Author: Police Diary

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : इंडियन रेड क्रॉस सोसायटी,टाटा कॅन्सर हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान बांधवांचे रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये बंदीवान बांधवांचे कान,नाक,घसा रोग, दंतरोग, त्वचारोग, नेत्र रोग व अस्थिरोग तपासून ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी सुद्धा करण्यात आली. यावेळेस इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे बोलताना म्हणाले की, बंदीवान बांधव जरी काही कारणास्तव बंदी कारागृहात असले तरी आरोग्य तपासणी हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, आणि त्याच अनुषंगाने त्यांची निशुल्क तपासणी करून त्यांना आवश्यक तो औषधोपचार करणे हे ईश्वरीय कार्य आहे. या शिबिरासाठी डॉ. मंगेश गुलवाडे,डॉ.बी.एच.…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : सिंचनाच्या संदर्भातील प्रलंबित कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये आसोलामेंढा सिंचन प्रकल्पातील दिघोरी व गोवर्धन शाखा कालव्याच्या कामांचा समावेश आहे.आसोलामेंढा सिंचन प्रकल्पात समाविष्ट असलेल्या दिघोरी शाखा कालव्यामुळे २० गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे, तर गोवर्धन शाखा कालव्यामुळे १८ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे सिंचनासाठी पाण्याची अडचण भासू नये, यासाठी कालव्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आसोलामेंढा सिंचन प्रकल्पाची उर्वरित कामे जून २०२४ पर्यंत पूर्ण…

Loading

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वात मोठा स्वीप कक्ष पाहण्यासाठी नागरिकांना आवाहन पो.डा. वार्ताहर,अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदान निवडणूक प्रक्रिया निरंतर चालू आहे.लोकशाहीचे महत्त्व वारंवार अधोरेखित करण्यासाठी स्वीप सारखा उपक्रम फार महत्त्वाचा आहे.अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा स्वीप मंडपमप हा कक्ष मतदार जनजागृतीतील इतिहास ठरू शकतो. “असे प्रतिपादन रवी कुमार अरोरा निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांनी केले. या कक्षाच्या निरीक्षणाप्रसंगी श्री अरोरा यांनी मतदार जनजागृतीच्या खेळांचा आनंद घेतला.त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात स्वीप समितीच्यावतीने मतदार जनजागृतीच्या शेकडो संकल्पना असलेला सुमारे सहा हजार स्क्वेअर फुटांचा स्वीप कक्ष उभारण्यात आलेला आहे. यावेळी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून १५ मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त १ हजार ५०५ तक्रारींपैकी १ हजार ३२९ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आल्याची तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित १७६ तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वीत आहे. सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करुन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करु शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर,पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असल्याने या दिवशी संबंधित मतदार संघात सुट्टी असणार आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असणार आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर संस्था (प्रतिष्ठान) आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, पुणे : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी चार शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजनाबरोबर इतर सोई-सुविधा शासनाकडून मोफत पुरविल्या जातात. या योजनेंतर्गत शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील जे. आर. गुंजाळ इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, आळेफाटा (ता.…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, शिर्डी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्राशिवाय पारपत्र (पासपोर्ट ), वाहन चालक परवाना (लायसन्स ), केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक, टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात…

Loading

Read More

पो.डा. वार्ताहर, पुणे : जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार १३ मे रोजी मतदान होत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून या निवडणूका पारदर्शक वातारणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर उपस्थित होत्या. श्री. दिवसे म्हणाले, मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उन्हाळा असल्याने सावलीसाठी शेड, मतदारांसाठी स्वतंत्र रांगा,…

Loading

Read More

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी मतमोजणी केंद्र व विविध कक्षांची केली पाहणी पो.डा. वार्ताहर, जालना : जालना लोकसभा मतदारासंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी आज जालना एमआयडीसी येथील मतमोजणी केंद्र व स्ट्राँगरुमची पाहणी केली. तत्पुर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुकीशी संबंधित विविध कक्षांना भेट दिली. डॉ. कुलकर्णी यांनी स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था असल्याची पाहणी करताना सुरक्षा व्यवस्थे संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करून सुरक्षा विषयक बाबींचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेला परिसर सुरक्षित करण्यास त्यांनी सांगितले. मतमोजणी केंद्रावर…

Loading

Read More

मतदान केंद्रांना अडीच हजार मेडीकल कीटचे वितरण पो.डा. वार्ताहर, पुणे : मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूक येत्या १३ मे रोजी होणार असून उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेऊन निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी २ हजार ६९१ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण कृषी महाविद्यालय येथील वितरण केंद्रातून करण्यात आले. मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ प्राथमिक उपचार देण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने मावळ लोकसभा मतदार संघातील मावळ २७७, चिंचवड १५९ व पिंपरी १५० याप्रमाणे ५८६ कीट, तसेच पुणे लोकसभा मतदार संघातील वडगावशेरी १४४, शिवाजीनगर ११३, कोथरुड १२८, पर्वती…

Loading

Read More