Author: Police Diary

पालकमंत्र्यांनी घेतला विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजना अनुदानाची रक्कम बँकेने कपात करू नये- पालकमंत्री अब्दुल सत्तार पोलीस डायरी प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीककर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना द्यावे, असे निर्देश पणन,अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक प्रतिनिधीना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा योजना, बळीराजा वीज सवलत योजना,वयोश्री आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांचा आढावा बैठकीमध्ये घेतला. जिल्हाधिकारी दिलीप…

Loading

Read More

ब्लू लाईनवर असलेल्या घरांवर सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवा – आ. किशोर जोरगेवार बैठक घेत मनपा प्रशासनाला निर्देश पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, चंद्रपूर: चंद्रपूर शहर वाढत असताना नागरी वस्त्यांसमोर वन विभाग, पुरातन विभाग यांच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच आता ब्लू लाईनवरील बांधकामावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांनी  जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित  करत. “एकाही घराला हात लावू नका, ब्लू लाईनवरील घरांवरील कारवाई तात्काळ थांबवा,” असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना दिले आहेत. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला मनपा आयुक्त विपिन…

Loading

Read More

महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा मंत्रालयात महिलांच्या वस्तूचे प्रदर्शन पोलीस डायरी प्रतिनिधी, मुंबई, :महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने राज्यातील महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

Loading

Read More

अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल: मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही पोलीस डायरी प्रतिनिधी, जळगाव – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असून यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे सुरु ठेवण्यात येतील, असे मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रूपये देण्यात येतील. त्याचबरोबर एमआयडीसीत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग आणण्यात येतील. अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी…

Loading

Read More

नवनिर्माण यात्रेचा दुसरा टप्पा विदार्भातुन सुरु: येत्या २२ ऑगस्टला राजसाहेब विदर्भात पोलीस डायरी प्रतिनिधी, लोकसभेची रणधुमाळी थंडावली आणि राजकीय पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लगबग सुरु असताना येत्या विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनिर्माण सेनेने नवनिर्माण यात्रेचे आयोजन केले आहे त्याचा दुसऱ्या टप्पाबाबत प्रसिद्धीपत्रकातून कळवले आहे. आगामी विधानसभांच्या निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर राजसाहेबांच्या दौऱ्याच्या रूपाने ‘नवनिर्माणाची’ लाट महाराष्ट्रभर येणार आहे. येत्या २२ ऑगस्टला राजसाहेबांच्या नवनिर्माण यात्रेचा दुसरा टप्पा विदार्भातुन सुरु होत आहे. त्याचा तपशील पत्रकात देण्यात आला आहे. #MNSAdhikrut #नवनिर्माण_यात्रा Raj Thackeray Bala Nandgaonkar MNS Adhikrut

Loading

Read More

धरणगाव येथील बालकवी स्मारकाचे ई‌ – भूमिपूजन पोलीस डायरी प्रतिनिधी, जळगाव,:- “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात केले. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रूपये देण्यात येतील. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग आणण्यात येतील. अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला…

Loading

Read More

जिल्ह्यातील पहिल्या प्रतिपालक जोडप्याला मंजूरी पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा, :कुटुंबांशिवाय बालगृहात राहणाऱ्या बालकांना आई-वडील, नातेवाईक, शेजारी आणि मित्र परिवार मिळावा आणि बालकांचा योग्यरित्या सांभाळ व्हावा, यासाठी जिल्हा बाल संरक्षण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील पहिल्या प्रतिपालक जोडप्याला मंजुरी दिली. यात एका नऊ वर्षीय बालकाला आज प्रतिपालकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्र शासानच्या मिशन वात्सल्य योजनेत एक पालक, अनाथ निराधार आणि पालकांकडून सांभाळ करण्यास असमर्थ असलेल्या बालकांचा सांभाळ महिला व बाल विकास विभागाच्या देखरेख संस्थामध्ये केला जातो. ही बालके संस्थेत राहून आपल्या जैविक पालकांची वाट बघत असतात. मात्र अनेकवेळा आई, वडील मृत्यू पावणे, घटस्फोट होणे, कायम अपंगत्व आल्याने व…

Loading

Read More

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला लवकरात लवकर देण्याची ग्वाही पोलीस डायरी प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर – उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची शासनाची भुमिका आहेच. आहे त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल शिवाय आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले जाईल,असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. जिल्ह्यातील बिडकीन एमआयडीसी साठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ, ही सगळी प्रकरणे दि.१७ रोजी मंत्रालयात पाठवावी,असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले. बिडकीन औद्योगिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आज उद्योग मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, अर्जून खोतकर,…

Loading

Read More

विभागीय आयुक्तांकडून शेगाव येथील अतिक्रमणाची पाहणी पोलीस डायरी प्रतिनिधी,बुलडाणा, : शेगाव येथील अतिक्रमणाची विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी पाहणी केली. शेगाव येथील पालखीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. शेगाव शहरात दरवर्षीप्रमाणे श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून आगमन झाले. शेगाव येथे पालखी आल्यावर शहरात श्रींचा पालखी सोहळा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज दि.११ ऑगस्ट रोजी पोहचली. त्याअनुषंगाने श्री गजानन महाराज मंदिराच्या पालखी सोहळ्याची पूर्वतयारी करण्यात आली. शेगाव गेली दोन दिवस शहरात नगर परिषद कर्मचारी, तसेच पोलीस प्रशासनासमवेत अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविण्यात आली. शहरातील रेल्वे स्टेशन ते श्री गजानन महाराज मंदिर परिसरामधील अतिक्रमण हटवून शेगावात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी रस्ता…

Loading

Read More

हर घर तिरंगा उपक्रमात प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवावा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलढाणा, : स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात दि. ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. हर घर तिरंगा उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात येणार आहे. तसेच तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा…

Loading

Read More