पो.डा. वार्ताहर , धुळे ग्रामीण:-गोंदूर येथे धुळे ग्रामीण पश्चिम भाजप कार्यालय शुभारंभ शुक्रवारी दिनांक ०८ मार्च रोजी शिवरात्री च्या पवित्र पावन दिवशी भाजप जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे यांच्याहस्ते करण्यात आला.‘राजकीय पक्षाचे कार्यालय हे जरी त्यांच्या कामाच्या सुलभतेसाठी असले तरी ते जनसेवेचे स्थान असते. इथे लोक आपल्या समस्या घेऊन येतात.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे निराकरण करायचे असते.केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी हे कार्यालय असून या माध्यमातून नागरिकांच्या शासकीय पातळीवरील विविध समस्या आणि तक्रारींचे निराकरण करण्यासह त्यांना शासकीय योजना विषयक मार्गदर्शन केल्यास भारतीय जनता पक्षाचे हे नुतन कार्यालय लोकसेवेचे केंद्र बनेल,’ असा विश्वास बाळासाहेब भदाणे यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.यावेळी भाजपा उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री.उत्कर्षभैय्या पाटील,धुळे तालुकाध्यक्ष श्री देवेंद्रअण्णा पाटील,जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोक सुडके,मा.नगरसेवक गोपीचंद नाना,रंगराव ठाकरे,मा.पंचायत समिती सदस्य सुरसिंगआप्पा भिल, कावठी संरपच शरद शिंदे,भिरडाई संरपंच राजेश पाटील,तरवाडे सुनीलभाऊ जमादार,वार संरपंच दिलीप पाटील,उपसरपंच अनिल पाटील,युवराज महाराज,गोदूर संरपचं कैलास पाटील,मा. सरपंच राजू पाटील,मा.सरपंच किशोर पाटील,वि.वि.का.सोसायटी व्हॉईस चेअरमन श्री छोटू माळी,संजय पाटील,निमडाळे मा.उपसरपंच बिजु सूर्यवंशी,जगदीश पाटील,चेतन भदाणे,नितीन पाटील,किशॊर पाटील,मधू दादा,प्रकाश पाटील,मुन्ना माळी,भास्कर भिल,भालचंद्र मालचे,ज्ञानेश्वर भिल,बबलू माली,सामाजिक कार्यकर्ता पप्पू माळी,जय श्रीराम मित्र मंडळ चे अध्यक्ष जितेंद्र पाटील. सामाजिक कार्यकर्ता नानू पाटील,जगदीश पाटील,बापू दादा,समस्त दूध संघटना,भाजप पदाधिकारी,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.