वाशिम, दि. 08 पो.डा. प्रतिनिधी: नगर परिषद,कार्यालय वाशिम येथे आज शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमातर्गत आयोजित शिबिराचे उदघाटन आमदार लखन मलिक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आला.वाशिम तहसिल कार्यालयातून पंचाळा येथील रामचंद्र भगत व पार्डी (आसरा) येथील सुशिला इवरकर यांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत, सुराळा येथील हुस्नार शेख जब्बार,अंजनखेडा येथील पार्वती कव्हर व कळंबा महाली येथील गंगा बोरकर यांना संजय गांधी योजनेअंतर्गत, शेलु (बु.) येथील अनिकेत आरु,अनसिंग येथील वशीर महम्मद पीर महम्मद,बाभुळगांव येथील किसन नागरे, तनका येथील परमेश्वर जाधव,सावरगांव ( जिरे) येथील शालिग्राम काळे, सुरकुंडी येथील जगन्नाथ भोयर व पार्डी (आसरा) येथील विष्णु भोयर यांना तहसिल कार्यालय अभिलेख विभागातून नक्कल देण्यात आली.
तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातून वारा (जहॉ.) येथील प्रकाश लांभाडे यांना राशन कार्डची दुय्यम प्रत तर अनसिंग येथील मोनाली नारसिंग,वाशिम येथील शित शिरसाट, वाकळी येथील हसिना मांजरे,वाशिम येथील शाहीस्ता खान, तोरनाळा येथील शालीग्राम सावके, प्रविण कव्हर, वांगी येथील गजानन खंदारे यांना नविन राशन कार्ड देण्यात आले.
तालुका कृषी कार्यालयाकडून काजळंबा येथील कुंडलिक उगले, वसीम सय्यद,अशोक उगले,खरोळा येथील ज्ञानेश्वर इंगळे,कुंभारखेडा येथील नामदेव ठाकरे,अडोळी येथील गणेश इढोळे यांना सोयाबीन मिनी किटचे वाटप करण्यात आले. सुपखेलाच्या कविता ठाकरे यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.
सहायक आयुक्त,समाज कल्याण विभागाकडून दिपक गोडघासे,हर्षल घुगे,विवेक खरात, वैष्णवी शिंदे यांना टॅबचे वितरण करण्यात आले.सह जिल्हा उपनिबंधक कार्यालयामधून रिसोड तालुक्यातील सवड येथील विष्णु पुरी, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील विलास राऊत,कारंजा तालुक्यातील जांभ येथील अशोक सावळे व सोमठाणा येथील प्रदिप देशमुख यांना नोंदणी दस्तचे वितरण करण्यात आले.
नगर परिषद वाशिम कार्यालयाकडून गिरीश काकडे, नंदकिशोर इंगळे,चंद्रप्रकाश वानखेडे, अमरदिप कोर नारंग, रेणूका इरतकर यांना परिचय बोर्डचे वाटप करण्यात आले.जयश्री जटाळे,कांचन पाचंगे यांना जन्माचे दाखले,लिलाबाई ढेंगळे, अर्चना लोलूरे,सरीता सहस्त्रबुध्दे,उषा इंगोले यांना प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाचे वितरण पत्र,शारदा कछवे,सुनिता यादव,नितीन पेंढारकर, गोपाल फुलउंबरकर यांना बांधकाम परवाना पत्र वाटप करण्यात आले.
वाशिम तहसिल कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती विभागातून केशव भुजबळ, लक्ष्मीबाई चोपडे, गजानन देशमुख, काशिबाई देशमुख, संतोष देशमुख, कृष्णाणा नरहाळे, शिवाजी देशमुख, अंबुबाई देशमुख, शेख नयुम शेख भुरा व शेख वहिद शेख मज्जीद यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयाकडून पायल गोडबोले, हर्षवर्धन गायकवाड, गणेश काकडे, विनायक खंदारे,भगवान गायकवाड,किसन मर्ग,ओमकार वाघ, भिरंभ आलमवाले आणि सुधाकर राऊत यांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.महावितरण विभागातून नरेंद्र कांबळे,प्रियंका कांबळे,अविनाश पुरी,सारीका सोनुनकर यांना नविन विद्यूत कनेक्शन देण्यात आले.तसेच एस.टी. महामंडळाकडून साधना खेडकर यांना वर्षभर विनामुल्य प्रवास पास देण्यात आली.
आरोग्य विभागाने केशव गायकवाड,अब्दुल जलील,संदीप इंगोले,संघपाल वानखडे,सत्यभामा आरु यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड,बबन कदम,शिवाजी रोडगे, महादु कापसे,अप्पाराव मुसळे यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्ड आणि जगदिश महल्ले, विनोद ठाकरे व विशाल गवळी यांना आभा कार्ड देण्यात आले.
जलसंपदा विभागाकडून रामचंद्र शिंदे,भास्कर मनवर, सुनिल ठाकरे यांना उपसा सिंचन परवाना प्रमाणपत्र देण्यात आले.कबीरादित्य इंडेनकडून सुशिला पट्टेबहादूर, शेवंताबाई दळवी, वच्छलाबाई पट्टेबहादूर, सुशिला पट्टेबहादूर, कौसल्या पायघन, शेवंताबाई हरिमकर यांना उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. पंचात समिती वाशिम कार्यालयाकडून रमेश खिल्लारे व शिवाजी इंगळे यांना तीन दिवशीय प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आले
या शिबिर कार्यक्रमांतर्गत 227 राशन कार्ड, 8795 सेतु केंद्रातून विविध दाखले व सातबारा,350 नक्कल,15 राष्ट्रीय खाद्यतेल अभियान,235 नैसर्गिक आपत्ती मदत वाटप आणि 98 मान्यवरांच्या हस्ते लाभ व सेवाचा एकूण 9720 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.या शिबिराला वाशिम शहरातील व तालुक्यातील लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.