- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
गांधी चौक चंद्रपूर येथे भव्य स्वागत समारंभ संपन्न पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी जगातील सर्वांत जास्त वाघ असणाऱ्या ताडोब्याचा ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. आता जिल्ह्यातील वाघांचे प्रतिनिधित्व करीत, ‘आम्ही मागास नाही’ अशी डरकाळी लोकसभेत फोडायची आहे, असा निर्धार राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. गांधी चौक चंद्रपूर येथे भव्य स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय रेड्डी बोदकुलवार, संदीप धुर्वे, अशोक उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगरा भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, लोकसभा प्रमुख प्रमोद…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : १३ मार्चला अंदमान-निकोबारला गेलो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं होतं त्या दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हाच माझा सहकारी धावत आला आणि म्हणाला, ‘भाऊ, तुमचे तिकीट घोषीत झाले’. योगायोग कसा असतो हे मी अनुभवतो आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीरांचे दर्शन आणि दुसरीकडे देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आदेश होता, असा भावनिक प्रसंग ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रथम चंद्रपूर आगमनानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. गांधी चौकात झालेल्या सभेत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘१३ मार्चला पक्षाने मला अंदमान-निकोबारला पक्षाचा लोकसभा प्रभारी…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर :- नवजीवन महिला योग समितीच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर, येथे महिला दिन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवजीवन महिला योग समितीच्या प्रमुख सौ सपनाताई नामपल्लीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. उद्घाटक सौ.सपनाताई मुनगंटीवार या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रेरणा कोलते, सविता कामडे, डॉ. ऋतुजा मुंदडा, मेघाताई मावळे, वर्षा कोटेकर, सारिका बुरांडे, प्रतिभा पाटील तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. सपनाताई मुनगंटीवार व अन्य उपस्थित अतिथीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. अरुणा शिरभैय्ये यांनी सुमधुर स्वरात स्वागत गीत व सरस्वती स्तवन सादर केले. ह्याच कार्यक्रमाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या…
वरोरा तालुक्यातील भटाळा येथील गावकऱ्यांनी मानले आभार पो.डा. वार्ताहर,चंद्रपूर : एखाद्या गावाचे समाधान करण्यासाठी फक्त आश्वासन देऊन मी थांबत नाही. एकदा शब्द दिला की तो पूर्ण करतो आणि एवढेच नव्हे तर संकल्प करून विकासाच्या प्रवाहात ते गाव सामील करून घेतो. कारण आदर्श गावांचे निर्माण, हाच माझा संकल्प असतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दि.१९ मार्च (मंगळवारी) केले. वरोरा तालुक्यातील भटाळा येथील श्री महादेव मंदिराला व ऋषी तलावाकरिता ३ कोटी १३ लक्ष रुपयांचा निधी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून देत गावाच्या प्रगतीची दारे…
– वणी येथे भाजपच्या बुथ आणि शक्ती केंद्र प्रमुखांशी संवाद काँग्रेसच्या फसव्या प्रचारापासून मतदारांना सावध करा पो.डा. वार्ताहर , वणी : भाजपाच्या तिकीटावर विधानसभेसाठी 16 मार्च 1995 ला जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हाही जनतेची सेवा हेच लक्ष्य होते, आज विश्वगौरव व राष्ट्रभक्त देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या आग्रहावरून लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठीच उभा आहे तेव्हा गतिशील विकास आणि जनतेचा विश्वास हेच ध्येय आहे असे प्रतिपादन राज्यांचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वणी येथे आयोजित बुथ कार्यकर्ता व शक्ती केंद्र प्रमुख…
स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांची धडक मोहीम : घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या आवरल्या मुसक्या पोलीस स्टेशन, रामनगर तसेच स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची संयुक्त कार्यवाही पोलीस डायरी, गुन्हे वार्ताहर, चंद्रपूर: दिनांक १८/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे खुशाल भागचंद अडवानी वय ३८ वर्ष व्यवसाय व्यापार रा. सिंदी कॉलनी रामनगर चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन, रामनगर येथे तक्रार दिली की, दिनांक १५/०३/२०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजता दरम्यान यातील फिर्यादी हा त्याचे परिवारासह विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे नातेवाईकाचे घरी कार्यक्रमाकरीता घराचे समोरील दरवाज्याला लॉक करून गेले. नातेवाईकाच्या घरचा कार्यक्रम पुर्ण करून दिनांक १८/०३/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजता घरी परत आले. यातील फिर्यादी हा त्यांचे बॅग हे…
पोलीस अधीक्षकांनी धाड टाकून रेती तस्करांची कोट्यावधीची हायवा, पोकलेन मशीन सह दिड कोटीचा मुद्देमाल जप्त मा. श्री. मुम्मका सुदर्शन, यांनी अवैध रेती चोरीवर आळा घालण्या करीता धडक मोहिम हाती पोलीस डायरी, गुन्हे वार्ताहर, चंद्रपूर :- दि.20/03/2024 रोजी रात्री मा. पोलीस अधीक्षक साहेब यांना विश्वसनीय सुत्राकडून खात्रीशीर खबर मिळाली की, मौजा अजयपुर, गोंडसावरी अंधारी नदीपात्रात ट्रकमध्ये अवैध्यरित्या रेती चोरी सुरू आहे. अशा खबरे वरून पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः पथकासह खाजगी वाहनाने अजयपुर गोंडसावरी अंधारी नदी रेती घाटावर जावून पाहणी केली असता, रोडवर संशयितरित्या एक बोलेरो पिकअप गाडी क्र. MH34BF 1809 हि दिसून आली, गाडीमध्ये मोहम्मद शाहरूख इस्राईल…
वढा तीर्थक्षेत्राचा होणार दैदिप्यमान विकास: आ. किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून वढा तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर: विदर्भातील पंढरपूर समजल्या जाणा-या वढा तिर्थक्षाचा विकास करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला होता. यासाठी शासन दरबारी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या या पाठपूराव्याला यश आले असुन सदर विकासकामासाठी पहिल्या टप्यात 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून वढा तीर्थक्षेत्राचा दैदिप्यमान विकास होईल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूरातील माता महाकाली मंदिर आणि वढा येथील विठ्ठल रुखमाई मंदीराचा विकास करण्याच्या संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. माता…
भाजपाच्या नारीशक्ती वंदन अभियानात बचत गटाच्या महिलांचा सन्मान अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या उपस्थितीने सखींच्या उत्साहाला उधाण —————– पो.डा. वार्ताहर , चाळीसगाव : – ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबांमध्ये आर्थिक सुबत्ता यावी यासाठी बचत गटाच्या माध्यमातून नारीशक्तीने गाव तांडा वस्ती पर्यंत आर्थिक साक्षरतेचा चंग बांधला आहे.आपल्या संसाराच्या रहाटगाडग्यातून अधिकाधिक वेळ काढून सर्व महिला शक्तीने एकमेकांना सोबत घेऊन मोठी क्रांती केली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या नारी शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी नारीशक्ती वंदन अभियान राबविण्याची आव्हान केले होते.या अनुषंगाने स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी आज स्त्री शक्ती वंदन कार्यक्रमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून आज शिवमय वातावरणात स्त्री…
पो.डा. वार्ताहर : राज्यात या वर्षी कमी पर्जन्यात झाल्याने सर्वत्र पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिना सुरु झाला असून लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत.अर्थात उष्णतेचा चटका हा नागरिकांना बसणार असून निवडणूकीचा फटका कुणाला बसतो तो निवडणूका संपल्यावरच कळेल. धुळे जिल्हयात देखील पाणी टंचाईचे वारे वाहू लागले असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. राज्यात या खरीप हगांमात ज्या प्रमाणात पाऊस व्हायला हवा होता त्या प्रमाणात झाला नाही. राज्यातील धरणांमध्ये आवश्यक असलेला जलसाठ जमा न झाल्याने वृत्त प्रसारमाध्यमांनी या अधीच दिले होते. मराठावाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस न झाल्याने मार्च महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत.…