- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
Author: Police Diary
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा अंगी बाणून जाती-पातीचा विचार न करता शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, निराधार, बेरोजगार या सर्वांसाठी विविध विकासाचे प्रकल्प राबवून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या विकासात सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. एकमेकांच्या सहकार्याने देशाच्या विकासाच्या गाडीला अधिक गती देऊ, असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बुधवारी १० एप्रिल रोजी चंद्रपूर येथे आयोजित कुणबी समाज मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर मनोहर पाऊणकर, नामदेव डाहुले,किशोर टोंगे, हनुमान काकडे,, सुभाष गौरकार, अनील डोंगरे, उत्तम पाटील, पंकज ठेंगारे, अनिता भोयर, वनिता…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा देत आहेत. महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊन्ड सिस्टम असोशिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिन्दू महासभा (भारत), राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा,विश्वब्राम्हण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. सुधीरभाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात आता निवडणुकीचे…
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित अन् उत्तम भविष्यासाठी सुधीरभाऊंना विजयी करा : सुनील शेट्टी सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्या भद्रावती आणि वरोरा येथील रॊड शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद पोलीस डायरी, वार्ताहर भद्रावती,: सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा लोकनेता आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेला आहे हे आपले भाग्य असून, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या सुरक्षित आणि उत्तम भविष्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी केले. भद्रावती येथे आयोजित रोडशो दरम्यान ते मतदारांशी संवाद साधत होते. चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा -शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे उमेदवार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुनील शेट्टी आज भद्रावती आणि वरोरा येथे रोड शो च्या माध्यमातून…
राजेश बेले यांच्या कडून मुस्लिम बांधवाना ईद च्या शुभ कामना
निवडणुक पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करणे आवश्यक :मुख्य निवडणुक अधिकारी एस चोक्कलिंगम पोलीस डायरी न्यूज वार्ताहर, वाशिम,: लोकसभा निवडणुक 2024 पारदर्शक आणि शांतेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य निवडणुक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात श्री. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूकीच्या तयारी आढावा घेण्यात आला.यावेळी अमरावती विभागाच्या आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, निवडणूक आयोगाच्यावतीने पोलिस निरिक्षक म्हणून भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी (आयपीएस) बरिंदरजित सिंह, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे ,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा…
महाकाली यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून मंदिर परिसराची पाहणी पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर,: चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला 14 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेाल्या उपाययोजना बाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, मनपा उपायुक्त चंदन पाटील, वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मीता सुतावणे, मंदिराचे विश्वस्त सुनील महाकाळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, मंदिर परिसराची स्वच्छता नियमित होणे आवश्यक आहे. उन्हाळा असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच गर्दी टाळण्यासाठी…
‘गाळमुक्त धरण’ उपक्रमासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पोलीस डायरी न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हा उपक्रम राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहे. यात धरणातील गाळ काढून शेतामध्ये टाकण्यात येणार आहे. यामुळे पाणी साठवण क्षमता वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध संस्थांकडे सोपविण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील ४७ तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करण्यात…
आरसेटी तर्फे शेळीपालन प्रशिक्षण पोलीस डायरी न्यूज, वार्ताहर, बुलडाणा : सेंट्रल बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे देऊळगाव माळी येथे दहा मोफत शेळीपालन प्रशिक्षण पार पडले. संस्थेचे संचालक संदीप पोटे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना प्रेरित करून संस्थेची माहिती दिली. त्याचबरोबर ध्येयनिश्चिती आणि शासकीय योजनांबद्दल अधिक माहिती देऊन बँकिंग आणि ईडीपीविषयी माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेहकर शाखेचे व्यवस्थापक आशिष मोरे यांनी प्रशिक्षणाला भेट दिली. शेळीपालन प्रशिक्षक ऋषीकुमार फुले यांनी शेळीपालना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षक स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक प्रशांत उबरहंडे, मनीषा देव आणि कल्पना पोपळघट यांनी मार्गदर्शन केले. आरसेटी तर्फे बेरोजगार सुशिक्षित तरुण-तरुणींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात…
मंदिराजवळ प्राण्यांचा बळी देण्यास प्रतिबंध: जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पोलीस डायरी न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : जिल्ह्यातील विविध यात्रा, तसेच उरुस दरम्यान प्राण्याचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यावेळेस अंधश्रद्धेपोटी कोणत्याही प्राण्याचा मंदिर किंवा श्रद्धास्थळाजवळ बळी दिला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल आहे. उत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन आणि पोलिस पाटील यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. याबाबत स्थानिक भागात जनजागृती करावी. तसेच उत्सव साजरा करताना प्राण्याचा बळी द्यावयाचा असल्यास मंदिर किंवा श्रद्धास्थळाजवळ देण्यात येऊ नये. त्याची इतरत्र स्वतंत्र व्यवस्था करुन उत्सव साजरा करावा. त्यानंतर सदर जागेची स्वच्छता करण्याची दक्षता घेण्यात…
माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचा सुधीर मुनगंटीवार यांना पाठींबा पोलीस डायरी न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर, : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. पत्रकारांच्या अडचणी आणि समस्यांची जाणीव ना. सुधीर मुनगंटीवार यांना आहे. त्यांच्या समस्या शासन स्तरावर मार्गी लावण्यात ना. मुनगंटीवार हे सक्षम आहे. त्यानुषंगाने आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्यावतीने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा देतो, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम हनुमान जांभुळकर यांनी चंद्रपूर येथील आयोजित कार्यक्रमात दिली. चंद्रपूर येथे आयोजित राज्य व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत…