Author: Police Diary

पो.डा. वार्ताहर,पुणे :  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हेलिकॉप्टर कॉम्प्लेक्स, बंगळुरु येथे हेलिकॉप्टर-एमआरओ विभागात नॉन-एक्झेक्युटिव्ह संवर्गात विमान तंत्रज्ञ (एअरफ्रेम) व विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रीकल) ही पदे माजी सैनिकांकडून चार वर्षाच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. वेतनस्तर डी ६ मधील विमान तंत्रज्ञाची (एअरफ्रेम) १२ पदे व विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रीकल) ही ११ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवाराने विमान तंत्रज्ञ (एअरफ्रेम) या पदासाठी मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष तर विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रीकल) या पदासाठी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. सशस्त्र दलात भरती होण्यापूर्वी मान्यताप्राप्त संस्थेची अभियांत्रिकी पदविका १० + ३ प्रणाली अंतर्गत पूर्णवेळेत पूर्ण…

Loading

Read More

विभागीय आयुक्तांकडून सामान्य रुग्णालय, वलगाव ‘पीएचसी’ची पाहणी आरोग्य सोयी-सुविधांचा घेतला आढावा पो.डा. वार्ताहर, अमरावती : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हात फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, थकवा, मळमळ व ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरु करावे, असे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज सांगितले. तसेच उष्माघाताच्या रुग्णांना त्वरीत उपचार सोयी-सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. शहरातील सामान्य रुग्णालय व वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला विभागीय आयुक्तांनी…

Loading

Read More

जिल्हाधिका-यांकडून स्विमींग पुल व बॅडमिंटन हॉलची पाहणी पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर, : जिल्हा क्रीडा संकूल, चंद्रपूर येथे अद्यावतीकरण करण्यात येत असलेल्या स्विमींग पुल आणि बॅडमिंटन हॉलच्या बांधकामाची मंगळवारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकुलातील अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल करिता जिल्हा नियोजन समितीमधून 5 कोटी 39 लक्ष रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे. बॅडमिंटन हॉलचे बांधकाम एका महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच जलतरण तलावाकरिता नाविन्यपूर्ण योजनेमधून सन 2022- 23 मध्ये 1 कोटी 50 लाख…

Loading

Read More

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 62.52 टक्के मतदान – निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, रत्नागिरी, : 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 62.52 टक्के मतदान झाले आहे. 4 लाख 59 हजार 99 इतक्या पुरुष तर 4 लाख 48 हजार 518 इतक्या महिला अशा एकूण 9 लाख 7 हजार 618 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदारंनी उत्स्फूर्तपणे बाहेर…

Loading

Read More

आपल्या पशुधनाला ‘कर्ण बिल्ले’ लावून घ्या; पशुसंवर्धन विभागाचे आवाहन पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर,:- पशुपालकांनो आपल्या पशुधनाला कर्ण बिल्ले (इअर टॅगिंग) लावले का? लावले नसल्यास लावून घ्या. आपल्या जवळच्या पशुवैद्यक दवाखान्यात त्यासाठी संपर्क साधा. कारण येत्या १ जून पासून असे कर्ण बिल्ले नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जनावरांच्या कानात पशुसंवर्धन विभागाने दिलेले बिल्ले असल्याशिवाय आता यापुढे जनावरांची खरेदीविक्री करता येणार नाही,तसे होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यास प्रतिबंधित करावे,असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ‘इअर टॅगिंग’ पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नॅशनल डिजीटल लाईव्हस्टॉक मिशन…

Loading

Read More

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे ‘बाल विवाहमुक्त परभणी’ साठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, परभणी, : अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह होतात. दि. 10 मे, 2024 रोजी अक्षय तृतीया असल्याने या दिवशी होणारे संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, ‘बाल विवाहमुक्त परभणी’साठी नागरिकांनाही पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. तसेच त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2022 देखील लागू करण्यात आलेला आहे. या नियमानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बाल…

Loading

Read More

कृषि निविष्ठा : तक्रार निवारण व सनियंत्रण कक्ष स्थापन पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी,वाशिम,: खरीप हंगाम लवकरच सुरू होणार आहे. शेतकऱ्यांच्या कामांची लगबग दिसून येते आहे. कृषि सेवा केंद्रावर बियाणे खरेदी,रासायनिक खत खरेदी, कीटकनाशक खरेदी या करिता शेतकऱ्यांची कुठलीही फसवणूक होऊ नये तसेच शेतकऱ्यांना कृषि निविष्ठाच्या गुणवत्ता व किंमतीबाबत तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषि केंद्रावरून कृषि निविष्ठा घ्याव्यात व कुठलीही फसवणूक होत असेल तर जिल्हास्तरावर सी.पी. भागडे मोहीम अधिकारी ८८०५८१०५१८, जि. एस. चिंतावार वि. अ. (कृषि) ९०११५५५३९४ यांच्याशी संपर्क करावा. तसेच तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी व…

Loading

Read More

बियाणे, खते, किटकनाशकांच्या तक्रारीबाबत कार्यपद्धती निश्चित पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : येत्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार कृषि निविष्ठा असलेल्या बियाणे, खते, किटकनाशकांच्या तक्रारीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. खरीप हंगाम 2024 करीता गुणवत्ता नियंत्रण कामाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा विक्रेत्याकडून विक्री होणाऱ्या बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठांचा दर्जा निकृष्ट असणे, त्यात भेसळ असणे अथवा बोगस असणे आदीबाबत शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष अथवा अन्य व्यक्ती, संस्था, प्रसिद्धी माध्यमाद्वारे तक्रारी प्राप्त होतात. सदर तक्रारी सादर करताना शेतकऱ्यांनी अर्ज, मुळ देयक, बियाणे, खते व किटकनाशकाची पिशवी,…

Loading

Read More

आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वयाने कार्य करावे -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी,बुलडाणा, : येत्या मान्सून कालावधीत प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे, पूर किंवा अपघाताची स्थिती ही अचानक उद्भवल्याने यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सून पूर्व तयारी आणि दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भात केलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, तहसिलदार संजिवनी मुपडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क, वाहतूक व्यवस्था…

Loading

Read More

मतदान केंद्रावर जाण्यासाठी चार हजार ‘प्रथमोपचार किट’ सज्ज पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- प्रत्येक मतदान केंद्रावर एक प्रथमोपचार किट देण्यात येणार आहेत. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तशी प्रशासनाची तयारी सुरु आहे. आज आरोग्य विभागामार्फत द्यावयाच्या चार हजार वैद्यकीय प्रथमोपचार किट सज्ज करुन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रवाना करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली. जिल्ह्यात दि. १३ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता. निवडणूक प्रक्रियेतील मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचारी अथवा आलेले मतदार यांच्यापैकी कुणास काही त्रास झाल्यास तातडीने प्रथमोपचार करणे शक्य व्हावे म्हणून प्रथमोपचार किट देण्याचे…

Loading

Read More