पो.डा. पो.डा. वार्ताहर :
भारत सरकारच्या उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या एचपिसीएल एलपीजी कंपनी चंद्रपूर मधे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या युनिट ची स्थापना करण्यात आली.
एचपिसीएल मधील कामगाराच्या वेळेपेक्षा जास्त काम करवून घेणे, ओव्हरटाईम चा पूर्ण मोबदला मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी पाठपुरावा करून कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास अधिकाऱ्यांना भाग पडले.
यावेळी मनसेवर विश्वास दाखवत एचपिसीएल येथील साठ ते सत्तर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्यत्व स्विकारले व एचपिसीएल एमआयडीसी येथे कामगार शाखेची स्थापना यावेळी करण्यात आली.
कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविष सिंह यांच्या मार्गदर्शनात यावेळी युनिट अध्यक्ष पदी यशवंत देवगडे, युनिट उपाध्यक्ष मनोज देशकर व युनिट सचिव धीरज यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी हॅण्डलिंग, हाऊस किपिंग, डीटीपी, कोड रिपेअर, इलेक्ट्रिक, सेफ्टी, मेन्टेनांस, ड्राइवर व कार्यालयातील कामगारांची उपस्थिती होती.