डाक विभागाकडून मतदार जागृती रॅली
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी,बुलडाणा,: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचा टक्का वाढावा आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांमध्ये कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये बुलडाणा डाक विभागाकडून मतदार जागृतीसाठी आज दि. 23 एप्रिल रोजी मतदाता जागृती रॅली काढण्यात आली होते.
जिल्ह्यात निवडणूक आचार संहिता लागू असताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून अतिशय शांत, शिस्तबद्ध पद्धतीने डाक विभागाचे डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अधीक्षक सतीश निकम आणि पोस्टमास्टर रविंद्र झिने यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यात डाक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाहीला मजबूत करावे, असे आवाहन डाक विभागाने केले.