14 एप्रिलचा आठवडी बाजार रद्द
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दि. 14 एप्रिल रोजी असल्याने या दिवशीचा बुलडाणा येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंती निमित्ताने सकाळी 8 वाजता बुलढाणा येथील जयस्तंभ चौक येथे भिम पाळणा आणि माजी सैनिक व समता दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच शहरातून महिलांची मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. तसेच रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने शहरमधील मुख्य मिरवणूक मार्गावरील रस्त्यावर आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारातही गर्दी असते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होते. त्यामुळे दि. 14 एप्रिल रोजीचा बुलडाणा शहरातील रविवारचा आठवडी बाजार रद्द होऊन इतर दिवशी आठवडी बाजार भरविण्यात यावा, अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी केली आहे.
त्यानुसार बाजार आणि यात्रा कायदा 1862च्या कलम 5 नुसार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अधिकारानुसार रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, या दृष्टीकोनातून शहरामध्ये भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात येत आहे. सदर आठवडी बाजार त्या पुढील दिवशी भरविण्यात येणार आहे.