- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार रद्द पोलीस डायरी, वार्ताहर बुलडाणा, : लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मलकापूर आणि नांदुरा तालुका वगळता असणारे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीतील आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो. याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजार व जत्रा अधिनियम 1862च्या कलम 5 नुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही यादृष्टीकोनातून मलकापूर आणि नांदुरा तालुका वगळता शुक्रवारी भरणारे…
जळगाव मतदार संघाचे सर्वसामान्य निरीक्षक आणि जळगाव जिल्ह्यासाठीचे पोलीस निरीक्षक दाखल तिन्ही निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, जळगाव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाकरिता सर्वसामान्य निरीक्षक निश्चित करण्यात आले असून गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी डॉ.राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे जळगावांत आगमन झाले आहे. 8275970667 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू शकतात. तसेच प्रियंका मीना ( आय.पी. एस ) यांची जळगाव जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याशी 8275970669 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू शकतात. निरीक्षकांसाठी…
पो. डा. वार्ताहर, रत्नागिरी : येथील अल्पबचत सभागृहात निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहूल यादव आणि निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुधांशु मिश्रा यांनी निवडणूक कामकाजाबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकारी व समन्वयक अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, विशाल खत्री आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते…
पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जसजसा उन्हाळा तापत जातो तसतसे, उष्माघाताचा धोका प्रत्येकासाठी चिंतेचा विषय बनतो. विशेषतः जे घराबाहेर बराच वेळ घालवतात. त्यामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतील तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास उष्णता जीवघेणी ठरु शकते. जेव्हा शरीराचे तापमान घोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीराची शीतकरण यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते तेव्हा ही स्थिती उद्भवू शकते . उष्माघाताच्या लक्षणांमध्ये शरीराचे उच्च तापमान, अनेकदा…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान घडत असलेल्या घडामोडींमध्ये एकी कडे काँग्रेस कडून आपल्या दिवंगत पती आणि चंद्रपूरमधून निवडून आलेले एकमेव काँग्रेस चे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी संघर्ष करत खेचून आणणारी ढाण्या वाघाची वाघीण आपल्या मतदारांच्या समस्यांसाठी दुख्खातूनही स्वतःला सावरत जनतेच्या समस्यांच्या निराकरणासाठी उभी ठाकलेली वाघीण आज मतदानाचे हक्क बजावताना पतीच्या आठवणींच्या अश्रुनी डोळे पाणावले, परंतु यामुळे आपल्या साठी खंबीर उभी ठाकलेली हि वाघीण आठवणींनी डळमळीत तर होऊन पुन्हा विलाप करणार आणि जनतेच्या समस्या जैसे थे राहू नये अशीच चिंता कैक मतदारांच्या मनात निर्माण झाल्याचे चर्चेत आहे. व्यक्ती म्हणून त्यांच्याप्रति सहानुभूती वाटणे स्वाभाविक आहे, परंतु…
पोलीस डायरी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर: भारतीय संविधानाचा महत्वाचा भाग म्हणुन मतदानाकडे पहिले जाते. सध्या भारतात लोकसभा निवडणुकांचे पहिल्या टप्प्यातील मतदान आज रोजी होत आहे, चंद्रपुरातील घडामोडींकडे लागेलंय सर्वांचे लक्ष्य. अशातच महाराष्ट्राचे मंत्री म्हणून आपली भूमिका चोख पणे बजावणारे, कार्यकर्त्यांचे जिवाभावाचे सुधीर भाऊ यांनी आज सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे परिवारासह रांगेत उभे राहून आपले मतदानाचे कर्तव्य आणि हक्क बजावल्याचा वृत्तांत आहे.
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : मतदान हे महादान आहे. आपल्या एका मताने आपण लोकशाही च्या मंदिरात आपला प्रतिनिधी पाठवितो, मी माझे कर्तव्य बजावले, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आणि लोकशाही बळकट करण्यासाठीचे माझे कर्तव्य पार पाडले. मी चंद्रपूरकरांना विनंती करतो की, लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावा!
पो.डा. वार्ताहर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून (NCP Sharad Pawar) निलेश लंके (Nilesh Lanke) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. डॉ. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके (Sujay Vikhe vs Nilesh Lanke) या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र्रात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होईल. तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असून 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.…
पो.डा. वार्ताहर , मुंबई : सध्या सगळीकडे निवडणुकीचे (Loksabha Election) वातावरण आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे नेते जोमात प्रचार करत आहेत. यावेळी जनता भाजपला नाकारणार आहे, असा दावा विरोधक करतात. तर आम्हीच पुन्हा एकदा सत्तेत येऊ असे सत्ताधारी भाजपकडून (BJP) सांगितले जाते. दरम्यान, एकीकडे निवडणुकीची धूम चालू असताना विरोधक कधी-कधी ईव्हीएमलाही (EVM) विरोध करताना दिसतात. पण ही ईव्हीएमची मशीन कोण तयार करतं? या कंपन्या कोणत्या आहेत? ईव्हीएम तयार करून या कंपन्यांनी आतापर्यंत किती पैसे कमवले आहेत? याची तुम्हाला कल्पना आहे का? दोन कंपन्यांवर ईव्हीएम तयार करण्याची जबाबदारी ईव्हीएम तयार करण्याची जबाबदारी ही दोन कंपन्यांवर आहे. या दोन्ही कंपन्या…
पो.डा. वार्ताहर , जळगाव : पहिल्या दिवशी जळगावसाठी 13 उमेदवारांनी 29 अर्ज तर रावेरसाठी 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले आजच्या तारखेत एकही अर्ज दाखल नाही लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध होताच पहिल्याच दिवशी दिनांक 18 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 29 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तेरा उमेदवारांनी 44 अर्ज घेतले. तर पहिल्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13…