- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
ठाणे महानगर पालिकेच्या वतीने दिवा शहरात राबविण्यात येत असलेल्या सुमारे ६१० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. दिवा येथे आयोजित कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते. दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. #दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही…
अग्नीवीर सैन्यभरती मेळावा 10 जूनपासून पो डा वार्ताहर, नागपूर, विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे 10 ते 17 जून या कालावधीत अग्नीवीर सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर पत्रकार परिषदेत दिली. सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, लोकल मिलिटरी अथॅारिटी जीआरसी कामठीचे ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते. अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आली. त्याचा निकाल 20 मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांनाच या मेळाव्यात प्रवेश देण्यात येणार आहे.…
पो डा वार्ताहर, वाशिम, : इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता ही योजना आहे. इतर मागास प्रवर्गातील विदयार्थी/ विदयार्थीनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे. अभ्यासक्रमासाठी १० लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी २० लक्ष रुपये इतके कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १७ ते ३० वर्ष असावे. तो इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावा. महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता ८ लक्ष रुपये…
पो.डा. सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून सुमारे ११० कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. सावंतवाडी शहरातील भाजी मार्केट, सावंतवाडी दोडामार्ग शासकीय विश्रामगृह, बॅ.नाथ पै सभागृह या विकासकामांचे लोकार्पण तर रमाकांत आचरेकर क्रिकेट गॅलरीचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर, दि. 5 : बाजारात बोगस कंपन्या, खाजगी व्यक्तींमार्फत परवाना नसलेल्या अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. या अवैध बियाण्यांना शासनाची मान्यता नाही. अशाप्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी अनधिकृत एचटीबीटी बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे. याप्रकारची बियाण्यांची लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले असून एचटीबीटी आढळ्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीकडे अनधिकृत एचटीबीटी बियाणे आढळल्यास संबंधितांवर पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबत कृषी विभाग व पोलीस विभाग…
पो.डा. वार्ताहर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र क्षेत्रात पाईपलाईन जवळील हजार मीटर क्षेत्रातील वृक्षाची वयोमर्यादा 50 वर्षा पेक्षा जास्ती अशी 100 वृक्षा पेक्षा जास्ती वृक्ष उभे जाळले या वृक्षाला जाळल्या मुळे सी एस टी पी एस वारंवार घातक वायू प्रदूषण करीत आहे तरीसुद्धा अशा प्रकारचे वृक्ष जाडून नागरिकांना मिळणारे प्राणवायू नष्ट करीत आहे अशा सीएसटीपीएस मुख्य अभियंता वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे वन परिषद क्षेत्र अधिकारी चंद्रपूर वन विभाग यांना लेखी तक्रार दिल्यानंतर मोका पाहणी करिता वन अधिकारी वन सायक धीरज देगावकरयांनी मोका पाणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनात आले…
पो.डा. वार्ताहर : ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ताडोबा बचाव समितीचा जंगल,वाघ आणि वन्यजीव संरक्षनासाठी उपक्रम हाती घेतला. चंद्रपूर शहरानजीक असलेल्या दुर्गापुर ओपन कास्ट कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निमित्ताने चंद्रपूर शहरातील पर्यावरण कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक यांनी विरोध दर्शवून पर्यावरण दिवस साजरा केला. चंद्रपूर शहरानजीक दुर्गापुर ओपन कास्ट कोळसा खान गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आधीच ह्या खाणीमुळे जल, जंगल आणि वाघाचा अधिवास कमी केला असून इथे वन्यजीव मानव संघर्ष सुरू आहे. २०२२ यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त ५३ लोकांचा बळी मानव वन्यजीव संघर्षात गेलेला आहे. भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील मानव वन्यजीव संघर्षाचा केंद्रबिंदू चंद्रपूर जिल्हा…
रत्नागिरीदि 5(पो.डा. वार्ताहर: जागतिकतापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदुषणाचा विचार करता, पर्यावरणाचे रक्षण करणे हे आवश्यकआहे. किंबहुना प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्यच आहे. पर्यावरण रक्षणासाठीनागरिकांनी पुढाकार घ्यावा. पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड अत्यंत गरजेची आहे. त्यादृष्टीनेकादंळवन जतन व लागवड करणे अतिशय महत्वाचे आहे असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्रीउदय सामंत यांनी केले. मौजेआरे येथे वनविभाग महाराष्ट्र शासन व कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवडकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळीरत्नागिरीचे प्रांतधिकारी विकास सुर्यंवशी, विभागीय वन अधिकारी दिपक खाडे,रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, आरे काळबादेवी सरपंच तृप्ती पाटील आदीमान्यवर उपस्थित होते.पालकमंत्रीपुढे म्हणाले, कांदळवन हे इतर यंत्रणेपेक्षा सहापट कार्बनडाय…
पो. डा. वार्ताहर, चंद्रपूर, : चंद्रपूर येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) ही भारत सरकारच्या रसायन व पेट्रोरसायन विभाग तसेच रसायन व खते मंत्रालयाची मान्यताप्राप्त असलेली ISO 9001:2015 प्रमाणित नामांकित इन्स्टिट्यूट आहे. प्लास्टिक आणि संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील मानव संसाधन व कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी आणि या क्षेत्रातील उद्योगांना तांत्रिक सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी या संस्थेमध्ये तीन व सहा महिने कालावधीचे रोजगरभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविले जातात. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना नामांकित प्लास्टिक उद्योग कंपन्यांमध्ये रोजगार दिला जातो. अशाच प्रकारचा तीन महीने कालावधीचा कौशल्य विकास कार्यक्रम बिरला ग्रुप, मुकूटबन यांच्या सीएसआर निधी मधून बेरोजगार युवक – युवती…
वारस नोंद लावण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात विशेष मोहीम राबवणार- पालकमंत्री उदय सामंत पो. डा. वार्ताहर, रत्नागिरी :- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण कटिबद्ध असून याचे दृश्य परिणाम नागरिकांना लवकरच दिसून येतील त्यासाठी नागरिकांनी थोडा संयम ठेवावा. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वारस नोंदीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वारस नोंद लावण्याबाबत दिनांक 12 ते 30 जून या कालावधीत तहसीलदारांच्या सहायाने एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या अल्पबचत सभागृहात आज ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण…