- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
पो.डा. पो.डा. वार्ताहर : भारत सरकारच्या उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या एचपिसीएल एलपीजी कंपनी चंद्रपूर मधे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या युनिट ची स्थापना करण्यात आली. एचपिसीएल मधील कामगाराच्या वेळेपेक्षा जास्त काम करवून घेणे, ओव्हरटाईम चा पूर्ण मोबदला मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी पाठपुरावा करून कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास अधिकाऱ्यांना भाग पडले. यावेळी मनसेवर विश्वास दाखवत एचपिसीएल येथील साठ ते सत्तर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्यत्व स्विकारले व एचपिसीएल एमआयडीसी येथे कामगार शाखेची स्थापना यावेळी करण्यात आली. कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविष सिंह यांच्या मार्गदर्शनात यावेळी युनिट अध्यक्ष पदी यशवंत देवगडे, युनिट उपाध्यक्ष मनोज देशकर व युनिट सचिव…
मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते कुडाळ येथे आज शासनआपल्यादारी अभियानाचा शुभारंभ झाला. या अभियानासाठी होणाऱ्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात क्रांती करणारा हा कार्यक्रम ठरेल असा विश्वास व्यक्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचांदूर बिबी आवारपूर या रस्त्याचे काम 6 कोटी रुपये खर्च करुन काही दिवसापूर्वीच जर्मन टेक्नॉलॉजी वापरून तयार केला डांबरीकरणाच्या रस्त्यावर पहिल्याच पावसात रेन वॉटर हार्वेस्टिंग होत आहे यामुळे पाणी पातळीत नक्कीच वाढ होणार आहे नाविन्यपूर्ण रस्ता तयार केल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर चे सर्वत्र कौतुक केले जात आहे लवकरच नागरिक पुरस्कार देणार आहेत (गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी चंद्रपूर ही एजन्सी या रस्त्याचे काम करीत आहे मंत्री महोदयांचे नातेवाईक असल्याने pwd चे या कामाकडे विशेष असे लक्ष आहे
कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच असा’ असा पाहुणचार करणाऱ्या आणि महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज दिली. राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध प्रकल्प राज्यात सुरु असून देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. #सावंतवाडी येथे सुमारे 110 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कोकणच्या विकासासाठी कोकण प्राधिकरणाची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. कोकणातील कोस्टल रोड एमएसआरडीसीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. कोकणात सबमरीन सुरु करण्यासाठी आवश्यक निधी…
पो डा वार्ताहर, नवी मुंबईच्या उलवे येथे १० एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते आज करण्यात आले. सर्वांना आनंद देणारा हा सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात तिरुपती बालाजींचे मंदिर साकारत असल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिरूमला ट्रस्टचे आभार मानले
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर पो डा वार्ताहर, नागपूर, – छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत सुमारे 70 हजार ते 1 लाख नवमतदारांची नोंदणी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प आहे. यासोबतच मतदार यादी अचूक करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिका-यांनी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यावेळी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण पो डा वार्ताहर, नागपूर, – राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू झाला असून अधिनियमांतर्गत अधिसूचित बऱ्याच सेवा ऑफलाईन स्वरुपात देण्यात येतात. ऑफलाईन सेवा चालू असल्यामुळे नागरिकांना पारदर्शक, समयोचित व कार्यक्षम पध्दतीने सेवा उपलब्ध होत नाही व कायद्याचा हेतू सफल होत नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण अपेक्षित आहे. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी विभाग प्रमुखांनी करावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सर्व विभागांनी त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सद्यास्थितीत ऑफलाईन देण्यात येत आहेत, त्या सर्व सेवा फक्त…
चंद्रपूर, दि. 7 : शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी नवनवीन प्रयत्न सातत्याने केले जातात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रेरणेतून ‘झेडपी चांदा स्टुडन्ट अॅप’ (ZP CHANDA STUDENT APP) तयार करण्यात आले आहे. लवकरच हे ॲप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेने शाळांशी संबंधित सर्व माहितीसाठी ‘चांदा स्टुडंट्स’ हे वेबपोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. या पोर्टलवर शाळा व विद्यार्थीनिहाय माहिती उपलब्ध असेल. ही प्रणाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था…
वाशिम, दि. 07 पो.डा. प्रतिनिधी : ग्रामीण व शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील व्यक्ती, शेतकरी व बांधकाम क्षेत्रातील मजूराला एखादा आजार झाला असेल किंवा शस्त्रक्रीया करण्याची आवश्यकता असल्यास त्यांना महागडे उपचार व शस्त्रक्रीया करणे आर्थिकदृष्टया परवडणारे नसते. या रुग्णांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जीवनदायी ठरली आहे. सन 2013 पासून सुरु झालेल्या या योजनेचा लाभ जिल्हयातील 44 हजार 28 रुग्णांनी घेतला आहे. या रुग्णांवर या योजनेतून 74 हजार 388 उपचार व शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचार व शस्त्रक्रीयांवर शासनाकडून 178 कोटी 95 लक्ष 73 हजार 940…
परभणी, दि.७ : लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून विविध शासकीय विभागाच्या योजना आपल्या दारी आणल्या जात असून, या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या अभियानाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे केले. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा तालुकास्तरीय कार्यक्रम आज कृष्णा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल बोलत होत्या. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार गणेश चव्हाण, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक एस. एच. पवार, वनपरीक्षेत्र…