- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
पो.डा. वार्ताहर , नागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघात मतदानाला सकाळी ७.०० वाजता पासूनच सुरुवात झाली आहे. *क्षणचित्रे* : सकाळी ९.०० वाजता ५६-नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवाजीनगर (मतदान केंद्र क्र. ३१४, ३१५ आणि ३१६) येथे मतदानाचा हक्क बजवण्याकरिता शंकरनगर परिसरातील सरस्वती विद्यालयात मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे. या तिन्ही मतदान केंद्रांवर एकूण ३३२७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत
पो.डा. वार्ताहर , छत्रपती संभाजीनगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर झाल्यापासून स्थापन झालेल्या आचार संहिता कक्षात गेल्या महिनाभरात १६३ तक्रारी सी- व्हिजिल (C-VIGIL)ॲपद्वारे प्राप्त झाल्या. त्यातील १४३ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले व सर्वच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तक्रारी निराकरणाचा सरासरी कालावधी ४५ मिनीटे ५५ सेकंद इतका होता, अशी माहिती आचारसंहिता कक्षाचे सहा.नोडल अधिकारी किशोर घोडके यांनी दिली. लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा भारत निवडणूक आयोगाने केली तेव्हापासून म्हणजेच दि.१६ मार्च २०२४ पासूनच आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे या कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. दि.१६ मार्च ते १७ एप्रिल या एक महिन्याच्या…
धामणगाव बढे येथे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचार सभेसाठी उसळला जनसागर….! महायुतीचे उमेदवार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू— धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा निर्धार पो.डा. वार्ताहर , बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुती तसेच मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ बुलढाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांची भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती….! यावेळी त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर…
महायुतीच्या मुनगंटीवारांना मिळाला भरघोस पाठिंबा पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणूकीचा प्रचार थंडावल्या नंतर सर्व कार्यकर्ते गुप्त प्रचारात व्यस्त झाले आहे.महत्वाचे म्हणजे चंद्रपुरातील ना सुधीर मुनगंटीवार,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व आमदार किशोर जोरगेवार एकत्र आल्याने या विषयाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.बुधवारी झालेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या सभेत आ.जोरगेवार यांनी ना.मुनगंटीवार यांना गुरूची उपमा देत,त्यांना विजयी करण्याचा संकल्प केल्याने गुरूला मिळाली चेल्याची साथ अशी चर्चा आहे.यातच रामनवमीच्या शोभायात्रेत हंसराज अहिर यांनी हजेरी लावून तिघांनी रामभक्तांचे अभिनंदन केल्याने नको त्या चर्चांना विराम मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंका’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर मतदारांनो, ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. बस्स…. 19 एप्रिल रोजी मतदान करून सेल्फी अपलोड करा आणि जिंका बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड फोन. 19…
सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांनी व्यक्त केला विश्वास लोकसभा निवडणुकीत सामाजिक संस्थांचा ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा पो.डा. वार्ताहर ,चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हेच सक्षम उमेदवार आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर आम्हाला पूर्णपणे विश्वास असून येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व संघटनांनी त्यांना जाहीर समर्थन देत पाठींबा दिला आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी तळागातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक संस्था व संघटना स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : मतदानाची टक्केवारी वाढावी, नागरिकांचा मतदानात सहभाग वाढवा या उद्देशाने शासकीय स्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यापैकी महानगरपालिकेद्वारे मतदान करणाऱ्या नागरिकांना मौलाना अब्दुल कलाम आझाद बगीच्या मध्ये मोफत प्रवेश मिळणार असे आवाहन नागरिकांना चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त बिपिन पालीवाल यांनी केले आहे.
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रावर जाणा-या निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ (रॅन्डोमायझेशन) प्रक्रिया बुधवारी (दि. 17) निवडणूक आयोगाने दिलेल्या संगणक प्रणाली द्वारे पार पाडण्यात आली. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. उपस्थित होते. या प्रक्रियेनुसार, कोणत्या मतदान केंद्रावर कोणते पथक जाईल, हे मतदानाच्या एक दिवसापूर्वी म्हणजे 18 एप्रिल 2024 रोजी संबंधित पथकांना कळविण्यात येणार आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवार दि. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळत होणार आहे. यापूर्वी सरमिसळ प्रकियेने प्रत्येक मतदारसंघनिहाय मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात आला असून मतदान…
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : रामनवमी निमित्त काळाराम मंदिर येथून रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रथयात्रेचे स्वागत करत प्रभु श्री रामाची पुजा अर्चना केली त्यांनतर रथयात्रेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनिष महाराज व काळाराम मंदिर विश्वस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. देशभरात आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपूरातही रामनवमी निमित्त संपुर्ण शहर सजुन निघाले होते. दिवसभरच शहरातील विविध मंदिरात पुजा अर्चना करण्यात आली. तर संध्याकाळी शहरातील मंदिरांमधून शोभायात्रा काढण्यात आल्या. काळाराम मंदिर येथून श्री प्रभु रामचंद्र यांची रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी पुजा…
काहीवेळा आपल्या पोटात उजव्या बाजूला वेदना होऊ लागतात. या पोटदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. कारण आपल्या पोटात उजव्या बाजूस यकृत, पित्ताशय, आतड्याचा उजवीकडील भाग, अपेंडिक्स, उजव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये right ovary असे अवयव असतात, त्यामुळे विविध कारणांमुळे उजव्या बाजूला पोटदुखी होऊ शकते. पोटात उजव्या बाजूला दुखणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे. पचनासंबधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation) : ◼️गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा अशा कारणांनी उजव्या बाजूस पोटात दुखू लागते. ◼️अपेंडिक्सला सूज आल्याने पोटात उजवीकडे दुखते. ◼️उजव्या किडनीत स्टोन किंवा इन्फेक्शन झाल्याने पोटात उजव्या बाजूला दुखते. ◼️हर्नियामुळे…