महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, नागपूर, :- महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तुषार सोमलवार यांना आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.