Author: Police Diary

गायत्री परिवाराच्या ४८व्या अश्वमेध महायज्ञ स्थळाचे भूमिपूजन मुंबई, दि. ४ :  भारत देश आध्यात्म आणि संस्कृतीचे माहेरघर आहे. जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आणि विद्वत्ता भारताच्या आध्यात्मात आहे. गायत्री परिवार यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे.  जगाच्या कल्याणासाठी गायत्री परिवाराचा अश्वमेध यज्ञ उपयुक्त ठरेल, असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला. मुंबईत गायत्री परिवार आयोजित अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वार शाखा मुंबई द्वारा ४८ व्या अश्वमेध महायज्ञ निमिताने आयोजित भूमिपूजन समारंभात राज्यपाल रमेश बैस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, गायत्री परिवारचे डॉ. चिन्मय पंड्या, हिरानंदानी, राधिका मर्चंट, जिल्हाधिकारी योगेश…

Loading

Read More

मुंबई, ता. 4 : भारत आणि युरोपीय देशातील संस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी  महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेहदेखील  घट्ट व्हावा अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. “द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडिया” च्या वतीने मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित “युरोपियन डे”  समारंभात ते बोलत होते. मंचावर मध्य प्रदेशचे सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग तथा विज्ञान व तंत्र विज्ञान मंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा, स्वीडन च्या कौन्सिल जनरल…

Loading

Read More

चंद्रपूर, दि ४ : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍ह्यातील पोंभुर्णा येथील आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी शासकीय जमीन उपलब्ध झाली आहे. यासंदर्भातील जमिन हस्तांतरणाचे आदेश चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. पोभूर्णा येथे अनुसूचित जमातीच्‍या मुलां-मुलींकरीता नवीन शासकीय वसतिगृह सुरू करण्‍यासाठी शासनाने मान्‍यता प्रदान केली होती. राज्‍य शासनाच्‍या आदिवासी विकास विभागाने दि. ८ मार्च २०१९ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला होता. विशेष म्‍हणजे दि. २ मार्च २०१९ रोजी सावली येथे झालेल्‍या विविध विकासकामांच्‍या भूमिपूजन कार्यक्रमात लवकरच अनुसूचित जमातीच्‍या मुलां-मुलींकरीता नवीन शासकीय वसतिगृह सुरू करण्‍याचे आश्‍वासन मंत्री ना. श्री.…

Loading

Read More

चंद्रपूर शहरानजीक दुर्गापुर ओपन कास्ट कोळसा खान गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.आधीच ह्या खाणीमुळे जल,जंगल आणि वाघाचा अधिवास कमी केला असून इथे वन्यजीव मानव संघर्ष सुरू आहे,ह्यातच भर म्हणून की काय केंद्र आणि राज्य सरकारने पुन्हा 121.58 हेक्टर जंगलाची जमीन कोळसा खाणीसाठी दिली आहे.ह्यामुळे परिसरात पर्यावरनाचे,जंगलाचे,वाघ आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान होणार आहे. खाणीच्या विस्तारीकरणाला चंद्रपुर येथील वन्यजीव संस्था आणि वण्यप्रेमीनि नुकतीच एक बैठक घेऊन ताडोबा बचाव समितीची स्थापना केली असून ह्या विस्तारिकारणाला विरोध करायचे ठरविले आहे. ही खान 13 वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या अदानी कोळसा ब्लॉकला लागून,सीनाळा गावाजवळ असल्यामुळे, आणि या खाणीच्या परिसरात किमान आठ ते दहा वाघ आणि असंख्य…

Loading

Read More

चंद्रपूर , दि. ४ : एसएनडीटी विद्यापीठाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल शाळेमध्ये स्थापन होत असलेल्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या ज्ञानसंकुलाचा शुभारंभ होणार आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एसएनडीटी) अभ्यासक्रम चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहे. बुधवार, ७ जून २०२३ पासून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना पत्र पाठवत ही माहिती…

Loading

Read More

वेकोलीचे पोवनी सब एरिया अंतर्गत माती व कोळसा उत्खननाचे कंत्राटदार म्हणून हर्षा कंपनी काम करत आहे. या कंपनीमध्ये साखरी आणि परिसरातील भूमिहीन शेतकऱ्यांचे बेरोजगार तरुणांना काम मिळावे यासाठी आज काँग्रेस पक्षाचे वतीने साखरी येथील गावकरी व तरुणांसह धडक देऊन जाब विचारण्यात आला.प्रदेश काँग्रेसचे ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष तथा राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमाकांत धांडे यांनी कंपनीत रोजगार देताना काँग्रेस पक्षाच्या वतीने शिफारस केलेल्या युवकांना डावलण्यात आले असून इतरांना मात्र सामावून घेण्यात आल्याचा आरोप यावेळी केला.

Loading

Read More

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज पुण्यात ४४० कोटी रुपयांच्या ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या यांच्या भागीदारीतून उभारण्यात आलेल्या ८ पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर केंद्रीय रस्ते निधीतून सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एका पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते करण्यात आले. १. मध्य रेल्वेच्या पाटण-पंढरपूर राज्य महामार्गावरील मसूर ते शिरवडे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्र. ९२ येथील दोन पदरी उड्डाणपूल, २. मध्य रेल्वेच्या अतिग्रे-इचलकरंजी राज्य महामार्गावरील रुकडी ते हातकणंगले रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २० येथील…

Loading

Read More

शनिवार रवीवार बघुन अगदी गाैंडकालिन परकाेटाला लागुन तसेच पकाटाच्या अगदी जवळ अवैध घर बांधकाम केल्या जात आहे. आणि चंद्रपुर मनपाचे अधिकारी कुंभकर्णी झाेपेत आहे. आयुक्त म्हनाले शनिवार, रवीवार सुध्दा कारवाही करू. मनपाचे कार्य जाहीरात पुरतेच. शहरात शनिवार रवीवारलाच अवैधरित्या बांधकाम जाेमात सरू. अतिक्रमण अधिकारी म्हनताे साह्यक आयुक्त आदेश देतील तरच बांधकाम थांबण्यात येईल. अधिकारी कर्मचारी म्हनतात तक्रार असेल तर कारवाही करू ही भाषा दादा काेंडक्याचा साेंगाड्या चित्रपटाच्या नावापुरतीच खरी ठरते. मग नियम कायदा असुन मात्र तक्रार करून फायदा अतीक्रमण, अवैध घरबांधकाम करणार्याचा हाेताे. मनपा आयुक्त तक्रारी चे फाेन घेत नसतात. तक्रार लेखी करा किंवा ऑनलाईन अँपवर करा कुठलीच कारवाही चंद्रपुर…

Loading

Read More

#पुणे | मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या ९ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ७०० कोटी रुपयांच्या नियोजित ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी (दूरदृश्यप्रणालीद्वारे) , पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्य आणि केंद्र एकत्र आल्याने चांगली कामे उभी रहात आहेत. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की…

Loading

Read More

चंद्रपूर: संयुक्त राष्ट्रसंघाने 3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने आयएमएचे अध्यक्ष डॉ.  कीर्ती साने, ज्येष्ठ इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर चे सदस्य आणि सायकलपटू डॉ.  विलास मुळ्ये यांच्या नेतृत्वाखाली आयएमए चंद्रपूर आणि चांदा रायडर्स ग्रुपतर्फे सायकल रॅलीचे  आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध व्यवसायातील 30 सायकल रायडर्सनी एकत्र येऊन मोहीम पूर्ण केली. तसेच  जिल्हा न्यायालय आणि दंडाधिकारी यांची आयोजित केलेल्या रॅलीत उपस्थिती होती. या सायकल रॅलीचा प्रारंभ प्रियदर्शनी हॉल पासून ते घुग्गुस रोड ते नागाळ्यापर्यंत गेले आणि चंद्रपूरला परतले.  यावेळी उपस्थितांनी निरोगी शरीरासाठी आणि सुरक्षित वातावरणासाठी सायकलिंगला प्रोत्साहन दिले. सायकल हे एक साधे, परवडणारे, स्वच्छ आणि पर्यावरणास…

Loading

Read More