Author: Police Diary

पो.डा. वार्ताहर , धुळे ग्रामीण:-गोंदूर येथे धुळे ग्रामीण पश्चिम भाजप कार्यालय शुभारंभ शुक्रवारी दिनांक ०८ मार्च रोजी शिवरात्री च्या पवित्र पावन दिवशी भाजप जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे यांच्याहस्ते करण्यात आला.‘राजकीय पक्षाचे कार्यालय हे जरी त्यांच्या कामाच्या सुलभतेसाठी असले तरी ते जनसेवेचे स्थान असते. इथे लोक आपल्या समस्या घेऊन येतात.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे निराकरण करायचे असते.केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी हे कार्यालय असून या माध्यमातून नागरिकांच्या शासकीय पातळीवरील विविध समस्या आणि तक्रारींचे निराकरण करण्यासह त्यांना शासकीय योजना विषयक मार्गदर्शन केल्यास भारतीय जनता पक्षाचे हे नुतन कार्यालय लोकसेवेचे केंद्र बनेल,’ असा विश्वास बाळासाहेब भदाणे यांनी…

Loading

Read More

आपल्या कामाचे मूल्यमापन कोणी तरी करेल, ही अपेक्षा ठेवू नका, स्वतःला ‘अबला’ समजणे बंद करा आणि स्वतःला ‘सबला’ समजा: असे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे महिलांना आवाहन पोलीस डायरी प्रतिनिधी वाशीम, :आपल्या कामाचे मूल्यमापन कोणी तरी करेल, ही अपेक्षा ठेवू नका. स्वतःला ‘अबला’ समजणे बंद करा आणि स्वतःला ‘सबला’ समजा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा माहिला व…

Loading

Read More

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत पोलीस डायरी, प्रतिनिधी,बुलडाणा, : जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती व इतर योजनांचे नवीन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे. आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय निमशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयात राबविली…

Loading

Read More

पाणी टंचाई निवारणार्थ टँकर मंजुर पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सुरा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी कळविले आहे.

Loading

Read More

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 20 टक्के सेस फंडातून साहित्याचे वाटप पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 20 टक्के सेस फंड योजनेंतर्गत सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी मागासवर्गीय शेतकरी, मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या योजनेतून 5 एचपी विद्युत मोटार पंप, एचडीपीई पाईप, मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशिन पुरविण्याची योजना घेण्यात आली होती. सदर योजनेचे ज्या लाभार्थ्यांनी अर्ज पंचायत समितीमार्फत समाज कल्याण विभागाकडे केले आहेत, अशा पात्र लाभार्थ्यांची निवड यादी पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर लाभार्थ्यांनी आपली देयके पंचायत समितीमध्ये तात्काळ सादर करावे, असे जिल्हा…

Loading

Read More

आरसेटीमध्ये महिला दिन साजरा पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा, : भारतीय सेंट्रल बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटीमध्ये 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यात आरसेटी कर्मचारी आणि महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरसेटीमधून प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू केलेल्या यशस्वी महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांना विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

Loading

Read More

धरण, नाल्यातील गाळ काढण्याची मोहिम राबवावी -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पोल्स डायरी,बुलडाणा, प्रतिनिधी, : धरणातील गाळ काढणे आणि नाला खोलीकरणासाठी राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पुरामुळे गाळ साचल्याने नाला खोलीकरणास वाव आहे. त्यामुळे जिल्ह्यात धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासाठी मोहिम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे, मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, गाळमुक्त धरण…

Loading

Read More

सोमवार दि.११ मार्च, २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय -संक्षिप्त पोलीस डायरी मुंबई प्रतिनिधी, बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार ( गृहनिर्माण विभाग) बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार. ( गृहनिर्माण विभाग) यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू ( वस्त्रोद्योग विभाग) एमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी ( नगरविकास ) मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार ( नगरविकास विभाग) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र ( राज्य उत्पादन शुल्क) जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता ( वित्त विभाग) राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद (गृह विभाग) एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना…

Loading

Read More

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांनी मंजूर 150 कोटी रुपयांच्या 192 विकास कामांच्या भूमिपूजनाला सुरवात. कार्यकर्त्यांना भूमिपूजनाचा मान, भूमिपूजनाचा विक्रम, चार दिवस चालणार भूमिपूजन सोहळा पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून विविध विभागाच्या निधी अंतर्गत मंजुर मतदार संघातील 150 कोटी रुपयांच्या 192 विकासकामांच्या भूमिपूजनाला आज सुरवात झाली असून आज ८८ कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व भुमिपूजनाचा मान आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. या विकासकामांमुळे नागरिकांच्या सोयी सुविधेत भर पडणार आहे. सदर भूमिपूजन सोहळा पुढील चार दिवस चालणार असून हा भूमिपूजनाचा विक्रम असल्याचे बोलल्या जात आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर…

Loading

Read More

सावित्रीबाई फुलेंच्या १२७ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासंदर्भात  या लेखाला निमित्त होते पुणे विद्यापिठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव दिल्यानंतर त्या विद्यापिठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या पुर्णाकृती पुतळ्याचे ! बरोबर पंचवीस महिन्यांपुर्वी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न करण्यात आला होता .अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यामधून आणि तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमधुन सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. हा भव्य असा १२ फुट उंचीचा सावित्रीबाई फुले यांचा हा पुर्णाकृती पुतळा पुणे विद्यापीठ कॕम्पसमध्ये मुख्य इमारतीच्या आवारात उभारण्यात आला आहे. कात्रज पुणे…

Loading

Read More