Author: Police Diary

पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी – पदवीधर मतदार संघ निवडणूक १० जून रोजी होत असल्याने, त्याविषयी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज बैठक घेवून सूचना दिल्या. सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आवश्यक अहवाल घेवून ते उद्यापर्यंत पाठवावेत. एमसीएमसी, एमसीसी समिती स्थापन करा. प्रत्येक विधानसाभा मतदार संघात एक भरारी पथक कार्यरत ठेवावे, अशा सूचना श्री. सिंह यांनी दिल्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, नायब तहसीलदार दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : जलयुक्त शिवाराची कामे ही पावसाळयापूर्वी करणे अपेक्षित असल्याने यावर्षी जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता तात्काळ आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, श्वेता बोड्डू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्यासह दूरदृष्यप्रणाली द्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जलयुक्तची कामे पूर्ण करण्याकरीता अतिरिक्त निधीची मागणी करावी. प्रत्येक मागणीवर निधी वितरित केला जाईल. सन 2023…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, पुणे : लोकसभा मतदार संघांतर्गत पर्वती विधानसभा मतदार संघात ८९ मतदारांनी अर्ज क्रमांक १२ डी भरुन गृह मतदानासाठी नोंदणी केली होती. सॅलिसबरी पार्क येथील ९९ वर्षाच्या मतदाराच्या निवासस्थानी मतदान प्रक्रिया सुरु असताना जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदार संघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अचानक भेट देऊन मतदानाच्या कामकाजाची पाहणी केली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून यावर्षीच्या निवडणुकीपासून प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. त्याअनुषंगाने ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करु शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात…

Loading

Read More

दारु परवाना वितरणातील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी व्हावी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर :  सन २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही त्याचे पुढे काहीच झाले नाही आणि मद्य परवाना वितरणातील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला. या संपूर्ण गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही सांगितले आहे. दारूबंदी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, वाशिम : २२ डिसेंबर २०२३ च्या आदेशान्वये २०२४ करीता जाहिर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्टीच्या आदेशामध्ये अंशत: बदल करून जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. आज ९ मे रोजी जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार सन २०२४ या वर्षासाठी संपुर्ण वाशिम जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. १० मे रोजी अक्षय तृतीया ,२ सप्टेंबर रोजी पोळा,११ सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी पुजन सणानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक सुटी राहणार आहे. हा आदेश वाशिम जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष यांना लागु नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, नागपूर : मुलांच्या सूप्त गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून 7 मे ते 7 जून या कालावधीत शासकीय मुलांचे बालगृह पाटणकर चौक येथे करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महिला बालविकास विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी भारती मानकर, बालकल्याण समितीचे विनायक नंदेश्वर, विजया शहा, बालन्याय मंडळ सदस्य वैशाली पांढरे, संस्थाध्यक्ष बापूसाहेब चिंचाने, सुरेखा बोरकुटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, इसाप संस्थेचे संजय कुमार होत्ता यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संरक्षण अधिकारी साधना हटवार यांनी केले.

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, पुणे : जिल्ह्यातील पुणे, शिरुर व मावळ लोकसभेसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार असून शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. गृहनिर्माण संस्थांमधील मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठ्या पोहोचविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांचे प्रमाण अधिक असून तेथील मतदारांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रथमच ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात 19 लाख 77 हजार 42 मतदारांपैकी 12 लाख 37 हजार 355 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यामुळे जिल्ह्यात 62.59 टक्के मतदान झाल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच सर्व मतदान यंत्रे लातूर येथील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमधील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आली असून याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 3 लाख 24 हजार 303 मतदारांपैकी 2 लाख 11 हजार 711 मतदारांनी म्हणजेच 65.28 टक्के मतदारांनी मतदान केले. लातूर शहर विधानसभा क्षेत्रातील 3 लाख 84 हजार 980 मतदारांपैकी 60.77 टक्के म्हणजेच 2…

Loading

Read More

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71.59 टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71.11 टक्के मतदान पो.डा. वार्ताहर, कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 7 मे रोजी उत्साहाने मतदान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात 71.98 टक्के मतदान झाले. यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे 71.59 टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71.11 टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याबरोबरच प्रशासनाच्या आवाहनाला दाद देत कोल्हापूर जिल्हावासियांनी मतदानही उत्साहाने केले. यामुळे उन्हाळा असतानाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या 70.88 या टक्केवारीत 2024 च्या लोकसभा निवडणूकीत 1.10 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली…

Loading

Read More

* सर्वाधिक मतदान तुळजापूर विधानसभा क्षेत्रात * 12 लक्ष 72 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क * 81 पैकी 20 तृतीयपंथीयांनी केले मतदान पो.डा. वार्ताहर, धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. या निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. औसा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 56 हजार 479 पुरुष, 1 लक्ष 37 हजार 604 स्त्री व 3 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लक्ष 94…

Loading

Read More