राजुरा (ता.प्र) :– विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करावे, यशस्वी व्हावे. आपले आईवडील, शिक्षक आणि समाजाचे ऋण फेडावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी इन्फंट कॉन्व्हेंट राजुरा येथे सेवा कलश फाऊंडेशन राजुरा द्वारा आयोजित इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी सेवा कलश फाउंडेशन राजुराचे अध्यक्ष अभिजित धोटे, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी राजुरा शहरातील इयत्ता १० वी व १२ वी च्या एकूण ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत धोटे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू यांनी केले. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व पालक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.