Author: Police Diary

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेड न्यूज, फेक न्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कार्य जिल्हा माहिती कार्यालयाच्या मिडीया सेंटर येथून सुरू असून या सेंटरला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कार्यकारी अभियंता तथा निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी मुकेशकुमार टांगले उपस्थित होते. यावेळी श्री. जाटव यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि सोशल मिडीयाच्या मॉनेटरिंगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच सोशल मिडीयावर करण्यात येणा-या पोस्टबाबत अतिशय गांभिर्याने लक्ष ठेवावे, वृत्तपत्रात…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. संजय गायकवाड यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 27 जणांनी 67 अर्जाची उचल केली. यातील संजय रामभाऊ गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी…

Loading

Read More

कोलंबिया लॉ स्कूलमध्ये ‘परिवर्तनात्मक संविधानवादाची ७५ वर्षे’ विषयावर व्याख्यान नागपूर. भारतीय संविधान हा देशातील सर्व नागरिकांसाठी न्याय, समानता आणि सन्मान राखणारा परिवर्तनकारी दस्तावेज आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी कोलंबिया लॉ स्कूलमधील व्याख्यानात केले. संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या भेटीमध्ये मंगळवारी २६ मार्च रोजी न्यूयॉर्क येथील कोलंबिया लॉ स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात मा. न्यायमूर्ती बी.आर.गवई  यांनी ‘परिवर्तनात्मक संविधानवादाची ७५ वर्षे’ (75 Years of Transformative Constitutionalism) या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारतीय संविधानाच्या तीन महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. संविधानाचे परिवर्तनशील उद्दिष्ट, महत्वाच्या कायद्यांद्वारे त्यातील टिकून ठेवलेले सातत्य आणि सर्वोच्च न्यायालयाने विविध क्षेत्रात आपल्या निर्णयाद्वारे टिकवून ठेवलेले परिवर्तनवादी घटनावादाचे मूल्य या पैलूंचे न्या. गवई यांनी विवेचन केले. ते म्हणाले, भारतीय संविधान…

Loading

Read More

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर  : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (27 मार्च) 29 उमेदवारांनी 37 नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणा-या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामनिर्देशनपत्रांची एकूण संख्या 48 झाली आहे. बुधवारी (दि.27 मार्च) अर्ज दाखल करणा-यांमध्ये धानोरकर प्रतिभा सुरेश (काँग्रेस) यांनी 3 अर्ज, बेले राजेश वारलुजी (वंचित बहुजन आघाडी) यांनी 3 अर्ज, विद्यासागर कालिदास कासर्लावार यांनी 1 अर्ज भीमसेना पक्षाच्यावतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून, नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांनी 2 अर्ज, जावेद अब्दूल कुरेशी यांनी 1 अर्ज अपनी प्रजा…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले. मंगळवार, दि. 26 मार्च रोजी विनोद कवडूची खोब्रागडे (अपक्ष), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पाटी), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा गोंडवाना पाटी), मधूकर विठ्ठल निस्ताने यांनी 2 अर्ज (प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया), धानोरकर प्रतिभा सुरेश (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद यांनी 4 अर्ज (भारतीय जनता पार्टी) आणि अतुल अशोक मुनगीनवार (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी 16 इच्छूकांनी अर्जाची उचल केली आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा उद्या बुधवार शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. 28…

Loading

Read More

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता रणदीप हुड्डा यांची उपस्थिती श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चे २० शो नि:शुल्क पो.डा. वार्ताहर, नागपूर :  देशाच्या सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान देश कधिही विसरू शकत नाही. सावरकरांचा गौरवशाली इतिहास, त्यांचे बलिदान, त्याग, समर्पण हे सारे अतिशय समर्पकरित्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात अभिनेते रणदीप हुड्डा यांनी साकारले आहे. हा चित्रपट देशातील जनतेला केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर राष्ट्रनिर्माणात तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट व माजी महापौर श्री. संदीप जोशी यांच्यातर्फे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे २० फ्री स्क्रिनिंग करण्यात येत आहेत. यानिमित्ताने…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर  – जात-पात धर्माचा विचार न करता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी मी काम केले आहे. आताही गोरगरीबांच्या कल्याणाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढविणार आहे. अशा स्थितीत कुठल्याही जातीय आमिषांना किंवा भावनिक आवाहनांना बळी न पडता आपल्या मनाचे ऐका. आपल्याला पुढील पाच वर्षे दुःखात घालवायची आहेत की आनंदात, याचा विचार करा, असे आवाहन करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘देशाच्या विकासासाठी असलेल्या या निवडणुकीत मी तुमचा उमेदवार म्हणून उभा नाही तर तुम्हीच सारे उमेदवार आहात,’ या शब्दांत जनतेच्या हृदयाला स्पर्श केला. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी, 26 मार्च 2024…

Loading

Read More

सुधीरभाऊंना ऐतिहासिक विजय प्राप्‍त करून द्या : चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूरची तोफ दिल्‍लीत धडकणार,विकासाचे दुसरे नाव सुधीर मुनगंटीवार पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर  – महाराष्‍ट्राच्‍या सत्‍तेत परिवर्तन घडवून आणणारे, राज्‍याला हिरवेगार करणारे आणि चंद्रपूरचा चौफेर विकास साधणारे मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार हे नेतृत्‍व-वक्‍तृत्‍व–कर्तृत्‍व याचा तिहेरी संगम असून त्‍यांना ऐतिहासिक मतांनी विजयी करा, असे आवाहन महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील जनतेला केले. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मंगळवारी, 26 मार्च 2024 रोजी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यापूर्वी गांधी चौकात आयोजित करण्‍यात आलेल्‍या सभेला उपमुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस संबोधित करत होते. यावेळी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर : धनगर समाजाचे दैवत आदर्श राजे मल्हारराव होळकर जयंती निमित्ताने आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे, संस्थापक सचिव कविताताई अभिलाल देवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17-3-2024 गोताणे येथे व दि. 20/3/2024 रोजी सांजोरी ता. जि. धुळे येथे सेवा हॉस्पिटलचे मोफत सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले, शिबिरात राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी, भुषण पाटील, जुलाल पाटील, अभिलाल दादा देवरे, डॉ.अर्जुन मराठे त्यांचा स्टॉप व गावातील सर्व माता बगिणी ज्येष्ठ, श्रेष्ठ व तरुण मित्र तसेच आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, गावातील लोकांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला. अभिलाल दादा देवरे…

Loading

Read More

काँग्रेस करते ‘सेटिंग-फिटिंग’चे राजकारण वरोरा येथे विधानसभा पदाधिकारी बैठक संपन्न पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर/वरोरा : – नावापुढे आमदार किंवा खासदार हे पद लावण्यासाठी निवडणूक लढवत नसून गोरगरिबांचे कल्याण, शेतकरीवर्गाचा विकास, राष्ट्रविकासासाठी लोकसभेची निवडणूक लढवत आहे, अशी गर्जना महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वरोरा येथे गुरुवार, 21 मार्च रोजी विधानसभा पदाधिका-यांच्‍या बैठकीला ते संबोधित करत होते. मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रचाराचा झंझावात सुरू झाला असून मतदारसंघामध्‍ये ठिकठिकाणी सभांचे आयेाजन केले जात आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम ‘मिशन मोड’वर करण्याचा सल्ला देताना मा. श्री. मुनगंटीवार म्‍हणाले,  भाजपने केलेली विकासकामे लोकांपर्यंत…

Loading

Read More