- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
वाशिम, दि. 08 पो.डा. प्रतिनिधी : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (नागपूर ते शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होवून ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यानंतर २६ मे २०२३पासून शिर्डी ते भरवीर या पुढील मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन हा महामार्ग वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला आहे.या महामार्गावर रस्ता सुरक्षा निर्माण करण्याच्या दृष्टिने परिवहन विभाग,महामार्ग पोलीस विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने विविध उपक्रमांची अंमलबजावणी सातत्याने सुरु आहे. समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातापैकी काही अपघात हे वाहनांचे टायर फुटल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे.या पार्श्वभूमीवर समृद्धी…
चंद्रपूर, दि. 8 : महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील टोकावरचे गाव…..दुर्गम डोंगराळ भाग…. आदिवासी बहुल लोकसंख्या….. त्यातच रखरखत्या उन्हात ओसांडून वाहणारा नागरिकांचा उत्साह…..स्थानिक शाहीर संभाजी ढगे यांच्या आवाजात ‘शासकीय योजनांची जत्रा, योजना कल्याणकारी; विकास करण्या जनतेचा, शासन आलं आपल्या दारी.’ या गीताने रंगत भरली. निमित्त होते, ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मौजा भारी (ता. जिवती) येथील आदिवासी बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचे. यासाठी जिल्हा प्रशानाचे वरिष्ठ अधिकारी भारी गावात दाखल झाले. यावेळी स्थानिक आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मरुगानंथम एम., उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार दीपक वाझाडे, गावचे…
बुलडाणा, दि. 8 : जिल्हा परिषदेंतर्गत सन 2022-23 वर्षाची अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सुधारीत यादी जाहिर करण्यात आली आहे. या यादीवर आक्षेप असल्यास दि. 20 जूनपर्यंत सादर करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या https://zpbuldana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अनुकंपाधारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती ज्येष्ठता यादीवर संबंधितांकडून दि. 20 जून 2023 पर्यंत लेखी आक्षेप मागविण्यात आले आहे. तसेच अनुकंपाधारक उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेत वाढ झाली असल्यास शैक्षणिक वाढीचे कागदपत्रे दिलेल्या कालावधीत सादर करावे. तसेच सदर तात्पुरत्या यादीवर काही आक्षेप असल्यास विहित मुदतीत लेखी सादर करावे. आक्षेपांच्या पडताळणीनंतर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती यादी अंतिम करण्यात येणार आहे. याची अनुकंपाधारक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे…
रत्नागिरी दि 8(पो.डा. प्रतिनिधी : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपल्याने नव्याने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर सुमारे 19 जणांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेत. ते पुढीलप्रमाणे.. नगरपरिषद सदस्य – प्रविण जाधव. ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी – चंद्रकांत खोपडकर, चंद्रकांत धोत्रे, अल्लाउद्दीन ममतुले, पद्माकर भागवत, सुहेल मुकादम, अंकिता शिगवण, रमजान गोलंदाज, सुशांत जाधव, चंद्रकांत झगडे, श्रीकांत चाळके. वैद्यकीय व्यवसायाचे प्रतिनिधी – डॉ. विकास मिर्लेकर, डॉ. विद्या दिवाण. व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी – सुनिल रेडीज, शकील शेख मजगांवकर. पेट्रोल व गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधी – दत्ताराम लिंगायत, मनिषा कुवेसकर. शेतकरी प्रतिनिधी – दिनकर आमकर, संजय बामणे या सर्वांची…
त्यांना राईट टू प्रायव्हसी नाही का ??? त्यांच्या खाजगीपणाच्या अधिकाराचे काय ??? संस्कृतीच्या नावाखाली आपण आपल्या सोयीच्या गोष्टी करत असतो. याबद्दलच मला खूप आक्षेप आहे!!!! आधी पासून आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे असे ठसवले जाते, पण पुरुषाला प्रधान करण्यात सर्वात मोठा वाट उचलणारीचा कार्यभाग मात्र दुर्लक्षित आहे. जसा जसा यावर आक्षेप नोंदवणे सुरु झाले तसे पाहता पाहता काही अंशी चित्र पालटले आहे असे भासवले गेले, पण प्रत्यक्षात तसे अजिबात घडलेच नाही. पुरुष आणि महिला या समसमान आहे असे वारंवार भासवले जातेय, पण तो फक्त बनवलेला आभासच आहे. सांगायला आपण २१ व्या शतकात वावरतो आहे पण ते फक्त फुटकळ कल्पनांवरच बरं…
पो. डा. धुळे : – सदरील कॉलेजमधील ब्लड बँकेत अद्ययावत असलेल्या nac टेस्ट द्वारे रक्ताची चाचणी करण्यात येत नाही. सदरील कॉलेज मध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर ये जा असते. परंतु अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त उपकरणे सदरील कॉलेज मध्ये पाहण्यात आली नाही , तसेच त्या बाबतीच्या माहितीचा देखील अभाव आढळला. रक्त संक्रमणाशी संबंधित असलेल्या अद्ययावत चाचण्यांच्या नावाचा देखील कर्मचाऱ्यांना लवलेश नसल्याचेही आढळले. रक्त संक्रमण अधिकारी यांच्याशी भ्रमण ध्वनी द्वारे चर्चा केली असता त्यांनी आमच्या महाविद्यालयातील ब्लड बँक मध्ये सदरील चाचण्या ( NAC टेस्ट ) करण्यात येत नाहीत असे सांगितले. NAC टेस्ट चाचणी हि रक्त घटकातील HIV च्या विषाणूंना ट्रेस करण्यासाठी…
पो.डा. प्रतिनिधी गावपातळीवर काम करणाऱ्या यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांची तालुकापातळीवर सभा घेवून गावातील विविध योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती द्यावी. लाभार्थ्यांना संबंधित योजनेचा लाभ ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून देण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन लाभार्थ्यांपर्यत पोहोचून त्यांचे परिपूर्ण अर्ज भरुन घ्यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, उपजिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कैलास देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. षण्मुगराजन म्हणाले, जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या उपक्रमाअंतर्गत निर्धारीत…
पो.डा. प्रतिनिधी वाशिम, दि. 06 पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत साठविण्यासाठी जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून भूजल पुनर्भरणाची कामे यंत्रणांनी मोठया प्रमाणात करतांना जिल्हयातील विविध तलावात साठलेला गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी यंत्रणांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दयावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. जलशक्ती अभियान, जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित सभेत घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी अपूर्वा नानोटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर. वानखडे,…
भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीने अष्टभुजा वार्ड येथील जनतेला न्याय मिळावा म्हणून तर डम्पिंग यार्डच्या कामगारांना वेतन मिळावे म्हणून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात भाजपा नेते,रवी गुरनुले ,सुभाष कासनगोट्टुवार,ब्रिजभूषण पाझारे,प्रकाश धारणे,राम लाखियाॅ,संदिप आगलावे,सचिन कोतपल्लीवार,रुद्रनारायण तिवारी,धनराज कोवे,राकेश बोमनवार,रवी लोणकर,संदिप आवारी,संजय कंचर्लावार,रामकुमार आकापेल्लीवार,रितेश वर्मा,आकाश मस्के,महेश कोलावार,अमित निरंजने,प्रविन उरकुडे,आकाश ठुसे,बंडू गौरकार,सतीश तायडे,पप्पू बोपचे,प्रलय सरकार,निलिमा देवनाथ,पूनम रामटेके,बेबी मेश्राम,भूमिका खोब्रागडे,चंद्रिका भाजी,बिना मेहता,वासना मेहता,अंजना पोहनकर,पौर्णिमा रामटेके,रिना राॅय,सरस्वती मंडल,गीता सरकार,सुमन राॅय,विद्या उराडे,पिंगला धळसे,नम्रता नकारे,शैला उके,कल्याणी मंडल यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. डॉ.गुलवाडे म्हणाले,अष्टभुजा वार्ड लगत किमान 12 वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली.या…
चंद्रपूर, दि. 6 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 19 एप्रिल 2023 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजना 19 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 व आवश्यकतेनुसार प्रथम 3 वर्ष राबविण्यात येणार आहे. शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात तसेच अपघातामुळे येणारे अपंगत्व यासाठी अपघातग्रस्तांच्या वारसदाराला या योजनेअंतर्गत मदत दिली जाणार आहे. राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई,वडील शेतकऱ्यांची पत्नी/पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांना विमाछत्र प्रदान करण्यासाठी सुधारित स्वरूपात मान्यता देण्यात आली आहे.…