पो.डा. वार्ताहर – स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंतीनिमित्त दि. २९ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्री माता कन्यका सेवा संस्था व मुंबई येथील फोर्टीज हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयविकार तपासणी शिबिर चंद्रपूर येथील वनअकादमीमध्ये घेण्यात आले. यावेळी तपासणी दरम्यान ६४ बालकांना हृदयविकारासंबंधी आजार आढळून आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आज दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी २५ बालकांना हृदयविकार शस्त्रक्रियेकरिता मुंबई येथील फोर्टीज हॉस्पीटल येथे नेण्यात येत आहे. या हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. मुंबई येथे हृदयविकार शस्त्रक्रियेकरिता रवाना होत असलेल्या सर्वांना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय मंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शस्त्रक्रियेकरिता व शस्त्रक्रिया करून सुखरूप चंद्रपूरला परत येण्याकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.
श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर सातत्याने हृदयरोग मोफत तपासणी शिबिर, कर्करोग तपासणी शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर घेत आहे. यामध्ये शस्त्रक्रियेकरिता पात्र असलेल्या रुग्णांना मुंबई, सेवाग्राम, दिल्ली, हैद्राबाद व बेंगरूळ इ. ठिकाणी मोफतमध्ये शस्त्रक्रिया करुन घेत आहे. त्यामुळे गरिब नागरिकांना मोठा दिलासा मिळून पुढील आयुष्य सुदृढ जगण्याकरिता मदत होत असून कुटूंब उध्दवस्त होण्यापासून वाचविण्यात येत आहे. मुंबई येथे श्री माता कन्यका सेवा संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार व शैलेंद्रसिंग बैस यांच्या नेतृत्वाखाली बालकांना शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे नेण्यात येत आहे.