Author: Police Diary

पो.डा. वार्ताहर , नागपूर. :  एकदा तोंडातून शब्द काढला तो पूर्ण करणारच नव्हे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जबाबदारी सोपविलेल्या व्यक्तीकडून पाठपुरावा करून तो विषय पूर्णत्वास नेला जाईल, याकडे कटाक्षाने लक्ष देणारा नेता म्हणजे श्री. नितीन गडकरी, प्रतिपादन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांनी ‘नितीनजी म्हणजे द मॅन ऑफ वर्ड्स’ असे विशेषन लावून त्यांच्याप्रति भावना व्यक्त केली. खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे विविध क्रीडा संघटना, खेळाडूंची बैठक शनिवारी (ता.२३) रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे घेण्यात आली. या बैठकीत नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र फडणवीस, नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे…

Loading

Read More

युकेचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार जॉन एम निकेल यांची अम्मा का टिफीन उपक्रमाला भेट, उपक्रमाचे केले कौतुक पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर,:-अम्मा का टिफिन हा उपक्रम आता राज्यभर चर्चेला जात असतांना आज युनायटेड किंगडम सरकारचे फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस एशिया पॅसिफिकचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार प्रमुख जॉन एम निकेल यांनी आज अम्मा का टिफिन उपक्रमाची भेट घेत उपक्रमाचे कौतुक केले आहे. यावेळी गंगुबाई ऊर्फ अम्मा, आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष गौर, कल्याणी किशोर जोरगेवार, श्री महाकाली माता महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष पवन सराफ, एड. दीपक चटप यांची उपस्थिती होती. अम्मा यांच्या सुचनेनंतर आमदार…

Loading

Read More

“चुकीला माफी नाही” या व्हायरल पत्राशी कुठलाही संबंध नाही – काँग्रेसचा पत्रकार परिषदेत खुलासा पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर :-  देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून कुणबी समाजाच्या नावावर राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. समस्त कुणबी समाजाच्या नावाने एक पत्र अलीकडेच सोशल मीडियावर वायरल करण्यात आले आहे. ‘चुकीला माफी नाही’ या शीर्षकाखाली हे पत्र व्हायरल करण्यात आले, परंतु या पत्रातून आमदार प्रतिभा धानोरकर यांचा लोकसभा मतदारसंघावर कसा अधिकार आहे हे दाखवण्यात आले. समाजाच्या नावावर भावनिक आवाहन करण्यात आले. या पत्रात त्यांनाच उमेदवारी मिळावी…

Loading

Read More

बॉटनिकल गार्डनच्या लोकार्पण सोहळ्यात ना. श्री. मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर – एखादे काम हाती घेतले की पूर्ण शक्ती पणाला लावून ते पूर्णत्वास नेणारे मंत्रीमंडळातील माझे वरीष्ठ सहयोगी सुधीरभाऊ हे दूरदृष्टी लाभलेले लोकप्रतिनिधी आहेत, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक केले. चंद्रपूर येथील विसापूर बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या अमृत २ योजने अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर…

Loading

Read More

श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने महाकाली मंदिर येथे महाआरती व भजनाचे आयोजन महोत्सव समितीचे सचिव अजय जयसवाल यांनी केली सपत्निक आरती पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर:  श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने महाकाली मंदिर येथे महाआरती, भजन व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे सचिव अजय जयसवाल यांना महाआरतीचा मान मिळाला. त्यांनी सपत्निक माता महाकालीची आरती केली. यावेळी श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष एड. विजय मोगरे, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त मिलिंद गंपावार, सुनिल महाकाले, राजेश शास्त्रकार,श्याम धोपटे, मधुसुदन रुंगठा, विलास मसराम, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला…

Loading

Read More

१) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या. २) १०० मि. लि. पाण्यात एक चमचा मेथी दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे व जेवणानंतर हे मेथीचे दाणे चाऊन खावे, याने सकाळी पोट साफ होते. ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर पाण्यासोबत घ्या. ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे. ५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे. ६) दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे आणि वरून दूध घ्यावे. ७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे. ८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक…

Loading

Read More

‘ओम्’ उच्चारणे फक्त अध्यात्मिकच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. रोज फक्त पाच मिनिटे ‘ओम्’ उच्चारण केल्याने मानसिक आणि शारीरिक फायदे होतात. कसे करावे ‘ओम्’ उच्चारण ? ‘ओम्’ उच्चारण करण्यासाठी आरामदायी स्थितीत बसा. डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या आणि नंतर ‘ओम्’ उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा. या काळात पूर्ण शरीरात कंपन होईल याचा प्रयत्न करा. ‘ओम्’ कार जपाचे महत्त्व आणि परिणाम : १) मानवी मनाची शुद्धता करणे. २) मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे. ३) मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे. ४) शारीरिकदृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव-भावनांवर नियंत्रण आणणे. ‘ओम्’ कार…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, नवी दिल्ली : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सी.ए. परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे मे महिन्यात घेतल्या जाणार आहेत परंतु त्याच्या तारखा मात्र बदलण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार, गट १ ची इंटरमीडिएट अभ्यासक्रमाची परीक्षा ३, ५ आणि ९ मे २०२४ रोजी होणार आहे. यापूर्वी, ही परीक्षा ३, ५ आणि ७ मे २०२४ रोजी होणार होती. गट २ साठी, इंटरमिजिएट अभ्यासक्रमाची परीक्षा ११,१५ आणि १७ मे २०२४ रोजी होणार आहे. यापूर्वी, ही परीक्षा ९, ११ आणि १३ मे २०२४ रोजी नियोजित होती. अंतिम परीक्षेसाठी, गट १ साठी २, ४ आणि ८ मे २०२४…

Loading

Read More

उसगाव येथील अपघातात मृत्यु झालेल्या मोहन राजुरकर याच्या कुटुंबीयांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली सांत्वनपर भेट पोलीस डायरी, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी: स्कुल बसच्या धडकेत उसगाव येथील मोहन राजुरकर या 26 वर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची घटना 18 मार्च ला उसगाव कॉर्नर जवळ घडली होती. या अपघातात दोघे जखमी झाले आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उसगाव येथील मृतक मोहनच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळी सदर कुटुंबाला आर्थिक मदतही केली. कामानिमित्त तीन मित्र दुचाकीने उसगांव वरून निघाले होते. दरम्यान उसगाव कॉर्नर जवळ एका खाजगी स्कुल बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात 26 वर्षीय मोहन राजुरकर यांचा जागीच मृत्यु झाला तर…

Loading

Read More

1667 कोटींच्या विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन पुढील तीन महिने बॉटनिकल गार्डन पर्यटनासाठी मोफत : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर  : चंद्रपूरला आजही ‘चांदा’ या नावाने ओळखले जाते. आज येथे 1667 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने चांदाची खऱ्या अर्थाने चांदी आहे. येथील बॉटनिकल गार्डन हे जागतिक दर्जाचे असून महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. चंद्रपूर येथे बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री…

Loading

Read More