतेने सुटावे – आ. किशोर जोरगेवार विविध कामगार संघटनांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर,:चंद्रपूर हा वीज उत्पादक जिल्हा आहे. परिणामी वीज कामगारांची संख्या येथे अधिक आहे. मात्र कामगारांच्या अनेक मागण्या आजवर सुटु शकलेल्या नाही. राज्याला उजेळात ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणा-या कामगारांच्या समस्या आपण प्राथमिकतेने सोडविल्या पाहिजे. औद्योगिक शांती राखण्यासाठीही हे गरजेचे असल्याचे आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटले असून कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. विविध विज कामगार संघटनांच्या नेत्यांना घेऊन आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी…
‘शिवजागर’द्वारे २०० कलाकार मांडणार छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास! पोलीस डायरी, नवी दिल्ली प्रतिनिधी,: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नवी दिल्ली येथे ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल २०० कलाकार आपल्या सादरीकरणातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास मांडणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून विवेक व्यासपीठाने कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. या कार्यक्रमात…
धार्मिकता, सांस्कृतिक आणि सामूहिकतेचे वातावरण निर्माण करणे हाच भजन महोत्सवाचा उद्देश – आ. किशोर जोरगेवार पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर,: दरवर्षी प्रमाणे यंदा सुध्दा आपण भजन महोत्सव आयोजित केला आहे. दोन दिवस येथे टाळ, मृदंग वाद्यांच्या साथीत ईश्वराचे गुणवर्णन व नामस्मरण केल्या जाणार आहे. यातून धार्मिकता, सांस्कृतिक आणि सामूहिकतेचे वातावरण निर्माण होणार असुन हाच या आयोजना मागचा उद्देश असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर यांनी केले आहे. यंग चांदा बिग्रेडच्या वतीने अंचलेश्वर मंदिर येथे आयोजित विविध भाषीय दोन दिवसीय भजन महोत्सवाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे सचिव…
शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण चंद्रपूर, दि.7 : जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अशा या वाघांच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करणे, हे माझे सौभाग्य आहे, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रियदर्शनी सभागृह येथे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टपाल तिकिट, छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे, मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड – 1, ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि महाराष्ट्र : गोंड समुदाय या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर…
महिला सक्षमच…गरज आहे फक्त आर्थिक सक्षमीकरणाची-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पो.डा. वार्ताहर, छत्रपती संभाजीनगर :- अगदी पुरातनकाळापासूनचा इतिहास अभ्यासला तरी असे दिसून येते की महिला ह्या सक्षमच आहेत. जिथला कारभार महिलांच्या हाती असतो ते घर असो वा संस्था नेहमीच प्रगती करते. आता गरज आहे ती महिलांना आर्थिक सक्षम करण्याची, त्यासाठीची उर्जा यानिमित्ताने घ्यावी,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला सन्मान मेळावा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला होता. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या मेळाव्यास नाबार्डचे महाव्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा अग्रणी बॅंक समन्वयक मंगेश केदारे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प व्यवस्थापक अशोक शिरसे, माविमचे…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : ‘वन से धन’ तक जाण्यासाठी वनक्षेत्रात मोठी शक्ती आहे. अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी चंद्रपूरचे काष्ठ पाठविण्यात आले आहे. भविष्यातील 1000 वर्षाचा विचार करून अयोध्येतील राममंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिरासाठी पाठवलेले काष्ठ हे 1000 वर्ष टिकू शकते, असे संशोधनात सिद्ध झाले आहे, असे राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ताडाळी एम.आय.डी.सी. येथे प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्राचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, जिल्हाधिकारी विनय गौडा, बांबू विकास महामंडळाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुमित कुमार, श्रीनिवास राव, संजीव रॉय, वनविभागाचे उपसंचालक नंदकिशोर काळे, वन अधिकारी…
पो.डा. वार्ताहर, बुलडाणा : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सरळसेवेतील पदभरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सैनिक कल्याण विभागाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची पदे भरण्यासाठ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दि. 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा कालावधी देण्यात आला होता. परंतू लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज मागविण्याचा कालावधी दि. 4 ते 24 मार्च 2024 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. याचा माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या दि.०७ मार्च (गुरुवार) छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण होणार आहे. चंद्रपूरमधील प्रियदर्शनी सभागृहात सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष राज्य सरकारच्या वतीने साजरे केले जात आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गुरुवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण केले जाणार आहे. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण होणार आहे. याशिवाय मराठेकालीन टाकसाळी संबंधीची…
सुट्रेपाडा गावात शिवरात्र सप्ताह निमित्त अभिलाल दादा देवरे यांच्या मार्गदर्शनातून सेवा हॉस्पिटलचे सर्व रोगनिदान मोफत आरोग्य शिबीर संपन्न. पोलीस डायरी, राजन चौक, जिल्हा प्रतिनिधी, धुळे : सुट्रेपाडा गावात 12 वर्षे तप पूर्ण झालेत शिवरात्र सप्ताह त्या निमित्ताने आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे, संस्थापक सचिव कविताताई अभिलाल देवरे, महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब अहिरे, प.महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. वंदनाताई शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुट्रेपाडा ता. जि. धुळे येथे दि. ०६/३/२०२४ बुधवार रोजी सेवा हॉस्पिटलचे सर्व रोग निदान मोफत शिबिर घेण्यात आले, शिबिरात सुट्रेपाडा गावातील नानाभाऊ मोरे, योगेश मोरे, वामन देवरे, निर्मलाताई देवरे, शांताबाई मोरे, अंजनाबाई पदमर, अनुबाई सोनवणे, राजधर…
आम्ही उद्योगांसाठी रेड कारपेट टाकतोय तर उद्योगांनीही स्थानिकांसाठी ग्रीन सिग्नल ठेवावा – आ. किशोर जोरगेवार पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर: चंद्रपूरात आजवर प्रदूषण निर्माण करणारेच उद्योग आलेत. पिरणामी 40 टक्के पेक्षा अधिक वन आच्छादन असुनही चंद्रपूर जिल्हा प्रदुषणाच्या बाबतीत देशात ओळखला जातो. असे असतांनाही आम्ही उद्योगांसाठी रेट कारपेट टाकत आहोत. तर उद्योगांनीही आपल्या उद्योगात स्थानिकांसाठी कायम ग्रिन सिग्नल ठेवावा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. महाराष्ट्र औद्योगीक विकास मंडळ, जिल्हा प्रशासन आणि एम.आय.डी सी असोशिएशनच्या वतीने ऍडव्हान्टेज चंद्रपूर 2024 इंडस्ट्रिीयल एस्पो आणि बिजझनेस कॉन्व्लेव्हरचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वन मंत्री तथा जिल्हाचे…