- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
ई व्ही एम मशीनला विशिष्ठ प्रकारची चिप बसवुन उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रूपयांची मागणी करून फसवणुक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडुन अटक पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :-ई व्ही एम मशीनला विशिष्ट प्रकारची चिप बसवुन उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रूपयांची मागणी करून फसवणुक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यासंदर्भात आज दि.७ रोजी अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद यांनी पोलीस आयुक्त यांना दिलेल्या लेखी तक्रारीनुसार,त्यांचे मोबाईलवर इसम नामे मारोती ढाकणे असे नांव सांगणाऱ्या इसमाने मतदान केंद्रात निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ई व्ही एम मशीनला माझ्याकडील विशिष्ट प्रकारची चीप बसवुन…
अधिनस्त कर्मचाऱ्यांचे मतदान झाल्याबाबत खातरजमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात दि.१३ रोजी मतदान होणार असून या दिवशी आपापल्या अधिनस्त कर्मचारी अधिकारी यांनी मतदान केले की नाही, याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी खातरजमा करुन तसा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज निर्गमित केले आहे. सर्व विभागप्रमुखांना दिलेल्या या आदेशात म्हटले आहे की, दि.११ व १२ मे रोजी सुटी आहे व दि.१३ मे रोजी मतदान आहे. त्यामुळे दि. १३ रोजी अधिनस्त कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहण्याबाबत अथवा त्यांचे ज्या ठिकाणी मतदान आहे त्याठिकाणी जाऊन…
वयोवृद्ध, दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था: इलेक्शनसाठी प्रशासन सज्ज पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी येणे व जाणे दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना सोईचे व्हावे यासाठी विनामूल्य वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. १०९ औरंगाबाद (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविल्यानुसार मोहल्ला १) किरादपूरा- राममंदिर, २) शहागंज – हिंदी विद्यालय, ३) नारेगाव पेट्रोलपंप, ४)गारखेडा सुतगिरणी चौक, ५) सिडको एन ६ चौक चिस्तीया कॉलनी रोड या पाच ठिकाणी ही वाहने दि.१३ रोजी सकाळी सात ते सायं. साडेपाच वा. पर्यंत उपलब्ध करण्यात आले आहे. या…
१०८-औरंगाबाद (पश्चिम) दुसरे प्रशिक्षण लोकशाही संवर्धनाच्या कर्तव्यास आत्मविश्वासाने सामोरे जा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील १०८-औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आज पार पडले. वंदे मातरम सभागृहात आज या प्रशिक्षण सत्रास निवडणूक निरीक्षक कांतिलाल दांडे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच प्रशिक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले. आतापर्यंत घेतलेले प्रशिक्षण, त्यातून मिळालेली माहिती, झालेला अभ्यास यामुळे आपण सर्व निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडेल असा मला विश्वास आहे. निवडणुकीचे कामकाज हे लोकशाही संवर्धनाचे कर्तव्य असून या कर्तव्यास आत्मविश्वासाने सामोरे जावे,अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…
टपाली मतदानाचे मतदान केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर १० लोकसभामतदार संघातील कर्मचाऱ्यांनी ज्यांची नियुक्ती मतदाना संदर्भातील कामकाजासाठी झालेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांचे मतपत्रिका पाकीट जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहे. तरी या अधिकारी- कर्मचारी यांनी टपाली मतपत्रिका कक्ष येथे सकाळी ९ ते सायं.६ दरम्यान येऊन टपाली मतदान करावे असे आवाहन करण्यात आले हे. तसेच जिल्ह्यात कार्यरत पोलीस अधिकारी कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड तसेच १८- जालना लोकसभा मतदार संघातील पोलीस अधिकारी कर्मचारी ज्यांची नियुक्ती छत्रपती…
14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट : नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर, : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 07 ते 14 मे 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वारा (ताशी 40-50 किमी वेगाने) आणि गडगडाट वादळासह गारपीटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी अशी घ्यावी काळजी : • संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्या. • मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर रहा. • रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे,…
महिलांनो! मतदानात खारीचा नव्हे सिंहाचा वाटा द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- मतदार यादीत निम्मे मतदार महिला आहेत. महिलांनी मतदानात आपला खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा द्यावा. महिलांचे सर्वाधिक मतदान असलेला जिल्हा आणि महिला मतदार ह्या सुजाण नागरिक असल्याची ओळख निर्माण करण्याच्या संधीचे सोने करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले. महिला मतदार जनजागृती उपक्रमाअंतर्गत आज जिल्हा नियोजन सभागृहात आज उच्चशिक्षित व स्वयंसिद्ध महिलांची बैठक बोलावण्यात आली होती. विविध सामाजिक संस्था, उच्च शिक्षित, चार्टर्ड अकाऊंटंट, डॉक्टर्स, वकिल, उद्योजक, अशा विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या महिलांना या बैठकीस बोलावण्यात आले होते. स्वीप…
नाशिक पोलीस विभागातर्फे पोलिसांच्या तणाव व्यवस्थापनासाठी नाट्यप्रयोगाचे आयोजन पोलीस डायरी, योगेश भट, जिल्हा प्रतिनिधी,: – नाशिक शहर पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापनेचा भाग म्हणून कवी कालिदास कलामंदिर येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कुटुंबीयांकरिता मोरूची मावशी या प्रसिद्ध नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हा प्रशासन न्यायपालिका व महानगरपालिका यातील अधिकारी, तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. एकदंत फिल्मचे श्री अमित कुलकर्णी आणि प्रसिद्ध सिनेअभिनेता तथा नाट्यकर्मी श्री भरत जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले त्याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आलेत. It was heartening to see our teams thoroughly enjoy the evergreen & iconic Marathi Drama Moruchi Mavshi, along with…
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध आस्थापनांनी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी द्यावी,असे आवाहन कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले आहे. यासंदर्भात उद्योग उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. निवडणूकीच्या दिवशी हे कामगार निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांनाही सुटी देण्यात यावी. सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या, संस्था, औड्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांना ही सुटी लागू राहील.…
निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी कार्यवाही करावी: सुप्रिया सुळे पोलीस डायरी, प्रतिनिधी, बारामती :- महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार माननीय सुप्रियाताई सुळे यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरु घटना, आणि अनैतिक आचरणाने मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली. बारामतीमध्ये विविध ठिकाणी गुंडांच्या टोळ्या फिरत आहेत, विविध तालुक्याच्या ठिकाणी बँक अक्षेपार्ह्पणे रात्रीपर्यंत उघड्या ठेवण्यात आल्यात, भोर व वेल्हा या तालुक्यांमध्ये समोर येत असलेल्या घटनांवर आक्षेप नोंदवत पोलिस व निवडणूक आयोगाने सत्याची भूमिका घेऊन न्याय द्यावा अशी मागणी केली. #SupriyaSule #Baramati #Tutari