पो.डा. वार्ताहर, बुलडाणा : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सरळसेवेतील पदभरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सैनिक कल्याण विभागाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची पदे भरण्यासाठ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दि. 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा कालावधी देण्यात आला होता. परंतू लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज मागविण्याचा कालावधी दि. 4 ते 24 मार्च 2024 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. याचा माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.