- Home
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
- राजकीय
- क्राइम स्टोरी
- Video News
- मेरी आवाज सुनो
- संपादकीय
- वार्तापत्र
- इतर
- Join Us !
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून समतामूलक समाज घडावा : डॉ. मंगेश गुलवाडे
- जय चंद्रपूर म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा घेतली आमदारकीची शपथ
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या विदर्भ प्रमुख या पदावर श्री प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांची नियुक्ती
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पावर स्टार पवन कल्याण यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले विमानतळावर स्वागत
- बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराजांचे मॉडेल चालेल, संघचे मॉडेल नाही – कन्हैया कुमार
- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. पवन कल्याण यांची 17 नोव्हेंबरला जाहीर सभा
- पश्चिम नागपूरमध्ये कंगना रनौत यांचा रोड शो उद्या
Author: Police Diary
परभणी, दि.९ पो. डा. प्रतिनिधी: शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सेलू तालुक्यातील नागरिकांनी या अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले. सेलू येथील श्री साई मंदिर येथे आयोजित उपक्रमात श्रीमती गोयल बोलत होत्या. श्रीमती मेघना बोर्डीकर-साकोरे, उपविभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, तालुका कृषी अधिकारी श्री. पठाण व संबंधीत विभाग प्रमुख उपस्थित होते. सेलू येथे आज झालेल्या कार्यक्रमात महसूल 985, कृषी 92, पंचायत समिती 1 हजार 270, नगर परिषद 37, पशु संवर्धन 12, शिक्षण 48, आरोग्य 15…
तहसिलमध्ये ई-ऑफिस राबविणारा वर्धा पहिला जिल्हा तहसिलस्तरावर शासकीय फाईलींना वेग विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक शासकीय कामकाज अधिक स्मार्ट व गतिमान होण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या प्रणालीचा जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी या उपलब्धीसाठी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले याचे आज कौतुक केले. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज झालेल्या विभाग स्तरीय बैठकांमध्ये सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. सर्व जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरांवर ई -ऑफिस प्रणाली राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी आज दिले. वर्धा जिल्हयात सुरुवातीस…
वाशिम, दि. 09 पो. डा. प्रतिनिधी : जिल्ह्यात एकूण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 19 हजार 351 लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करणे बाकी आहे. प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासनाने कोणत्याही अँड्रॉईड मोबाईलवर चेहरा प्रमाणिकरण ॲप्सव्दारे पी. एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रामाणिकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वत:चे ई-केवायसी प्रमाणिकरण तसेच इतर लाभार्थ्यांचे सुध्दा ई-केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे. हे ॲप्स वापरण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे. “PMKISAN GoI” या नावाचे ॲप्स गुगल प्ले -…
वाशिम, दि. 08 पो.डा. प्रतिनिधी: नगर परिषद,कार्यालय वाशिम येथे आज शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमातर्गत आयोजित शिबिराचे उदघाटन आमदार लखन मलिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आला.वाशिम तहसिल कार्यालयातून पंचाळा येथील रामचंद्र भगत व पार्डी (आसरा) येथील सुशिला इवरकर यांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत, सुराळा येथील हुस्नार शेख जब्बार,अंजनखेडा येथील पार्वती कव्हर व कळंबा महाली येथील गंगा बोरकर यांना संजय गांधी योजनेअंतर्गत, शेलु (बु.) येथील अनिकेत आरु,अनसिंग येथील वशीर महम्मद पीर महम्मद,बाभुळगांव येथील किसन नागरे, तनका येथील परमेश्वर जाधव,सावरगांव ( जिरे) येथील शालिग्राम काळे, सुरकुंडी येथील जगन्नाथ भोयर व…
चंद्रपूर,दि. 7 : राज्यातील पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे खोदकामासाठी येणारा खर्च करणे शक्य होत नाही. सद्यस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी शासनाची कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने महाराष्ट्र शासनाने दि. 29 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. अर्ज करताना संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’…
वरोरा: चंद्रपूर -वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी आंबेडकर चौकात सभा पार पडली. वरोऱ्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व व्यापारी संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अखील भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आमदार प्रतिभाताई धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,मानस धानोरकर उपस्थित होते. लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, रामनवमी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढवस, शिवसेना(ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, भारतीय जनता पक्षाचे बाबा भागडे, राष्ट्रवादीचे जयंत टेमुर्डे,माजी जी.प. सभापती प्रकाश मुथा, मनसेचे रमेश राजुरकर, रिपब्लिकन पक्षाचे केशवराव ठमके,शिवसेनेचे आशिष ठेंगणे,काँग्रेसचे विलास टिपले, बाजार…
दरवर्षी पावसाळा ऋतूमध्ये दुथळी भरून वाहणाऱ्या सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव (गन्ना) येथील उमा नदीवर कमी उंचीच्या पुलामुळे पूर्णता वाहतूक ठप्प होऊन 20 ते 25 गावाचा संपर्क तुटत होता. यावर कायम व उपाय योजना म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय सन 2021- 22 बजेटमध्ये उमा नदीवरील पुलाकरिता 15 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. यामुळे सिंदेवाही तालुका ठिकाणावरून पावसाळी हंगामात संपर्क तुटणाऱ्या 25 गावातील नागरिकांच्या दळणवळणाची समस्या समूळ नष्ट होणार असून या नवनिर्माणातील पुलाची आज एअरलिफ्टच्या सहाय्याने पाहणी केली. सिंदेवाही तालुक्यातील मुख्य जलस्त्रोतापैकी एक असलेल्या उमा नदी प्रवाह विविध गाव सीमेवरून जातो. यामुळे सदर पात्रावरून पूर्वीच्या काळामध्ये शासनाने वाहतुकीकरिता तसा मार्ग क्रमनासाठी…
चंद्रपूर, दि. 08 : कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा. युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात. तसेच ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर कमी करण्याच्या हेतुने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात कौशल्य विकास केंद्र सुरू करावयाचे आहे. जेणेकरून, ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध होईल. यादृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीमध्ये, बल्लारपूर-कोठारी, भद्रावती-चंदनखेडा, ब्रह्मपुरी- पिंपळगाव, चंद्रपूर-मोरवा, चिमूर-नेरी, गोंडपिपरी-भंगाराम तळोधी, जिवती-शेनगाव, कोरपना-बिबी, मुल-राजोली, नागभीड-तळोधी (बाळापुर), पोंभुर्णा-देवाडा, राजुरा- विरूर, सावली- व्याहाड खुर्द, सिंदेवाही-नवरगाव, तसेच वरोरा-शेगाव या ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्याचे प्रस्तावित करण्यात…
नवरगाव येथील भारतीय जनता पार्टीचे कट्टर सक्रिय कार्यकर्ता तेजराम गहाणे यांनी काल माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवून तथा नवरगावचे सरपंच राहुलभाऊ बोडणे यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात एकजुटीने काम करण्यास मदत होणार असून वॉर्ड क्रमांक ६ मध्ये अधिक काँग्रेस बळकट होणार आहे. तेजराम गहाणे यांचा वॉर्ड क्रमांक ६ मध्ये कोहळी समाजामध्ये प्राभल्य आहे. तसेच नवरगाव येथील इंदिरानगर मध्ये राहत असलेले भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ता शैलेश कामडी यांनी सुद्धा माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश…
परभणी, दि.08 पो.डा. प्रतिनिधी : जिल्ह्यात अंमली पदार्थ आणि अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी संबंधित विभागाने अंमली पदार्थांची आणि अवैध मद्यविक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी दिल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत पोलिस अधीक्षक रागसुधा आर. बोलत होत्या. बैठकीस राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार, अन्न व औषध प्रशासन निरीक्षक मनेाज पैठणे, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. अमरदीप घुगे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, कृषि विभागाचे एन. के. चव्हाण, टपाल विभागाचे मोहमद इर्शाद शेख यांच्यासह समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाईबाबत…