Author: Police Diary

चंद्रपूर दि.3, आजच्या जागतिक सायकल दिन व पर्यावरण दिनानिमित्त प्रदुषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सायकल रॅलीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले होते. सदर सायकल रॅलीमध्ये तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत काळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी तसेच जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक विजय अंबारे, अधिक्षक सुरेश शेंडे, स्विय सहायक नरेन्द्र भोवरे, प्रकाश पायतोड व सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच मामला सायकल ग्रुप, आय.एम.ए. सायकल ग्रुप मधील मंगेश गुलवाडे व इतर सदस्य आणि गो ग्रिन सायकल ग्रुप मधील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले…

Loading

Read More

चंद्रपूर इंडियन मेडिकल असोसीएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद अग्रवाल यांनी आपल्या चमूसह चंद्रपूर शहराला भेट दिली.त्यांच्या चमू मध्ये आयएमए चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.जयेश लेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रविंद्र कुटे,अध्यक्ष अकशन कमिटी डॉ.अनिल पाचनेकर, डॉ.संतोष कदम सचिव आयएमए महाराष्ट्र यांचा समावेश होता.  वरोरा येथील आनंदवन येथे “आओ गाव चले” या प्रकल्पाचे उद्घाटन केल्यावर उपस्थितांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बेलसणी या गावाला भेट दिली.तेथे आयएमए चंद्रपूर तर्फे आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. गावातील १७३ रुग्णांनी ह्या शिबिरात सहभाग घेतला. सदर आरोग्य शिबिरामध्ये WCLच्या राजीवरतन हॉस्पिटल व पी .एच .सी .घुग्गुस येथील डॉक्टरांनी…

Loading

Read More

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत राज्याच्या एकात्मिक फलोत्पादन विभागाने सबसिडीवर फलोत्पादनासाठी निधी उपलब्ध केला आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची विनंती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर यांनी केली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन या बाबींचा समावेश आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध घटकांना अनुदान मर्यादेच्या अधिन राहून निधी देण्यात येणार आहे. फुले लागवड घटक अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी प्रती हेक्टर 1 लक्ष…

Loading

Read More

राजुरा (ता.प्र) :- ग्रामपंचायत सोनापुर अंतर्गत येणाऱ्या सोनापूर फाट्या लगत पाटण मार्गे गडचांदुर कडे येणारी भरधाव हायवा वाहन क्र. MH34BG9975 समोरून येणाऱ्या पाळीव प्राणी बैलं – गाई आणि वासरू च्या कळपाला जोरदार धडक दिल्याने २ बैलं, ४ गाई, १ वासारूचा जागीच मृत्यू झाला तर ४ बैलं जखमी झाले. घटनास्थळी शेतकऱ्यांमार्फत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार सुभाष धोटे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिस निरीक्षक आणि पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तात्काळ पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर आ. धोटे यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून घटनास्थळी दाखल होत हायवा चालक…

Loading

Read More

आज दिनांक २ जून २०२३ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा तालुक्यातील दाताळा, पान्हेरा, गिरडा,चौथा, जामठी,धाड प्रजिमा २१ कि.मी ४५/५०० ते ४८/५०० मधील लांबीच्या रस्त्याची सुधारणा करणे रुपये ०१ कोटी ९० लक्ष रुपये किमतीच्या विकास कामाचा भावी भूमिपूजन सोहळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, यावेळी सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, विठ्ठल देवकर,विनोद सपकाळ,गोविंदा नप्ते, उत्तम गायकवाड, श्री रविंद्र गायकवाड, राजेंद्र गायकवाड,विशाल गायकवाड, श्री गुलाबराव गायकवाड, यांच्यासह सर्व शिवसेना युवा सेना पदाधिकारी तसेच प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते…!

Loading

Read More

नागपूर जिल्ह्यात सर्व मतदार संघात 1 जून ते 16 ऑगस्ट 2023 मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण या कार्यक्रम जाहीर झाला आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदान नोंदणी करून घ्यावी. तसेच मतदार यादीबरोबर आधारकार्ड जोडण्यात यावे, असे आवाहन मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे. निवडणूक आयोगाने घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने मतदान नोंदणी चालू केली आहे. त्यासाठी NVSP.IN हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. VOTER HELPLINE हे अॅप्लिकेशनही उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक गावांमध्ये बिएलओकडे देखील ऑफलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येते. या कालावधीत मतदान ओळखपत्र दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र आधारकार्डशी जोडणे, मतदार यादीतील नाव कमी करणे अशी सर्व कामे…

Loading

Read More

जिल्ह्यातील प्रदूषणाचा वाढता आलेख असताना सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होताना दिसत नाही, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला शंखपुष्पी भेट देत स्मरणशक्ती वाढविण्याचा सल्ला दिला. जिल्ह्यातील चंद्रपूर, घुग्गुस, ताडाळी या प्रदूषित एमआयडीसी मधील रासायनिक, सिमेंट विटा, स्टील, औष्णिक विद्युत केंद्र, ऑईल कंपनी यामुळे गंभीर वायू प्रदूषण होत असून हवेची व पाण्याची गुणवत्ता खराब झालेली आहे यामुळे अनेक स्थानिक नागरिकांना श्वसनाचे, त्वचेचे आजार होत आहे तर काही कामगारांना फुफुसाचे कॅन्सर झाल्याची बाब पुढे आली आहे. ही बाब गंभीर असून रोजगाराचा विचार करताना आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे करीता कठोर कारवाई करणे…

Loading

Read More

चंद्रपूर, दि. 2: एकंदर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने शासनाने ठरविलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनात जिल्ह्याची आर्थिक प्रगती वाढविणाऱ्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित ‘जिल्हा विकास आराखडा’ आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की विकसित जिल्हा बनण्यास सक्षम करणाऱ्या विकासाभिमुख दृष्टीकोनाची रूपरेषा…

Loading

Read More

नागपूर जिल्ह्यातील अतिसराचा उद्रेक झालेल्या दोन गावांमध्ये आज दोन जून रोजी राज्यस्तरीय आरोग्य पथकाने पाहणी केली. रुग्णांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जलस्त्रोताकडे लक्ष वेधण्याची सूचना केली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज 2 जूनला प्रा. आ. केन्द्र भिषणूर व व प्रा. आ केंद्र जलालखेडा अंतर्गत मौजा पेठ मुक्तापूर या साथ उद्रेक गावात राज्यस्तरावरून आलेले राज्य साथ रोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे,व युनिसेफ सल्लागार डॉ. अमोल मानकर तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर तसेच, श्री. सी. जी. परुळकर प्रभारी अधिकारी प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नागपूर तसेच साथ रोग…

Loading

Read More

पो.डा. नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 4 जून रोजी रविवारी होत आहे. नागपूर येथील 32 उपकेंद्रावर सकाळी दहा ते बारा व दुपारी तीन ते पाच या दोन सत्रात 11 हजार 146 उमेदवार परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी प्रशासन तयारीला लागले असून 32 उपकेंद्रांची यासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी सूचना या परीक्षेला येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, यापैकी किमान कोणतेही एक मूळ…

Loading

Read More