- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
मुंबई, दि.31: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 जून रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि त्यानंतर “जाणता राजा”हे महानाट्य सादर केले जाणार आहे. सदर प्रदर्शन ६ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक ठरावा, पुन्हा तो क्षण विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावा, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विविध कार्यक्रमांचे…
मुंबई – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 9 जणांनी मुंबईतल्या जे.जे. हॉस्पीटलमधील आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या कारभारावर आक्षेप घेत या 9 जणांनी अधिष्ठाता सापळेंवर गंभीर आरोपही केले आहेत. जे.जे. हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या मागील एका वर्षापासून मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार करत या सर्व 9 वरिष्ठ डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. यासंदर्भात राजीनामे देणा-या डॉक्टर्सनी एक निवेदनही जारी केले आहे. यात राजीनामा देण्यामागील भुमिका स्पष्ट करत संपूर्ण घटनाक्रमही नमूद केलाय. आणखी वाचा – कंत्राटदाराची कमाल, घडी घालून ठेवता येणारा रस्ता तयार केला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे वेतन अधिष्ठाता डॉ.…
पो. डा. वार्ताहर, नागपूर, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, स्थानिक शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 2 जूनला सकाळी 10 वाजता झिंगाबाई टाकळी येथील दत्त सभागृहात “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे” आयोजन करण्यांत आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक विधानसभा सदस्य विकास ठाकरे राहणार आहेत. या शिबीरात दहावी व बारावी नंतर काय? भविष्यातील शिक्षण रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगार संधी आदी बाबत विद्यार्थ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच रोजगार व स्वयंरोजगार शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँक व वित्तीय…
पो.डा. प्रतिनिधी , नागपूर जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने न्यायमंदीर परिसर, जिल्हा न्यायालय सिव्हिल लाईन्स येथे तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर जयदीप पांडे, न्यायिक अधिकारी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्या सुरेखा बोरकुटे, अधिवक्ता, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. प्रारंभी तंबाखू विरोधी दिवसानिमित्त जिल्हा न्यायालय परिसरात जनजागृती रॅली आयोजित करुन तंबाखू विरोधी घोषणा देण्यात आल्या. सोबतच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यास होणाऱ्या दूष्परिणाम व तंबाखू प्रतिबंध कायद्यबाबत माहिती देवून नागरिकांना माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. या…
धनगर समाज सेवा मंडळ जिल्हा चंद्रपूर पुरस्कृत धनगर जमात युवक युवती मंच चंद्रपूर तर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव चे आयोजन 31 मे रोजी स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, जटपुरा गेट, चंद्रपूर येथे आयोजित केलेले आहे यामध्ये करिअर गायडन्स, व्यवसाय मार्गदर्शन सेमिनार व व्याख्यान तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हे केलेले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनगर जमात सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे हे राहणार आहे. प्रमुख व उद्घाटक प्रा. योगिनी देगमवार या राहणार आहेत. तसेच दहावी बारावी पदवीधर युवक युवतींना करिअर गायडन्स व व्यवसाय मार्गदर्शक म्हणून मा. प्राध्यापक नामदेव मोरे सर, समीक्षक करियर गायडन्स तसेच व्यवसाय मार्गदर्शन व…
चंद्रपूर दि.३१: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी इस्पीतळात उपचार घेत असतांना त्यांचे काल (30 मे) निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर लोकसभेच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार मुकुल वासनीक व आमदार सर्वश्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन राऊत, सुनिल केदार, अनिल देशमुख, आशिष देशमुख, किशोर जोरगेवार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.…
चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखद घटना आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर 31 मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार…
1.आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीकविमा ! 2.प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ केंद्राच्या ₹6000 सोबत राज्याचे ₹6000 अतिरिक्त 3.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘आई’ महिला केंद्रीत पर्यटन धोरण 4.ग्रेड पे 7600 रुपये असलेल्या आणखी 105 पदांना मान्यता 5.केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने राज्यात नवीन कामगार नियम तयार करणार 6.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोटनांद्रा व डोईफोडा येथे मका संशोधन केंद्र 7.बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी 1710.84 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला मंजुरी 8.डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची आता राज्यभर अंमलबजावणी 9.बृहन्मुंबई क्षेत्रातील नागरी नुतनीकरण योजनेत क्लस्टर विकासासाठी फंजिबल एफएसआय, तसेच विकास अधिभारात 50 टक्के सवलत 10.फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू…
पो. डा.वार्ताहर पाचोरा, जळगाव, सद्यस्थितीत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात दिवसेंदिवस गुन्हेगारी ने डोके वर काढत असून काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठिताच्या विरोधात ३७६ सारख्या गुन्ह्याची नोद झाली होती. या घटनेच्या तपासात पोलीस यंत्रणा व्यस्त असतांनाच दुसऱ्यादिवशी रात्रीच्या वेळी भरवस्तीत काही तरुणांनी एका तरुणावर चाकु, लाठ्या, कठ्यासह जीवघेणा हल्ला केला होता या एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असल्याने पोलीस यंत्रणेने बाबत जनतेतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. या दोघ घटनांचा पूर्ण तपास व कारवाईचे कामकाज सुरु असतांनाच काल दिनांक २६ मे २०२३ शुक्रवार रोजी गोंदेगाव येथील कौतिक खाकरे हे गोंदेगाव येथुन शेंदुर्णी येथे बँकेतून पैसे काढण्यासाठी आले होते त्यांनी बॅंकेतून एक…
पो. डा. प्रतिनिधी, गोंडपिपरी :- शासनाकडून निधी वितरित करण्यात दिरंगाई होत असल्याने ग्रामीण भागाचा विकास रखडला आहे. तोहोगाव च्या विकासासाठी मी कटिबद्ध असून टप्प्या-टप्या ने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. सुभाष धोटे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, गावातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयना अवस्था असून मुख्य रस्त्याच्या काँक्रेटिकरणा साठी दीड कोटी रूपये प्रस्तावित करून गावच्या विकासाला हातभार लावण्याचे आश्वासन त्यांनी तोहोगाव ग्रामपंचायत येथे आयोजित बैठकीत दिले. आमदार सुभाष धोटे तोहोगाव येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले होते. त्यांनी तोहोगाव येथील ८०० मीटर बायबस रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणं साठी ३०५४ योजनेमधून ४५ लक्ष रुपये मंजूर केले…