रत्नागिरी दि १ (जिमाका):- जिल्ह्यात उमेद अभियानाचे समाधान कामकारक आहे तथापी काही बचत गटांच्या व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये जे दोषी आहेत यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद ) चा आढावा त्यांनी घेतला यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकाही शुभांगी साठे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकल्प संचालिका (DRDA ) नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते. जिल्हयात उमेद अभियानामध्ये किती जण कार्यरत आहेत अशी विचारणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच या सर्वाचे मानधन वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले.
राज्यात सन 2012 मध्ये हे अभियान सूरू करण्यात आले आऊन असून रत्नागिरी जिल्हयात एकूण १५ हजार ७०९ बचत गट कार्यरत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती घाणेकर यांनी दिली. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांच्या प्रमुखांसह जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.