पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : शासनाने जिल्ह्यातील 14 धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी सर्व शेतकरी बंधुनी त्वरित धानासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन खरेदी केंद्रावर नोंदणी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.
शासकिय आधारभूत धान्य खरेदी योजना हंगाम-२०२३.२४ मध्ये रत्नागिरी जिल्हयांत शासनाचे वतीने “मुख्य अभिकर्ता” म्हणून दि. महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ मुंबई”“जिल्हा पणन कार्यालय रत्नागिरी” यांच्या वतीने जिल्हयात 14 धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी करण्यात येते. शासनाने धान खरेदी साठी 31 जानेवारी अखेर नाव नोंदणी करता मुदत वाढवून दिली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी धान पीकाची हंगाम-२०२३-२४ ची (भाताची) नोंद असलेला सात बारा उतारा, आधार कार्ड, अद्यावत बँक पासबुक, इत्यादी कागदपत्र घेऊन पुढील केंद्रांवर नोंदणी कराव्यात. तसेच सातबारा/ ८ अ उता-यासोबत नोंदणी करताना शेतक-याचा लाईव्ह फोटो संगणक प्रणालीवर अपलोड करण्यांत यावा.
खरेदी केंद्राची नांवे खालील प्रमाणे-
खेड तालूका सह.ख.वि.संघ.लि, खेड, केळशी परिसर अंबा उत्पा.सह. मर्या.केळशी, दापोली, दापोली तालुका सहकारी ख.वि. संघ.लि., दापोली, गुहागर तालुका सहकारी ख.वि.संघ.लि.गुहागर, चिपळूण तालुका सहकारी .ख.विक्री संघ, चिपळूण, मिरवणे, आकले, ता. चिपळूण, शिरळ विविध कार्य सेवा. सोसायटी शिरळ भागाडी, ता. चिपळूण, शिरगांव गट विविध कार्य सेवा. सोसायटी शिरगांव, ता. चिपळूण, रत्नागिरी जिल्हा कृषि औ. सर्व. सेवा संघ.लि. रत्नागिरी (झाडगाव नाका / संगमेश्वर), लांजा तालूका सह.ख. विक्री संघ लि. लांजा, राजापूर तालूका सह.खरेदी विक्री संघ.लि. राजापूर (राजापूर/पाचल).