Author: Police Diary

भंडारा ;- इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाकडून परदेशी शिष्यवृत्ती दिली जाते.मात्र या शिष्यवृत्ती निकषात असे आढळले की,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला असून खुल्या प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा २० लाख,तर ओबीसींसाठी ८ लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आले आहे.ही बाब ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे निकष ओबीसींना लागू करावे अशी मागणी ओबीसीं क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य जिल्हा भंडारा यांनी केली.ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्ती संदर्भातील व्यथा मांडल्या आहेत.परदेशी शंभर क्रमवारीतील विद्यापीठासाठी एससीसाठी उत्पन्न मर्यादाच नाही मग ती ओबीसींना तशीच लागू का करीत नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयांनी…

Loading

Read More

एमएचटी – सीईटी परीक्षेत 98.49 टक्के गुण नागपूर. एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यशाच्या दिशेने भरारी घेतली. या सर्वांमध्ये एका विद्यार्थ्याचे यश अधोरेखित होत आहे. नागपुरातील मासोळी विक्रेत्याच्या मुलाने तब्बल 98.49 टक्के गुण प्राप्त करून आपल्या नेत्रदिपक यशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिनेश प्रल्हाद नायक असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो क्रिष्णा टॉकीज जवळ, संत्रा मार्केट येथील रहिवासी आहे. दिनेशचे वडिल प्रल्हाद नायक हे मासोळी विक्रीचा व्यवसाय करतात तर आई रेखा या गृहिणी आहेत. दिनेशने न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज महाल येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. दिनेश नायक याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (Physics, Chemistry, Biology) या ग्रुपसह एमएचटी-सीईटी परीक्षा दिली. त्याने रसायनशास्त्र विषयात 99.59 टक्के, भौतिकशास्त्र विषयात 97.23 टक्के आणि जीवशास्त्र…

Loading

Read More

चंद्रपुर, दि. 13 : राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या देवाडा परिसरातील श्री. सिध्देश्वर मंदिराचे जतन व दुरुस्तीसाठी 14 कोटी 93 लक्ष 99 हजार 753 रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 13 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमीत केला असून राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे या मंदिर परिसराचा जीर्णोद्धार होणार आहे. महाराष्ट्र –तेलंगणा सीमावर्ती भागातील राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर देवाडा परिसरात 12 व्या ते 13 व्या शतकातील श्री. सिध्देश्वर पुरातन हेमाडपंथी मंदीर असून या परिसरात विविध लहान मोठ्या आकाराची मंदिरे आहेत. सिध्देश्वर मंदीर परिसराचा जीर्णोद्धार करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या…

Loading

Read More

पावसाळ्यापूवी जलयुक्तच्या कामांना पूर्ण करण्याचे आवाहन प्रधानमंत्री आवास योजना, शेती व घरकुल पट्टे वाटप योजनांसारख्या शासनाच्या अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत गतीने पोहचवण्यासाठी योग्य नियोजन करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामटेक येथील उपविभागीय आढावा बैठकीत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या मे महिन्यात १९ व २० मे रोजी हिंगणा, उमरेड, सावनेर, काटोल या उपविभागाच्या मान्सून पूर्व आढावा बैठकी घेतल्या होत्या. आज रामटेक येथील उपविभागाच्या बैठकीत शासनाच्या विविध पथदर्शी योजनांचा आढावा त्यांनी घेतला. रामटेक येथील गंगाभवन येथे आयोजित उपविभागीय स्तरावरील या बैठकीला खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जायस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस…

Loading

Read More

शासन आपल्या दारी योजनेंतर्गत आज रामटेक व मौदा येथे उपविभागीय आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते हार्वेस्टर, ट्रॅक्टर, बी-बियाणे व विविध कृषी साहित्याचे वाटप तसेच इतर लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हात शासन आपल्या दारी अभियानातंर्गत उपविभागीय स्तरावर आढावा बैठकी सुरू केल्या आहेत.या योजनेंतर्गत नुकतेच १९ व २० मे रोजी हिंगणा, उमरेड, सावनेर, काटोल या उपविभागात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना विविध लाभ देण्यात आला होता. आज रामटेक व मौदा येथे पुढील टप्यातील उपविभागिय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कृषी यांत्रिकिकरण उप अभियान अंतर्गत योगेश मोतरकर यांना कंबाइन हार्वेस्टर, किसनाबाई तिपाडे, अलका…

Loading

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या रामटेक व मौदा उपविभागाच्या व्यस्त कार्यक्रमात जलयुक्त शिवार कार्यक्रमाला प्राधान्य देत नाला खोलीकरणाचे भूमिपूजन केले.तर अन्य एका कार्यक्रमात पाणंद (पांदण) रस्त्याचे लोकार्पण केले. उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी रामटेक व मौदा उपविभागाच्या दौऱ्यावर होते. रामटेक येथील बैठकीनंतर मौदाकडे जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. याच मार्गावर चाचेर गावापुढे मातोश्री पाणंदरस्ते योजनेअंतर्गत नवेगाव आष्टी शिवारातील पाणंद रस्त्यांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर काहीच अंतरावर नवेगाव आष्टी ग्रामपंचायत खंडाळा येथील नालाखोलीकरण कामाचे भूमीपूजन करण्यात आले.एनटीपीसी यांचा सामाजिक दायित्व निधी व आर्ट ऑफ…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी, नाशिक शहर, जिग्नेश जेठवा: सातपूर पोलीस ठाणे हद्दीत श्रमिक नगर, कार्बोन नाका, शिवाजी नगर, सातपूर गाव, अशोक नगर व नजीकच्या लगतच्या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेवर दहशत कायम राहावी यासाठी अक्षय युवराज पाटील वय २८ वर्षे रा. आनंद सागर अप्पर्टमेन्ट रूम नं. ५, श्रमिक नगर , सातपूर नाशिक याने सर्वसामान्य नागरिकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार व मारहाणकरून लोकांच्या मनात भींती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यास दि. ११/३/२०२१ रोजी एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते. अक्षय युवराज पाटील याने हद्दपार कालावधी मध्ये पुन्हा गुन्हेगारी कृत्य चालू ठेवून जनजीवन विस्कळीत केल्याने मा. पोलीस आयुक्त यांनी एम पी डीए…

Loading

Read More

पो. डा. प्रतिनिधी, चंद्रपूर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार आदरणीय. श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना सोशल मीडियावर ” तुमचा लवकरच दाभोलकर होणार,..’ अशी जिवे मारण्याची धमकी पोस्टच्या माध्यमातुन देण्यात आली.हे प्रकरण अतिशय गंभीर असुन या धमकीची गांभीर्याने दखल घेवुन सौरभ पिंपळकर यांच्यावर गून्हा दाखल करुन तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक मा. परदेशी सर यांच्याकडे देण्यात आले . धमकी मागचा मास्टर माईंड कोण आहे हे शोधावे दाभोळकर हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या ही बाब अतिशय चिंता जनक आहे. अशा विचाराच्या समाजविघातक सक्तींना वेळीच रोखणे अत्यंत गरजेचे आहे. पवार साहेबांना सोशल मीडियारून देण्यात आलेल्या जाहीर धमकीचा निषेध…

Loading

Read More

चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाच्या २४व्या “रौप्य महोत्सवी” वर्षा निमित्त पक्षाच्या ध्वजावंदनाचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य यांच्या हस्ते संपन्न झाला,त्यानंतर पक्षाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड.बाबासाहेब वासाडे यांच्या अध्यक्षतेखाली,जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके, सेवादल जिल्हाध्यक्ष माणिकराव लोणकर,ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष महादेवराव पिदुरकर,सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष जगदीश जुनगरी,नितीन पिंपळशेंडे,ज्येष्ठ नागरीक विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास बहादे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत पक्षाच्या मागील २४ वर्षांच्या प्रगतीच्या वाटचालीवर वक्त्यांनी प्रकाश टाकला, त्याचप्रमाणे आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसेच नगर परिषदा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत सुद्ध चर्चा करण्यात…

Loading

Read More

चंद्रपूर, दि. 9 : ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांसाठी 11 कोटी 65 लाख 25 हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे. चंद्रपूर, पोंभुर्णा, मुल आणि बल्लारपूर तालुक्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभुत सुविधा पुरविण्यासाठी सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत एकूण 126 विकास कामांसाठी 11 कोटी 65 लक्ष 25 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात मुल तालुक्यातील 32 कामांसाठी 3 कोटी 10 लक्ष रुपये, चंद्रपूर तालुक्यातील 36 कामांसाठी 3 कोटी 45 लक्ष,…

Loading

Read More