महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत
एक दिवसीय प्रशिक्षण
पो डा वार्ताहर, नागपूर, – राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू झाला असून अधिनियमांतर्गत अधिसूचित बऱ्याच सेवा ऑफलाईन स्वरुपात देण्यात येतात. ऑफलाईन सेवा चालू असल्यामुळे नागरिकांना पारदर्शक, समयोचित व कार्यक्षम पध्दतीने सेवा उपलब्ध होत नाही व कायद्याचा हेतू सफल होत नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण अपेक्षित आहे. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी विभाग प्रमुखांनी करावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सर्व विभागांनी त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सद्यास्थितीत ऑफलाईन देण्यात येत आहेत, त्या सर्व सेवा फक्त ऑनलाईन स्वरुपातच देण्यात याव्यात,अशा सूचना देवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रशासकीय कारवाई होणार नाही याबाबत काटेकोरपणे दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी सांगितले.
या कायद्यांतर्गत कोणऱ्या सेवा नागरिकांना प्राप्त करुन घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ही माहिती आपण आपले सेवा सरकार वेब पोर्टलवर पाहू शकता. सेवा प्रदान करतांना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसतांना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करु शकतात, अशी माहिती ऑनलाईन सादरीकरणाद्वारे देण्यातआली
या प्रशिक्षणास उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, पियुष चिवंडे, शिवराज पडोळे तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. असे.