पो.डा. वार्ताहर , वाशिम : पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/ओटीएसपी) सन २०२२-२३ माहे ३१ मार्च अखेर खर्चास मंजूरी प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/ अनुसूचित जाती उपयोजना/ओटीएसपी), सन २०२३-२४ या वर्षातील कामांना मंजूरी. सन २०२३-२४ चे पुनर्विनियोजन,तिर्थक्षेत्रांना क-वर्ग दर्जा प्रदान करणे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ व सन २०२३-२४ तिर्थक्षेत्र/जनसुविधा अंतर्गत कामांना मंजूरी. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४-२५ च्या प्रारुप आराखडयास मंजूरी व जिल्हा विकास आराखडा तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येईल.