आरसेटीमध्ये महिला दिन साजरा
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा, : भारतीय सेंट्रल बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटीमध्ये 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यात आरसेटी कर्मचारी आणि महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरसेटीमधून प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू केलेल्या यशस्वी महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांना विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले.