निष्क्रिय भ्रष्ट खासदार परिवर्तन मंच तर्फे मतदार नागरिकांना आवाहन
पो.डा. वार्ताहर ,धुळे : धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांच्या निष्क्रिय,भ्रष्ट व लबाड खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुनश्च तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली आहे. हा धुळे मालेगाव लोकसभा मतदार संघातील मतदारांचा घोर अपमान आहे. मागील १० वर्षात भामरे यांनी विकासाचे एकही काम न करता केवळ “आप-आपसात” जाती – धर्मात भांडणे लावण्याचेच काम केले आहे. या विरुद्ध पसरलेल्या असंतोषास संघटित करून अशा सर्वांचा एकच उमेदवार उभा करण्याच्या निर्णयासाठी दाभाडी (मालेगाव) येथे मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.
जे- जे – राजकीय” नेते व सक्रिय” कार्यकर्ते विचारांशी सहमत” असतील अशा समविचारी नेते व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित असावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.