- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
जिल्हा सामान्य रुग्णालयात आता दातांवर उत्कृष्ट उपचार पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर, : दंत विभाग समान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना दंत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने फिक्स प्रकारचे दात (सिरेमिक/मेंटल) आणि वेडयावाकडया दात सरळ करणे (फिक्स प्रकारचे ऑथोडॉन्टिक उपचार) या सेवा एप्रिल 2024 पासून सुरु करण्यात आल्या आहेत. वरील दोन्ही उपचार पद्धती अतिशय महागडया असल्यामुळे गोरगरिब व मध्यमवर्गीय रुग्णांना खाजगी रुग्णांलयात जाऊन उपचार करणे फार अडचणीचे होत होते. म्हणून राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून दातांच्या कलरचे फिक्स प्रकारचे दात (सिरेमिक /मेंटल ) गरजू…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : प्रचंड चटके लावणाऱ्या उन्हाळ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या घशाला कोरड पडू नये, यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार सरसावले आहेत. ना. श्री मुनगंटीवार यांनी यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना गावागावात जात पाणीटंचाईचा आढावा घेण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात त्यांनी चंद्रपूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांना सूचना केली आहे. लोकांची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जल जीवन मिशनच्या माध्यमातून, ‘हर घर कनेक्शन’चे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. या योजनेतून प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करत असली, तरी अशा योजना सुरू झाल्या…
पो.डा. वार्ताहर, नाशिक : : नाशिक रोड बिटको हॉस्पिटल जवळ खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आहे खूप मोठया प्रमाणावर आगीचे लोट व धुराचे साम्राज्य पसरले आहे संपूर्ण परिसरात, अग्निशामक घटनास्थळी आले आहे व आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे
पो.डा. वार्ताहर, रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून नागरिक /मतदार यांना भेटण्यासाठी सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे. मतदारांसाठी भेटण्याचे ठिकाण व मोबाईल क्रमांकाची माहिती खालील प्रमाणे आहे निवडणूक निरिक्षक, सर्वसाधारण भुवनेश प्रताप सिंग (आय ए एस) यांना सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह, माळ नाका रत्नागिरी येथे भेटता येईल. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-8767236614 असा आहे. निवडणूक निरिक्षक, पोलीस सुधांशु शेखर मिश्र (आय पी एस) यांना सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस, शासकीय विश्रामगृह,…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : राज्यातील सर्व पशुंना टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सदरील शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतक-यांकडे असलेल्या सर्व पशुधनाच्या कानात इअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे. तसेच दिनांक 1 जून 2024 नंतर इअर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा दिली जाणार नाही. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून…
पो.डा. वार्ताहर, छत्रपती संभाजीनगर : मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही जबाबदारी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे पार पाडावयाची असून ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे दि.१२ रोजी सज्ज असायला हवी, यादृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिले. मतदान केंद्रांवर द्यावयाच्या सुविधांबाबत आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांसमवेत दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव तसेच अन्य…
पो.डा. वार्ताहर, छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात दि.१० रोजी ‘अक्षय तृतीया’ या मुहूर्तावर अनेक विवाह होत असतात. त्यात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि,बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे सुचित करण्यात आले आहे, तसेच नागरिकांनाही अशा विवाहाची माहिती गोपनियरित्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वर्षभरात रोखले ७५ बालविवाह जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली असून बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात (दि.१ एप्रिल २०२३ पासून) जिल्ह्यात आतापर्यंत ७५ बालविवाह रोखण्यात कृती दलाला यश आले आहे. त्यातील तीन प्रकरणांमध्ये गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल…
पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : 1 मे कामगार दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामगारांची भेट घेत संवाद साधला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याच्या सुचनाही उपस्थित अधिका-यांना केल्या आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, माया आत्राम, राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल अवार्ड प्राप्त नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जात येथे रुग्ण सेवा देत असलेल्या कंत्राटी कामगारांची…
महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाच्या प्रत्येक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही महाराष्ट्राने योगदान दिले आहे. ही संतांची भुमी आहे. संतांनी महाराष्ट्रातून दिलेले समाजोपयोगी विचार समाजाने स्वीकारले असून संत परंपरेची आणि संस्कृतीची अमुल्य शिकवण जगाला देणारा महाराष्ट्र देशासाठी गौरव असल्याचे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथील तहसील कार्यालय येथे सकाळी 7 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार…
चंद्रपूरातील ऑटो रिक्षा चालकांची परिवहन सेवा ही अभिनंदनिय – डॉ. मंगेश गुलवाडे पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूरच्या महाराष्ट्र आटोरिक्षा चालक – मालक आघाडी तर्फे जागतिक कामगार दिनाच्या निमित्याने ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्राचे वने,सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा चंद्रपूर जिल्ह्याचे महामंत्री तथा महानगराचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी भूषविले.तसेच भाजपा चंद्रपूर जिल्ह्याचे महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र खांडेकर, चंद्रपूरचे अध्यक्ष मधुकर राऊत, भारतीय जनता पार्टीचे रामकुमार अकापल्लीवार यांची…