दरवर्षी पावसाळा ऋतूमध्ये दुथळी भरून वाहणाऱ्या सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव (गन्ना) येथील उमा नदीवर कमी उंचीच्या पुलामुळे पूर्णता वाहतूक ठप्प होऊन 20 ते 25 गावाचा संपर्क तुटत होता. यावर कायम व उपाय योजना म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय सन 2021- 22 बजेटमध्ये उमा नदीवरील पुलाकरिता 15 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. यामुळे सिंदेवाही तालुका ठिकाणावरून पावसाळी हंगामात संपर्क तुटणाऱ्या 25 गावातील नागरिकांच्या दळणवळणाची समस्या समूळ नष्ट होणार असून या नवनिर्माणातील पुलाची आज एअरलिफ्टच्या सहाय्याने पाहणी केली.
सिंदेवाही तालुक्यातील मुख्य जलस्त्रोतापैकी एक असलेल्या उमा नदी प्रवाह विविध गाव सीमेवरून जातो. यामुळे सदर पात्रावरून पूर्वीच्या काळामध्ये शासनाने वाहतुकीकरिता तसा मार्ग क्रमनासाठी छोटी पूले बांधली. मात्र कालांतराने नदीपात्र खोल होत गेल्याने दरवर्षी पावसाळा हंगामात तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क पूर परिस्थितीमुळे तुटल्या जात होता. यात उमा नदीवरील कळमगाव (गन्ना) या गावाच्या सीमावरती भागातील पुढील गावाकडे मार्गस्थ होणारा पूल अगदी छोटा असल्याने पावसाळ्यातील पुरामुळे २० ते २५ गावांचा संपर्क तुटायचा. दरवर्षीच्या या संकटाला सामोर जावे लागत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात सन 2021- 22 अर्थसंकल्पीय बजेट मध्ये १५ कोटीं रुपयाचा निधी मंजूर घेत ओव्हरब्रिज ( उंच पुल) बांधकामाला मंजुरी मिळवून दिली. व सध्या सदर ओव्हरब्रिजचे बांधकाम कार्य तेजीने सुरू आहे.
काल तालुका जनसंपर्क दौऱ्यावर असताना माजी मंत्रीवार यांनी बोकरडोह – उमा नदीवरील पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बांधकामाचा गुणवत्ता दर्जा तपासण्याकरिता माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी हायड्रा क्रेन या यंत्राद्वारे चालणाऱ्या एअरलिफ्ट च्या साह्याने पूलाच्या वरील भागाची पाहणी करून उपस्थित बांधकाम अभियंत्यांना पावसाळा हंगामापूर्वी काम तातडीने करण्याचे निर्देश दिले. यावेळी सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.