- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
पोलीस डायरी, वार्ताहर, अहिल्यानगर : crime story प्रेमप्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरून नऊजणांनी गीता रमेश राठोड हिचा गळा आवळून व लोखंडी रॉडने मारहाण करत खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्याची घटना पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी शिवारात सोमवारी रात्री घडली. याबाबतची माहिती विस्तराने, गीता राठोड़ ही एका प्रेमप्रकरणात मुलीला मदत करीत असल्याचा संशय काही जणांना होता. सोमवारी गीता राठोड हिला मोटारसायकलवरून फिर्यादीच्या राहत्या घरातून स्वप्नील राठोड यांचे नातेवाईक हरीष पवार यांच्या घरी डांगेवाडी येथे नेण्यात आले. तेथे गीताला आरोपींनी लोखंडी पाईपने व रॉडने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. साक्षीदार हे मध्ये पडले असता, त्यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. या वेळी…
पो. डा. डोंबिवली प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पदाधिकारी, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदकुमार जोशी यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे. सविस्तर वृत्त असेकी :- पीडित महिला ही एका पोलिस अधिकाऱ्याची पत्नी आहे. पोलिस अधिकारी हे जोशी यांचे मित्र आहेत. दरम्यान, घर रिकामी कर, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशा धमक्या देऊन शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेने जोशी यांच्यावर केला आहे. २०१८ ते एप्रिल २०२३ दरम्यान हा प्रकार घडल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, जोशी यांनी विनयभंगाचा आरोप फेटाळला आहे. मी त्या महिलेला कधीही भेटलेलो नाही. विनयभंग प्रकरणाच्या विरोधात भाजपच्या वतीने…
पो. डा. वार्ताहर: छत्तीसगडमधील मनेंद्रगड जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी मृत तरुणाच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी कुटुंबातील कोणीही सदस्य आले नाहीत. यानंतर पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सचिन सिंह यांनी मृत तरुणाच्या दोन वर्षाच्या निष्पाप मुलाला आपल्या कडेवर घेऊन मुखाग्नी दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, ग्वाल्हेर येथील निक्की वाल्मिकी आणि कोरबा येथील सविता यांचा आंतरजातीय विवाह झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला होता. मनेंद्रगडनंतर रायपूरमध्ये राहून हे दोघं मजूर म्हणून काम करू लागले. काही दिवसांपासून निक्कीची तब्येत बिघडत होती. त्याचा परिणाम त्याच्या कामावर होत होता. मालकाने पती-पत्नीला वाहनात बसवून मनेंद्रगडला पाठवले. पण,…
पो.डा. प्रतिनिधी,नवी दिल्ली : चर्चमध्ये घेतलेली शपथ पूर्ण करण्यासाठी एका महिलेनं आपल्या पतीचा कबरीतील मृतदेह बाहेर काढायला लावला. मृत पतीच्या अवशेषांसह केरळमधील तिच्या गावी जाण्याच्या आग्रह या महिलेचा होता. पती-पत्नी दोघेही सेंट अँथनी शाळेत शिक्षक होते. निवृत्तीनंतर पत्नी जॉलीने आपल्या पतीचा मृतदेह केरळला नेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. दोन वर्षांपूर्वी जॉलीच्या पतीचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता. शाळेजवळील स्मशानभूमीत त्यांची कबर खोदण्यात आली होती. आता महिलेनं पतीची कबर पुन्हा खोदून घेतली आहे कारण तिला त्याचे अवशेष तिच्या मूळ गावी घेऊन जायचे आहेत. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील फरुखाबादचं आहे. लग्नाच्या वेळी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेणारे लोक तुम्हाला दिसतील, पण ही शपथ पाळणारे…
पो. डा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरच्या पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात ईडीने तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.या घरकुल योजनेत 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ईडीने संभाजीनगरमध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर ईडीने महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली, तत्कालीन महापालिका आयुक्तांची सुद्धा चौकशी केली होती आणि त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीन चौकशीसाठी बोलावले असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनील चव्हाण सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत आहे. सविस्तर माहिती या प्रमाणे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या…
पो. डा. प्रतिनिधी, सातारा : वेळेवर जेवण दिले नाही म्हणून वत्सला नामदेव बाबर (वय ७०) या वृद्ध आत्याचा भाच्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील बसाप्पाचीवाडी येथे घडली. या घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत भाच्याच्या मुसक्या आवळल्या. हरिदास सुरेश चव्हाण (वय ३०,रा. बसाप्पाचीवाडी,ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. संशयित आरोपी हरिदास चव्हाण याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो त्याची आत्या वत्सला बाबर यांच्याकडे राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सोमवारी रात्री हरिदासने आत्याला जेवण मागितले. मात्र, त्याला वेळेवर जेवण न दिल्याने त्याने वत्सला बाबर यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या…
पो. डा. प्रतिनिधी, गडचिरोली : विरोधात आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना घरी जाऊन धमकी देणारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.बाजार समिती निवडणुकीदरम्यान खांडवे यांनी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी न्यायालयाने खांडवे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. चामोर्शी बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात गण्यारपवार यांचा पॅनल होता. ते स्वत:ही उमेदवार होते. २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. त्याच पहाटे ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण केल्याचा आरोप गण्यारपवार यांनी पोलीस निरीक्षक खांडवेंवर केला होता.…
पो. डा. प्रतिनिधी, जळगाव : हद्दपारीचे आदेश असतांना देखील जळगाव शहरात धारदार शस्त्र बाळगत वावरणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत असे गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी हद्दपार तरुणाचे नाव आहे. त्याला जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील महेश लिंगायत याच्या कब्जातून लोखंडी कुकरी हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 161 मुंबई पोलिस कलम 42 व शस्त्र अधिनियमानुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. भास्कर ठाकरे करत आहेत.
पो. डा. प्रतिनिधी, Maharashtra Government Scheme : राज्यातील गरीब जनतेच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. विविध कल्याणकारी योजना गरीब लोकांसाठी राज्य शासन सुरू करत असते. अशातच राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आता गरीब लोकांच्या कल्याणासाठी अडीच लाखात घर उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा लाभ हा सर्वच नागरिकांना होणार नाही. याचा लाभ हा काही मोजक्याच नागरिकांना होणार असून आज आपण या योजनेअंतर्गत कोणत्या नागरिकांना अडीच लाखात घर मिळणार आहे, यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत? याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.…
चंद्रपूर, दि. 29: आर्थिक वर्ष 2023-24 करीता इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यास शासनाने डिसेंबर 2021 पासून मान्यता दिली आहे. उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे, उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रुपये 10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रुपये 20 लक्ष पर्यंत कर्ज अदा करण्यात…